मिरची महत्व
नवनवीन सुधारित वाण आणि लागवड तंत्रज्ञान यामुळे मिरची पिकातील उत्पादकता वाढत आहे. मिरची मध्ये अ आणि क जीवनसत्व भरपूर आहेत.फॉस्फेरस आणि कॅल्शियम चे प्रमाण चांगले आहे.
मिरची तिखट पणा हा कॅप्सीसीन द्रव्यामुळे, तर लाल रंग कॅप्सानथिन या रंगद्रव्यामुळे येतो.
मिरचीच्या जाती:
- सुधारित जात : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मिरचीच्या मुसळवाडी सिलेक्शन, ॲग्री रेखा, फुले सही, फुले ज्योती, फुले मुक्ता,फुले सूर्यमुखी या जाती विकसित केल्या आहेत.या जाती उत्पादनास तसेच गुणवत्तेस चांगले आहेत.
अग्रीरेखा : ही जात दोंडाईचा आणि ज्वाला या दोन जातींच्या संकरातून निवड पद्धतीने तयार केली आहे.याची झाडे मध्यम उंचीची असतात. उन्हाळ्यात आणि खरीप हंगामात लागवडीसाठी उपयुक्त अशी ही जात आहे. हिरव्या फळांसाठी लागवडीची शिफारस करण्यात आली आहे.वाळलेल्या लाल मिरची चा उतारा कमी मिळतो. हिरव्या मिरचीचा रंग पोपटी रंगाचा आहे. हिरव्या मिरचीचे हेक्टरी 100 ते 120 क्विंटल तर वाळलेल्या मिरचीचे 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळते.
फुल ज्योती : फळे घोसात लागतात.प्रति घोसात सरीसरी 4-5 फळे असतात. फळांची लांबी 6 ते 7सें. मी असते.फळांचा रंग गर्द हिरवा असून पिकल्यानंतर तो लाल होतो. हिरव्या मिरचीची सरासरी हेक्टरी उत्पादन 180 ते 225 क्विंटल मिळते.
ही जात भुरी रोगाला कमी बळी पडते. पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे.
फुले सई: या जातीतील पश्चिम महाराष्ट्रातील जिरायती क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. ही जात पंत सी-1 आणि कमंडलू या दोन वाणाच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केली आहे.झाडे मध्यम उंचीची असतात. जिरायती क्षेत्रात 13 ते 16 क्विंटल प्रतिहेक्टरी वाळलेल्या मिरचीचे उत्पादन मिळते.
Share your comments