बरेचदा आपण आपल्या घरामध्ये पुरेल एवढे धान्य साठवत असतो. परंतु बऱ्याचदा या धान्या मध्ये बारीक बारीक किडे झालेले दिसतात. हे प्रामुख्याने हवेतील आद्रता,बदलता हवामानाचा प्रभाव यामुळे देखील होऊ शकते.यामुळे धान्याचे भरपूर नुकसान होते.
आणि अशा पाण्याचा खाण्यासाठी उपयोग आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो. धान्य खराब होऊ नये यासाठी आपल्याला काय करता येईल? हनी साठवणूक केलेल्या धान्य बराच काळ टिकेल यासाठी आपण या लेखाच्या माध्यमातून काही सोप्या पद्धती जाणून घेणार आहोत.
धान्य साठवताना अशाप्रकारे घ्या काळजी
- चांगल्या दर्जाचे धान्य- जर आपल्याला दांडे साठवायचे असेल तर दे जा खरेदी करायची असेल तर त्याचा दर्जा उत्तम असणे गरजेचे आहे. चांगल्या दर्जाचे धान्य बऱ्याच दिवस राहू शकते त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी धान्य साठवणे सोपे जाते.
- ओलाव्याची खबरदारी घ्या- डाळी व तांदूळ साठवताना हे लक्षात ठेवा कि, त्यामध्ये ओलावा नसावा.ओलाव्यामुळे धान्य लवकर खराब होऊ शकते.म्हणून स्वच्छतेची खास काळजी घ्या.
- तांदूळ कसा सुरक्षित ठेवावा-तादुळ बराच काळ साठवून ठेवण्यासाठी त्यात कोरडे पुदिन्याची पाने घाला.याव्यतिरिक्त तुम्ही त्यात कडूलिंबाची पाने आणि तिखट घालू शकता.असे केल्याने कोणते कीटक लागत नाही.
- डाळी टिकवण्यासाठी-डाळीमध्ये काही कडुनिंबाची पाने घाला.याशिवाय तुम्ही त्यात मोहरी चे तेल देखील घालू शकतात.यानंतर उन्हात चांगले वाळवावे आणि कंटेनर मध्ये ठेवा. यामुळे आपली डाळ बऱ्याच कालावधीपर्यंत टिकू शकते.
- गहू ची सुरक्षा-बरेच लोक घरी गाव स्वच्छ करतात आणि पोत्यांमध्ये ठेवतात. मात्र गहू हा नेहमी मोठ्या कंटेनर मध्ये ठेवावा. बरेच दिवस गहू चांगला ठेवण्यासाठी गहूमध्ये आपण कांदा टाकावा. यासाठी आपण एक क्विंटल गव्हासाठी सुमारे अर्धा किलो कांदे वापरू शकता.असं केल्याने आपला गहू बराच काळ सुरक्षित राहील.
- इतर उपयोगी उपाय-धान्य टिकवण्याचा चांगला मार्ग म्हणजे प्लास्टिक कंटेनर. यासाठी आपण कंटेनर जिथे ठेवाल ती स्टोअर रूम पुन्हा पुन्हा उघडू नका आणि धान्य खराब झाली आहे का आहे दहा ते पंधरा दिवसात एकदा तपासा.धान्य साठवण्याची जागा हवेशीर असली पाहिजे. (संदर्भ-Tv9 मराठी)
Share your comments