गवार हे भाजीपाला पिक उन्हाळी आणि खरीप या दोन्ही हंगामात चांगले येऊ शकते इतर भाजीपाल्याच्या तुलनेत कमी पाण्यावरही हे पीक चांगले वाढते. आर्थिक आणि जमिनीची सुपीकता या दोन फायद्यांमुळे गवारीचे पीक औषध घ्यावे.
मध्यम खोलीच्या कसदार जमिनीत पिकाची वाढ चांगली होते. पाण्याचा निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत लागवड करावी. जमिनीचा सामू 7.5 ते 8 च्या दरम्यान असावा. जमीन हलकी असल्यास भरपूर सेंद्रिय खत द्यावे. एकरी आठ ते 10 टन कुजलेले शेणखत मातीत घालावे.
उन्हाळी हंगामात लागवड 15 जानेवारीते 15 फेब्रुवारी या कालावधीत करावी.
उगवण चांगली होण्यासाठी बियाणे पेरणीपूर्वी दोन तास भिजवून, सावलीत सुकवून नंतर पेरावे.त्याचप्रमाणे लागवडीअगोदर जमिनीला पाणी देऊन वाफसा आणून नंतर पेरणी करावी.पेरणीनंतर हलके पाणी द्यावे.पेरणीसाठी एकरी 8 किलो बियाणे वापरावे.
लागवड ठोकुन करायची झाल्यास 12 ते 15 किलो बियाणे पुरते. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 125 ग्रॅम जिवाणूसंवर्धक चोळावे. त्यामुळे मुळांवरील नत्र ग्रंथींची वाढ होऊन पिकास व जमिनीस उपयुक्त ठरते
- जाती :- गवारीची स्थानिक म्हणजे गावरान ही जात गिराईक जास्त पसंत करतात. पुसा सदाबहार, पुसा मोसमी, आणि शरद बहार इतरही काही खाजगी कंपनीच्या जाती आहेत. अनुभवानुसार जातीची निवड करावी.
- खत व्यवस्थापन :-कोरडवाहू पीक घेतल्यास खताची फारशी आवश्यकता भासत नाही.बागायती पिकाला पूर्व मशागतीच्या वेळीएकरी 8 ते 10 टन शेणखत जमिनीत मिसळावे. या पिकाला एकरी10 किलो नत्र 20 किलो स्फुरदआणि 20 किलो पालाश द्यावे.
- लागवडीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. नत्राचा अर्धा राहिलेला हप्ता पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावा.
पाणी कमी लागत असले तरी फुले लागल्यानंतर ओलावा कमी पडू देऊ नये.
भाजीसाठी हिरव्या कोवळ्या लुसलुशीत पण पूर्ण वाढलेल्या शेंगांची तोडणी करावी. शेंगा जुन्या, निबर होऊ देऊ नयेत. तीन ते चार तोडण्या मिळतात. हिरव्या शेंगांचे जातीनिहाय एकरी 40 ते 50 क्विंटल उत्पादन मिळते.
Share your comments