राज्यात सर्वत्र रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. जसे की हरभरा, गहू आणि ज्वारी या पिकांची काढणी चालू आहे. आज जरी आपण गहू या पिकाबद्धल विचार केला तरी अनेक असे शेतकरी आहेत जे गव्हाचा कुटार जाळून टाकण्यावर भर देत असतात, जे की यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढते. तसेच ज्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जाते त्या राज्यात मोठ्या प्रमाणात गव्हाचे कुटार जाळले जाते यामुळे मोठ्या प्रमाणात हवा दूषित होते. गव्हाचे कुटार जाळून टाकण्यापेक्षा त्यापासून खत तयार होते ज्यामुळे पिकांची चांगल्या प्रकारे वाढ ही होते सोबतच जमिनीची सुपीकता सुद्धा चांगल्या प्रकारे राहते. कुटारमध्ये नत्र हे ०:३० - ०:३५% , स्फुरफ ०:८० - ०:१% , पालाश ०:७० - ०१% , अशा प्रमाणत असते. प्रति हेक्टर तुम्हाला ७ ते ८ टन कुटार मिळते जे की यापासून तुम्ही सेंद्रीय खत तयार करू शकता.
कसे तयार करावे खत :-
१. कुटार हे शेताच्या मध्यभागी असते. जे की शेताच्या कोपऱ्यावर वाहून त्याचा ढीग पसरावा आणि तो ओला करावा.
२. त्या ढिगावर २ बॅग युरिया, २ बॅग सुपरफॉस्फेट, जिवाणू कल्चर वेस्ट डिकम्पोजर २०० ली द्रावण शिंपडावे.
३. जे गव्हाचे काड आहे ते सिंगल पलटी नांगरावे व त्यानंतर एक महिन्याने रोटावहेटर ने ते मिक्स करून घ्यावे. पावसाळ्यामध्ये पहिला पाऊस पडला की प्रति एकर २०० लिटर वेस्टडीकंपोजर शिंपडावे.
४. अगदी ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर दोन महिन्यात खत तयार होईल.
५. जर हा पर्याय तुम्हाला शक्य नसेल तर कुटारावर २०० लिटर वेस्टडिकंपोजर शिंपडावे आणि ट्रॉलीमध्ये भरून शेतात पसरून द्यावे.
६. नांगरणी करून जमिनीत गाडून दिल्यानंतर २ ते ३ महिन्याने खत तयार होईल. जे की यामुळे जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढतो व पुढील पिकांसाठी हे फायदेशीर ठरते.
सेंद्रिय कर्ब चे महत्व :-
जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय कर्ब खूप महत्त्वाचा ठरतो जसे की सेंद्रिय कर्बमुळे जमिनीतील जे सूक्ष्मजीव कार्यरत होऊन माती जिवंत करतात.जमिनीमध्ये कार्बन आणि नत्र यांचा समतोल राखला जातो. मातीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण साधारणता २५ टक्के हवा, २५ टक्के पाणी, ४५ टक्के खनिजे आणि ५ टक्के सेंद्रिय कर्ब मातीमध्ये असते. याप्रकारची माती शेतीसाठी चांगली मानली जाते. शेतामध्ये चालताना शेतजमीन एवढी भुसभुशीत असली पाहिजे की आपणास असे वाटले पाहिजे की आपण गादिवरून चालतोय. पण हे त्याचवेळी वाटेल जेव्हा शेतकरी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत मिसळतील.
पर्यावरणाचे प्रदूषण सुद्धा थांबेल :-
भारतात अशी अनेक राज्य आहेत ज्या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतात. मात्र ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गहू पिकवला जातो तिथे गव्हाचे कुटार जाळले जाते यामुळे पर्यावरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण होते. जे की यासाठी तुम्ही दिलेल्या पद्धतीने उपाय केला तर जमिनीचा योग्य प्रकारे सेंद्रिय खत ही तयार होईल आणि प्रदूषण ही होणार नाही. जे की पिकांच्या वाढीसाठी हे खत फायदेशीर ठरते आणि जमिनीची सुपीकता सुद्धा वाढते.
Share your comments