वांगी हे भाजीपाला पीक असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रातील असे बरेच शेतकरी आहेत की एकदा लागवड केल्यानंतर वर्षभर वांग्याचे उत्पादन घेतात. हे एक भाजीपाला पिकांमधील महत्त्वपूर्ण पीक असून जर बाजारपेठेचा विचार केला तर संपूर्ण वर्षभर चांगली मागणी वांग्याला असते. व्यवस्थित व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अंदाज घेऊन केलेली विक्री वांग्याच्या माध्यमातून चांगला आर्थिक नफा मिळवून देऊ शकते.
त्यासाठी पिकांसाठी आवश्यक असलेले जे काही व्यवस्थापन असते ते तर लागतेच परंतु सगळ्यात अगोदर महत्वाचे असते ते वांग्याच्या चांगल्या उत्पादनक्षम आणि सुधारित जातींची.
लागवड करत असलेले वांग्याची जात जर चांगली उत्पादनक्षम आणि दर्जेदार असेल तर निश्चितच त्या माध्यमातून चांगले उत्पादन मिळते. या लेखात आपण अशाच वांग्याच्या दोन दर्जेदार आणि चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती विषयी माहिती घेऊ.
वांग्याच्या दर्जेदार आणि चांगले उत्पादन देणाऱ्या जाती
1- पुसा पर्पल लॉंग-ही एक वांग्याची उच्च उत्पादन देणारी जात असून लवकर लागवडीसाठी ही फायदेशीर जात आहे. जर या जातीची लागवड लवकर केली तर या पासून मिळणारे उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने मिळते. ह्या जातीची लागवड शरद ऋतूमध्ये केली जाते. हिवाळ्यामध्ये या जातीच्या वांग्याला तयार होण्यासाठी सुमारे 75 ते 80 दिवसाचा कालावधी लागतो.
समजा तुम्ही जर वसंत ऋतूमध्ये या जातीच्या वांग्याची लागवड केली तर लागवडीपासून साधारणतः 100 ते 110 दिवसांत काढणीस तयार होते. जर आपण या जातीपासून मिळणाऱ्या सरासरी उत्पादनाचा विचार केला तर प्रति हेक्टरी 300 क्विंटल इतके सरासरी उत्पादन मिळत असल्याचा देखिल दावा केला जातो.
2- पुसा हायब्रीड 5- ही वांग्याची एक सुधारित जात असून या जातीपासून मिळणारे वांगे हे चमकदार आणि गडद जांभळ्या रंगाचे असते. वांग्याची ही जात चमकदार, आकर्षक आणि गडद जांभळ्या रंगाची असते व
या जातीच्या एका वांग्याचे वजन सुमारे 100 ग्रॅमपर्यंत असते. या जातीपासून मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर ते हेक्टरी 510 क्विंटल इतके मिळते.
3- याशिवाय वांग्याच्या महिको हायब्रीड नंबर 3, महिको रवैया, वायलेट लांब जातीमध्ये गुलाबी आणि एम एस 172 या जाती खूप चांगले आहेत.
Share your comments