काकडी हे पीक कमी खर्चात आणि कमीत कमी कालावधीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता ठेवते. अतिशय कमी वेळेमध्ये चांगला नफा शेतकऱ्यांना या पिकाच्या माध्यमातून मिळतो. जर व्यवस्थित व्यवस्थापन ठेवले तर काकडी पीक हे खूप शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. या लेखात आपण काकडी लागवडीचे सुधारित तंत्र आणि काही महत्त्वाच्या जाती विषयी माहिती घेऊ.
कारले लागवडीसाठी या गोष्टींकडे दया लक्ष
1- अशा पद्धतीने करा बरं लागवड- कारले लागवड करताना एका एकरासाठी एक ते दीड किलो बियाण्याची आवश्यकता असते व लागवडीआधी बिजप्रक्रिया करून घ्यावी. त्यासाठी काकडीच्या बिया 24 ते 48 तासांसाठी ओल्या फडक्यामध्ये किंवा पोत्यात बांधून ठेवाव्यात व बावीस्टीन वीस ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
काकडी लागवड करायच्या अगोदर जमिनीची नांगरणी करून जमीन भुसभुशीत करणे खूप गरजेचे आहे व त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत 12 ते 15 गाड्या टाकून घ्यावे.नंतर वखरणी करावी. तुम्हाला कोणत्या जातीची काकडी लागवड करायची आहे
त्या नुसार 90 ते 120 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात व त्यामध्ये टोकण पद्धतीने लागवड करावी. दोन ओळीतील अंतर 45 ते 55 सेंटीमीटर ठेवणे गरजेचे आहे व लागवड केल्यानंतर हलकेसे पाण्याचा पुरवठा करावा.
2- अशा पद्धतीच्या खत व्यवस्थापन ठरेल महत्त्वाचे- काकडीच्या अधिक उत्पादनासाठी एका एकराला दहा टन शेणखत आणि 90 किलो युरिया व त्यासोबत 120 किलो सुपरफॉस्पेट 35 किलो म्युरेट ऑफ पोटॅश खतांचा पुरवठा करणे गरजेचे आहे.
नत्राच्या एकूण प्रमाणापैकी अर्धा युरिया हा लागवड करताना द्यावा व उरलेला लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावा. ते देताना ते काकडीच्या वेलीभोवती रिंगण पद्धतीने द्यावी व त्यानंतर पाण्याचा पुरवठा करावा.
3- अंतर मशागत आहे गरजेची- जर तुम्ही काकडीच्या वेलीला व्यवस्थित प्रकारे आधार दिला तर काकडीची प्रत सुधारते. परंतु ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ व खर्चिक असल्या कारणाने शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु जर ही पद्धत वापरली तर नक्कीच काकडीचे दर्जेदार उत्पादन मिळते.
काकडी पीक तणमुक्त ठेवणे गरजेचे असून लागवड केल्यानंतर 25 ते 30 दिवसांनी निदणी करणे गरजेचे आहे.जेव्हा काकडी लागायला सुरुवात होते तेव्हा काकडीचा संपर्क मातीशी होऊ नये म्हणून काकडीच्या खाली वाळलेल्या काडक्या घालाव्यात. तसेच व्यवस्थित पिकाचे निरीक्षण करून एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करावे.
4- अशा पद्धतीने करावी काढणी- शक्यतो जेव्हा काकडी कोवळी असते तेव्हा काढणी करावी. दर एक ते दोन दिवसांच्या अंतराने काढणी करणे गरजेचे असून त्यामुळे कोवळी काकडीचे उत्पादन मिळते व तिला बाजारात चांगली मागणी असते. हंगामानुसार व जातीनिहाय एकरमध्ये 80 ते 120 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणे शक्य असते.
5- लागवडीसाठी महत्त्वाच्या जाती- काकडी पिकाच्या माध्यमातून चांगले उत्पादन हवे असेल तर काही महत्वाच्या जातीची लागवड करणे गरजेचे असून यामध्ये शितल, पुना खिरा, प्रिया तसेच हिमांगी, फुले शुभांगी, रिजवान इत्यादी जातींची लागवड शेतकरी करतात व या खूप महत्त्वपूर्ण वाण आहेत.
Share your comments