सोयाबीन आणि कापूस हे महाराष्ट्रातील प्रमुख पिके असून खरीप हंगामामध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात सोयाबीन मोठ्या प्रमाणात लावले जाते. परंतु कुठलेही पीक लागवड करण्याच्या अगोदर त्या पिकाचे बियाणे हे दर्जेदार असने खूप गरजेचे असते.
कारण दर्जेदार बियाणे असेल तरच मिळणारे उत्पादन देखील भरघोस आणि दर्जेदार मिळते. हाच दृष्टिकोन समोर ठेवून देशातील आणि राज्यातील वेगवेगळ्या कृषी विद्यापीठे पिकांच्या नवनवीन वाणांचे संशोधन करून शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून फायद्याचे ठरतील,अशा वानांचा शोध लावत असते.
याबाबतीत सोयाबीन पिकाचा विचार केला तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारित जाती सोयाबीन मध्ये आहेत. परंतु बऱ्याचदा जे प्रतिवर्षी बियाण्याची लागवड केली जाते तेच बियाणे परत परत वापरले जाते. त्यामुळे नवीन चांगल्या बियाण्यांची शेतकऱ्यांना माहिती होत नाही व त्या अभावी उत्पादन हवे तसे मिळत नाही.
या लेखामध्ये आपण सोयाबीनच्या रोग प्रतिकारशक्ती असलेल्या व पाण्याचा ताण सहन करत असलेल्या काही वाणाची माहिती घेऊ.जेणेकरून शेतकऱ्यांना या नवीन वानांची माहिती होईल.
नक्की वाचा:आताच सावध व्हा! कपाशीवरील आकस्मिक मर रोग लक्षणे आणि उपाय
या आहेत सोयाबीनचे सुधारित वाण
1-RVSM-1135- मध्यप्रदेश येथील राजमाता सिंधिया कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे एक नवीन वान प्रसिद्ध केले असून या जातीच्या सोयाबीनचे लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळाल्याचे दिसून आले आहे.
विद्यापीठाने विकसित केलेल्या या नवीन जातीचा स्टार हात सरळ असतो व रंग तपकिरी असून फुलांचा रंग पांढरा असतो. या जातीच्या सोयाबीन 50 ते 60 सेंटी मीटर उंचीपर्यंत वाढते तसेच काढणीचा कालावधी 93 दिवसाचा आहे.
या जातीच्या सोयाबीन मध्ये तेलाचे प्रमाण 31 टक्क्यांच्या आसपास असून प्रथिने 42 टक्के आहेत. तसेच सरासरी उत्पादन 25 क्विंटल प्रति हेक्टर मिळते. या जातीचे मुळे मजबूत असल्यामुळे मुळाचे संबंधित रोग होत नाहीत.
तसेच हानिकारक कीटकांच्या विरोधात लढण्याची क्षमता आहे या वानात आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर जास्त पाऊस झाला व शेतात पाणी साचले तरी याचा सहसा परिणाम या जातीच्या सोयाबीन पिकावर होत नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या जातीच्या झाडांची मुळे मजबूत असल्यामुळे पाण्याचा ताण जरी पडला तरी आद्र्रता टिकून ठेवण्यास मदत होते व त्यामुळे अवर्षणाच्या परिस्थितीत देखील हे वान चांगले उत्पादन देऊ शकते. याच्या उगवणशक्ती चा विचार केला तर जवळजवळ 90 टक्क्यांपर्यंत आहे. प्रतिकूल हवामान देखील हे चांगले उत्पादन देते.
नक्की वाचा:शेतकरी बंधूंनो! कपाशी लावली गेली परंतु सुरुवातीला पाऊस आहे कमी तर नका करू काळजी कारण….
2-RVS-18- सोयाबीनची ही जात राजमाता सिंधीया कृषी विद्यापीठ आणि विकसित केली असून राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खास शिफारस केलेली जात आहे. या वाणाच्या लागवडीपासून 91 ते 93 दिवसात काढण्यात येते. या जातीच्या झाडाची मुळे मजबूत असल्यामुळे दुष्काळ आणि जास्त पाऊस झाला तरी झाडावर परिणाम होत नाही. म्हणून या दोन्ही परिस्थितीत शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळण्याची हमी मिळते. अचूक व्यवस्थापन राहिल्या तर प्रति हेक्टर 22 ते 24 क्विंटल उत्पादन या जातीपासून मिळते.
Share your comments