जर बाजारभाव चांगला मिळून गेला तर अपेक्षेपेक्षा खूप जास्त नफा कमीत कमी वेळेत देण्याची क्षमता कोथिंबीर आणि मेथीमध्ये आहे. परंतु बाजारभाव चांगला मिळणे हे ठीक आहे परंतु या पिकांच्या सुधारित आणि चांगल्या उत्पादनक्षम जातींची निवड करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने या लेखांमध्ये आपण कोथिंबीर या पालेभाजी पिकाच्या चांगल्या उत्पादनक्षम जातींची थोडक्यात माहिती घेणार आहोत.
या आहेत कोथिंबिरीच्या चांगल्या भरघोस उत्पादन देणाऱ्या जाती
1- लामसीएस-2- कोथिंबीरीची ही जात मध्यम उंचीची वाढणारी असून या जातीच्या कोथिंबिरीला भरपूर फांद्या येतात. ही जात झुडपा सारखे वाढते व चांगले उत्पादन देण्यास सक्षम आहे.
2- को 1- हे कोथिंबीरीची जात तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेली असून कोथींबीरीच्या आणि धन्याच्या भरगोस उत्पादनासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी जात आहे. जर आपण या जातीच्या कोथिंबीरीची उत्पादन क्षमता पाहिली तर 40 दिवसात एका हेक्टर मध्ये दहा टन कोथिंबीरीचे उत्पादन देऊ शकते.
3- लामसीएस 6- कोथिंबीरची ही जात देखील चांगली उत्पादन देणारी असून या जातीला भरपूर फांद्या येतात व ही झुडपवजा वाढणारी जात आहे. ही मध्यम उंचीची जात असून मुख्य फांदी रंगीत असते. या जातीच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही जात भुरी या रोगास प्रतिकारक आहे.
4- लामसीएस 4- कोथिंबीरीची ही जात देखील उंच वाढणारी असून भरपूर उत्पादन देणारी जात आहे. या जातीला भरपूर फांद्या आणि भरपूर पाणी देखील येतात व झुडूपवजा वाढते.
या जातीची कोथिंबीरीची मुख्य काडी रंगीत असून ही कोथिंबीरची जात विविध प्रकारच्या रोगांना आणि किडींना देखील प्रतिकारक आहे.
Share your comments