महाराष्ट्रामध्ये वांग्याची लागवड बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहेत.जर आपण वांग्याचा विचार केला तर बरेच शेतकरी एकदा लागवड करून वर्षभर हे पीक घेतात. त्यासाठी त्या पद्धतीचे व्यवस्थापन देखील गरजेचे असते. परंतु वांग्याची लागवड करण्यासाठी आपण अगोदर एखाद्या रोपवाटिकेतून रोपे विकत आणतो मग लागवड करतो.
परंतु हे आणलेले रोपे कशा पद्धतीने तयार करण्यात आले आहेत किंवा कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव तर त्यांच्यावर नाही ना या सगळ्या गोष्टींची भीती असते.
परंतु जर वांग्याचे रोपवाटिका आपण घरच्या घरी तयार केली व त्यापासून निरोगी व दर्जेदार रोपे तयार होतातच परंतु त्या रोपांच्या माध्यमातून पुढे मिळणारे उत्पादन देखील भरघोस मिळते. या लेखात आपण घरच्या घरी वांग्याची रोपवाटिका कशी तयार करावी याबद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो शेतात करा वेगवेगळ्या पिकांची लागवड! उत्पन्नात होईल भरघोस वाढ; जाणून घ्या...
अशा पद्धतीने तयार करा घरच्या घरी रोपवाटिका
1- सगळ्यात आगोदर तीन बाय दोन मीटर आकाराचे गादीवाफे तयार करून घ्यावेत व तयार करताना त्यांची रुंदी एक मीटर व उंची साधारणतः 15 सेंटिमीटर ठेवावे. गादी वाफे तयार केल्यानंतर प्रत्येक वाफ्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत दोन पाट्या किंवा एक पाटी जरी राहिली तरी चालते
आणि त्याच्यासोबत 200 ग्राम संयुक्त रासायनिक खत मिसळून टाकावे. खत व माती यांचे योग्य मिश्रण करून गादी वाफ्यात ते सारखे प्रमाणात पाणी मिळेल असे पहावे. तसेच वांग्याच्या रोपावर मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रत्येक वाफ्यात 30 ते 40 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईडचा वापर करावा.
नक्की वाचा:Crop Management: पिकांमधील अन्नद्रव्यांची कमतरता वेळीच ओळखा; मिळेल भरघोस उत्पन्न
2- जेव्हा तुम्ही बियाणे टाकाल तेव्हा रुंदीस समांतर दहा सेंटिमीटर अंतरावर खुरप्याने एक ते दोन सेंटीमीटर खोल अशा ओळी पाडून घ्याव्यात त्यामध्ये पातळ बियाणे टाकावे. यामध्ये बियाणे टाकून झाल्यानंतर लोट पाणी न देता झारीने पाणी द्यावे व त्यानंतर पाटाने पाणी द्यावे.
3- जेव्हा रोपांची उगवण होईल त्यानंतर त्यांची चांगली वाढ होण्यासाठी 10 ते 13 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 50 ग्रॅम युरिया आणि 15 ते 20 ग्रॅम फोरेट दोन ओळींमध्ये काकरी पाडून घ्यावे व हलकेसे पाण्याचा पुरवठा करावा.
4- जेव्हा तुम्हाला वांग्याची लागवड करायची आहे त्याच्या लागवडीपूर्वी वांग्याच्या रोपाला थोडा पाण्याचा ताण द्यावा म्हणजे रोप चांगले कणखर बनते. त्यासोबतच लागवड करण्याच्या अगोदर एक दिवस रोपांना पाणी द्यावे. रोपांची उंची 12 ते 15 सेंटिमीटर होते तेव्हा त्याची लागवड करावी.
Share your comments