पिकांच्या भरघोस वाढीसाठी नत्र,स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्यासोबतच सुक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य देखील तितकेच गरजेचे असतात. परंतु आपण पिकांना खतांचा पुरवठा करताना त्यातील किती पोषक घटक पिकांना उपलब्ध होतात हेदेखील पाहणे महत्वाचे असते.कारण पिकांसाठी खतांचा कार्यक्षम वापर होणे गरजेचे असून तरच केलेल्या खर्चाचे चीज होते व आपल्याला फायदा देखील मिळतो.
कुठलीही गोष्ट वेळेवर करणे खूप गरजेचे असून हीच बाब खतांच्या पुरवठ्याच्या बाबतीत देखील लागू होते. पिकांना खताचा पुरवठा करताना त्याची योग्य वेळ व एकूण मात्रा याची विभागणी करणे देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे या लेखात आपण नत्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कुठल्या उपाय योजना उपयुक्त ठरतील, या बद्दल महत्वाची माहिती घेऊ.
या उपाययोजना करा व वाढवा नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता
1- आपल्याला माहित आहेच कि नत्र हे अतिशय उपयुक्त असून सर्व प्रकारच्या जमिनीत कमी अधिक प्रमाणात नत्राची कमतरता दिसून येते व त्या दृष्टिकोनातून पिकांनाही नत्राची आवश्यकता जास्त असते.
2- आपण जेव्हा पिकांना नत्रयुक्त खतांचा पुरवठा करतो. परंतु हे नत्र वेगवेगळ्या मार्गांनी वाया जाते. जर आपण यासंबंधी आकडेवारी पाहिली तर एकूण नत्रापैकी 35 ते 55 टक्के पिकांना लागू होते. त्यामुळे पाण्यात विरघळणारा आणि वायुरूपात जाणारा अमोनिया कमी करून आपण नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढवू शकतो.
नक्की वाचा:Fertilizer: गंधकाचा वापर ठरेल ऊस उत्पादन वाढीत माईलस्टोन,वाचा सविस्तर माहिती
3- समजा तुम्ही जिरायती शेतीमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर करत असाल तर ते पिकांना देताना पेरून देणे फायद्याचे ठरते.
4- ज्या भागांमध्ये जास्त पाऊस होतो अशा भागात जास्त कालावधीच्या पिकांसाठी नत्राची मात्रा दोन ते तीन टप्प्यात विभागून देणे गरजेचे ठरते.
5- धान पिकामध्ये युरियाचा वापर करत असाल तर तो सुपर ग्रेनुलेसचा करावा.
6- समजा तुम्ही नायट्रेटयुक्त खतांचा पुरवठा पिकांना केला असेल तर ते वाहून जाऊ नये यासाठी नियंत्रित आणि हलकी पाण्याची पाळी द्यावी.
7- आपण नत्राचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी युरियाचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. युरियामधील नत्राचा पुरवठा पिकांना उपलब्ध होण्यासाठी युरियाच्या सोबत निंबोळी पेंडीचा वापर करणे खूप फायद्याचे ठरते.
8- नत्रयुक्त खत पिकांना देताना माती परीक्षण अहवालानुसार या अन्नद्रव्यांची कमतरता आहे त्यांचीच मात्र संयुक्त खताद्वारे देणे फायद्याचे ठरते.
Share your comments