जर आपण टोमॅटो लागवडीचा विचार केला तर महाराष्ट्रात भरपूर जिल्ह्यांमध्ये टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. भाजीपाला वर्गीय पिकांमधील टोमॅटो हे पीक खूप महत्त्वाचे असून शेतकऱ्यांना चांगल्या आर्थिक उत्पन्नाची संधी या माध्यमातून मिळते. परंतु टोमॅटो पिकाची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
जर टोमॅटो पिकाचे व्यवस्थापन परफेक्ट राहिले तर त्याद्वारे मिळणारे उत्पादन देखील तितकेच भरघोस मिळते. जर आपण टोमॅटो पिकाचा विचार केला तर या पिकावर विविध प्रकारच्या रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो.
अशा किडींच्या किंवा रोगाच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शेतकरी बंधू खूप प्रयत्न करतात. परंतु बऱ्याचदा कालावधी चूकतो किंवा करावयाच्या उपाययोजना चुकीच्या केल्या जातात यामुळे प्रभाव नियंत्रणात येत नाही व उत्पादनात फटका बसतो.
जर आपण या पिकातील कीडीचा विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. तो त्यामध्ये सर्वात नुकसानकारक जर आपण किडीचा विचार केला उन्हाळी टोमॅटो पिकामध्ये नागअळी हि कीड खूप नुकसान कारक ठरते. त्यामुळे या लेखात आपण टोमॅटो पिकांमधील नागअळीचे नियंत्रण कसे करावे याबद्दल माहिती घेऊ.
टोमॅटो पिकावरील नागअळीचे अशा पद्धतीने करा नियंत्रण
जर टोमॅटो पिकावर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर पिकाची पाने,फळे आणि खोडावर जास्त प्रमाणात लक्षणे दिसून येतात. ही अळी प्रथम पानाच्या दोन्ही पापुद्रा मधील हरितद्रव्य खाते. टोमॅटोच्या पानांवर वेडेवाकडे, पोकळ पांढरा पापुद्रा तयार होतात व पाने फाटतात किंवा वाळून जातात.
त्यानंतर ही आळी झाडाची कोवळी शेंडे तसेच खोड व फळे पोखरून खायला सुरुवात करते. हिरव्या आणि पिकलेल्या टोमॅटोचीच्या साली मध्ये छिद्र करून खाते. झाडाची वाढ खुंटल्याने उत्पादनामध्ये घट संभवते.
या अळीच्या नियंत्रणासाठीच्या प्रभावी उपाययोजना
1- जेव्हा टोमॅटोच्या पुनर्लागवड कराल तेव्हा टोमॅटोच्या रोपांची मुळे इमिडाक्लोप्रिड 0.5 मिली प्रति लिटर पाणी या द्रावणात दहा मिनिटे बुडवून घ्यावीत.
2- टोमॅटो लागवड कराल त्यावेळी व लागवडीनंतर 25 दिवसांनी 250 किलो प्रति हेक्टर निंबोळी पेंड जमिनीतून द्यावी.
3- पानांवर या अळीचा प्रादुर्भाव दिसताच पाच टक्के निंबोळी अर्काची ताबडतोब फवारणी करावी.
4- टोमॅटोच्या प्लॉटमधील प्रादुर्भावग्रस्त पाने, फळे किडीच्या अवस्थेसह गोळा करून नष्ट करून टाकावीत.
5- एका एकर मध्ये लागवड असेल तर दोन ते तीन कामगंध सापळे लावावेत. यासाठी काळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.
6- शेतामध्ये ट्रायकोग्रामा, नेसिडोकोरस इत्यादी परोपजीवी मित्र कीटकांचे संगोपन करावे.
7- तसेच मेटारायझियम किंवा बिव्हेरिया या जैविक कीडनाशकाची दोन ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करणे गरजेचे आहे.
8- या किडीची कोषावस्था असते ती मल्चिंग पेपरवर किंवा जमिनीवर मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्यामुळे फवारणी करताना जमिनीवर व मल्चिंग पेपरवर मेटारायझिमची फवारणी करावी.
9- कोषाअवस्थेमध्ये जाणारे आळीचे प्रमाण जास्त दिसून आल्यास झाडाच्या बुंध्याजवळ रिंग पद्धतीने फिप्रोनील 1 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 2 मिली प्रति लिटर प्रमाणे आळवणी करून घ्यावी.
रासायनिक कीटनाशक
1- ट्रायझोफॉस(40%)- एक मीली अधिक निंबोळी तेल एक मिली ( प्रति लिटर पाणी)
2- डेल्टामेथ्रीन(2.8%)- एक मिलि प्रति लिटर पाणी
3- इंडॉक्साकार्ब-0.75 मिली प्रती लिटर पाणी
इत्यादी कीटकनाशकांची आवश्यकतेनुसार वरीलपैकी एका रासायनिक कीटकनाशक प्रति लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.
( टीप- कुठलीही फवारणी करताना कृषी तज्ञांचा किंवा कृषी सेवा केंद्र चालकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते)
नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी - केंद्र सरकारकडून ६ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ
Share your comments