1. कृषीपीडिया

सल्ला तज्ञांचा! पेरणी करण्याअगोदर वाचा 'हा' तज्ञांचा सल्ला,वाचेल दुबार पेरणीचे संकट

सध्या पेरणीचा कालावधी असून बऱ्याच पेरण्या आटोपल्या आहेत. परंतु अजून देखील पेरण्या बाकी असून आता चांगला पाऊस होत असल्यामुळे राहिलेल्या पेरण्यांना वेग येईल यात शंका नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
sowing by tractor

sowing by tractor

 सध्या पेरणीचा कालावधी असून बऱ्याच पेरण्या आटोपल्या आहेत. परंतु अजून देखील पेरण्या बाकी असून आता चांगला पाऊस होत असल्यामुळे राहिलेल्या पेरण्यांना वेग येईल यात शंका नाही.

 शेतकरी जास्त करून पेरणी करताना पूर्वी वापरत असलेल्या लाकडी पांभरीचा आता वापर न करता ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. परंतु अजून देखील लाकडी पांभर वापरली जाते.  परंतु आता लाकडी पांभरीची जागा अत्याधुनिक अशा ट्रॅक्टरने चालवता येणाऱ्या पेरणी यंत्राने घेतली आहे.

त्यामुळे बरेच शेतकरी आता ट्रॅक्‍टरचलित पेरणी यंत्राच्या साहाय्याने विविध पिकांची पेरणी करतात.यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा देखील वाचतो.परंतु ट्रॅक्टरने पेरणी करताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

नक्की वाचा:Important: कोणत्या शेतकऱ्याने कोणते ट्रॅक्टर आणि का खरेदी करावे? वाचा सविस्तर माहिती

जेव्हा ट्रॅक्टरने पेरणी कराल तेव्हा ट्रॅक्टर चालक हा प्रशिक्षित आणि अनुभवी असणे खूप गरजेचे आहे.तसेच पेरणी करताना कोणते बियाणे किती खोलवर पेरायचे याची माहिती त्याला असणे खूप आवश्यक आहे.

कारण बियाणे पेरताना ते जर जास्त खोलीवर गेले तर ते जमिनीमध्ये सडते. त्यामुळे बऱ्याचदा बियाणे खोलवर गेल्यामुळे आणि ते कुजल्यामुळे  व्यवस्थित उगवत नाही व दुबार पेरणीची वेळ येते.

जर तसे पाहायला गेले तर बियाण्याच्या जाडी नुसार त्याची पेरणीची खोली ठरत असते. जर बियाण्याची जाडी कमी असेल तर साधारणपणे दोन ते तीन सेंटीमीटर पर्यंत पेरणी करणे गरजेचे असते

यामध्ये मका आणि सोयाबीन ची पेरणी पाच ते सात सेंटीमीटर आणि हरभरा व भुईमुगाची साधारणत पाच सेंटीमीटर या पद्धतीने पेरणी करणे आवश्यक असल्याचे कृषीतज्ञ सांगतात.

नक्की वाचा:ट्रॉली पंप' वापरा आणि कीटकनाशकांची फवारणी करा अगदी सोप्या पद्धतीने, जाणून घ्या या पंपाची वैशिष्ट्ये आणि किंमत

 ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना 'ही' काळजी घ्यावी

 ट्रॅक्टरने पेरणी करत असाल तर ट्रॅक्टर चालक हा त्या क्षेत्रातील प्रशिक्षित आणि अनुभवी असणे गरजेचे असून पेरणी करत असताना बियाणे पेरणी यंत्रातून योग्य अंतरावर पडले की नाही हेदेखील बघणे आवश्यक आहे.

तसेच खत आणि बियाणे एकत्र पेरत असताना खत बियाण्याच्या खाली जाते किंवा कसे हे पाहणे गरजेचे आहे.जमीन भुसभुशीत असेल तर पेरणी यंत्राची पांभर असते ती जास्त खोलवर जाऊ देऊ नये.

 पेरणीची खोली

 जर बियाण्याची जाडी कमी असेल तर ते दोन ते तीन सेंटीमीटर खोल पेरावे आणि जाड बियाणे असेल तर ते 5 ते 7 सेंटीमीटर खोल गेले तरी चालू शकते. बियाणे जास्त खोलीवर पेरले गेल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होऊन नुकसान होऊ शकते.

नक्की वाचा:आहे कडवट परंतु आयुष्यात गोडवा आणण्याची आहे ताकत! करा या पिकाचे लागवड, मिळेल बक्कळ नफा

English Summary: this is important agri expert about method of crop sowing Published on: 12 July 2022, 12:17 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters