आळस माणसाचा शत्रु आहे हे आपल्यापैकी प्रत्येकजण जाणतो आणि मानतो सुद्धा.आळशाला कामे चार ही म्हण चांगलीच प्रचलित आहे पण तरीही आळसाला कवटाळुन बसलेले घरा घरात पाहायला मिळतात. दिवसभर कंटाळा आला, मन लागत नाही, नुसते पडून राहावेसे वाटते,उत्साह वाटत नाही,काहीच करण्याची इच्छा होत नाही अशी वाक्ये या आळशी मंडळीच्या तोंडी नेहमी ऐकावयास मिळतात. दिवसभर किंवा संधी मिळेल तेव्हा सोफ्यावर बसले कम झोपलेले,बेडवर पहुडलेले अनेक घरातून पहायला मिळतात. खरेतर स्वतः हुन कोणीही स्वताला आळशी म्हणायला तयारच नाही.का झोपला आहेस रे?असे विचारले की उत्तर मिळते असाच पडलो आहे.कामाधन्द्यासाठी घराबाहेर पड़नारी मंडळी कसे बसे आपले काम संपवून घराकड़े परततात.मात्र घरी आल्यावर त्यांची अवस्था फारच बिकट झाल्यासारखी भासते.जबर्दस्तीने,नाविलाजाने , काही पर्याय नाही म्हणून बिचारे नोकरी करीत असतात.
कामावर गेल्या पासून कधी एकदा सुटतोय आणि घरी परत जातो असा भाव मनात घर करुंन बसलेला असतो.जीवनात काहीही वेगळे करायचे नसते. फार मोठी स्वप्ने नसतात. आपल्या नशीबी एवढंच आहे असे म्हणत समाधान व्यक्त करणारी ही माणसे भविष्यात फार काही वेगळे करू शकत नाही.काम, पैसा सोडाच यांचे आरोग्य कायमचेच बिघडलेले राहते.काही माणसे मात्र याला अपवाद ठरतात.मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर नवनवीन शिखरे चढून जातात.घर,गाडी,बंगला, नोकर चाकर सर्वकाही मिळवतात.यांना कामाचा कधीच कंटाळा नसतो.शरीराला अक्षरशा झिजवून टाकतात. मात्र ज्या शरीराला घेऊन आपण एवढी प्रगती करणार आहोत त्या शरीरा साठी मात्र यांना काहीच करायचे नसते. कारण पुन्हा कंटाळा.थोडक्यात काय तर काहींना कामाचा कंटाळा तर काहींना व्यायामाचा कंटाळा.आरोग्याचे कसे बारा वाजवायचे हे शिकायचे असेल तर फार लांब जायची आवश्यकता नाही.आपल्याला पदोपदी पाहायला मिळतील.रक्तदाब,एसिडिटी,डोकेदुखने,दमा,मधुमेह,सांधेदुखी,
नेहमी सर्दी होत राहणे, अंग दुखणे,कमजोरी वाटने असे लहान मोठे विकार प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ति भोगत असते.बरे, विकार कितीही असले तरी औषधे घेऊन रोगाचे तोंड बंद करुंन टाकण्यात ही माणसे फार पटाईत असतात.जरा काही झाले की खा गोळी. अशा वृत्तीची ही माणसे आयुष्यभर रोगाटलेलीच राहतात.दोष मात्र ईश्वराला नाहीतर नाशिबाला.आपण कुठेतरी चुकतोय हे यांच्या ध्यानीमनीही कधी येत नाही.बिचारे अगदी रडत खडत आयुष्य रेटत असतात.एकदा का असहाय झाले की मग डॉक्टरांच्या आदेशानुसार थोड़ेफार हात पाय हलवतात. तेही जीवाच्या रामारामावर.अशा सुस्तप्रिय,आळशी वृत्तीच्या लोकांनी वेळीच जर व्यायामाचा आधार घेतला नाही तर मात्र त्यांचे काही खरे नाही.आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे वार्ध्यक्य इतके बेहाल होउंन जाते की विचारायची सोय नाही.आयुष्यभर रिटायर्डमेंट सोइस्कर व्हावी म्हणून राबराब राबनारे रिटायर्ड वेळेवर होतात मात्र मिळालेला पैसा औषधांवर, रिपोर्ट काढण्यावर आणि डॉक्टरांवर आणि उरला सुरला घरासाठी काढलेल्या कर्ज फेडण्यात आणि मुलांच्या लग्नावर खर्च होउंन जातो
आणि उरते ते फ़क्त थकलेले,विकारांनी बेजार झालेले,दुसऱ्यांवर अवलंबून असलेले शरिर. म्हणून मित्रांनो, आळस झाडून टाका. आवडत नसला तरी उतारवयातील त्रास टाळण्यासाठी शरीराला आजच व्यायामाला जुपा. उत्तम आरोग्यासाठी जसे योग्य पण प्रमाणात आहार लागतो तसेच शरीराची क्षमता वाढावी यासाठी व्यायामाची आवश्यकता असते.हीच क्षमता आपली रोगप्रतिकारक शक्ति वाढवत असते.ही शक्ति जर कमी असेल तर मात्र एक दोन नव्हे तर अनेक विकार अगदी सहज जड़तात.पण हीच रोगप्रतिकारक शक्ति जास्त असेल तर विकार चुकुनही आपल्याकडे डोकवनार नाहीत आणि आपण वार्ध्यक्याला सहज,हसत सामोरे जाऊ शकतो. म्हणून आळसाला बाजूला सारा. जास्त वेळ एकाच जागी बसून न राहता चालते फिरते राहा. पडून ना राहता ऍक्टिव्ह व्हा. खाणे मर्यादित ठेवा कारण जास्त खाल्ल्याने सुस्ती येऊ लागते व काम करायचा कंटाळा येऊ लागतो व बसून किंवा पडून राहावंसं वाटायला लागते. कोणतेही काम करण्याचा उत्साह राहत नाही. मित्रहो, आळस माणसाचा शत्रू आहे असे आपण ऐकत आलेलो आहोत ते अगदी खरे आहे. अशा शत्रू ला लांबच ठेवलेले बरे म्हणजे आरोग्य नक्कीच उत्तम राहायला मदत होईल.
Share your comments