पाण्याची सुविधा उपलब्ध असल्यास रब्बी हंगामातील पिकानंतर (उदा. हरभरा गहू करडई इ.) उन्हाळी मूग घेणे फायदेशीर ठरते. मूग हे पीक 60 ते 65 दिवसांत पक्व होते. या काळात पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या देणे गरजेचे आहे.
तसेच उन्हाळ्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश व उष्ण हवामानात हे पीक चांगले असून चांगले उत्पादन मिळते. म्हणून त्यासाठी ऊन्हाळी हंगामासाठी मुगाच्या शिफारशीत वाणांची लागवड करावी. शिवाय या पिकावर उन्हाळ्यात रोगांचे व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येतो.
उन्हाळी मूग हे द्विदल पीक असल्याने त्याच्या मुळावर गाठी असतात. या गाठीमध्ये रायझोबियम हे जिवाणू हवेतील नत्र शोषून घेऊन ते मातीत स्थिर करत असतात व नत्राचा साठा वाढवतात त्यामुळे जमिनीचा कस वाढून हे पीक फायदेशीर ठरते म्हणून सुधारित तंत्राचा अवलंब केल्यास उत्पादनात भरघोस वाढ होते.
मुगाच्या वैभव आणि बी. पी. एम. आर. 145 या जाती रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणारे आहेत. 2 ओळीत 30 सें.मी.आणि 2 रोपात 10 सें.मी.अंतर ठेवून पाभरीने मूग पेरावा. एकरी 5 ते 6 किलो बियाणे लागते. पेरणी केल्यावर पाणी व्यवस्थित देण्यासाठी 4 ते 5 मीटर रुंदीचे सारे ओढून घ्यावेत.
1) मुळकुजव्या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा अधिक 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. मूग पिकासाठी चवळी गटाचे रायझोबियम जिवाणूसंवर्धन वापरावे ट्रायकोडर्मा मुळे बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होते. रायझोबियम मुळे मुळावरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते.
2) मुगा मध्ये विविध जाती उपलब्ध आहेत त्यामध्ये वैभव आणि बी. पी. एम. आर. 145 या जाती रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणारे आहेत. भुरी रोगाला प्रतिकारक्षम आहेत कोपरगाव - 1 याच पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक उत्पादन देणारे आहेत. कोपरगाव - 1 ही जात जुनी असून त्यावर भुरीचा मोठा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे याची लागवड टाळावी.
3) लागवडीपूर्वी पूर्ण कुजलेले शेणखत मिसळावे. या खतामुळे हवेतील ओलावा खेचून मुळांभोवती गारवा निर्माण होतो या पिकासाठी 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद म्हणजेच 100 किलो डीएपी प्रति हेक्टरी द्यावे. शक्यतो रासायनिक खते चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून बियाणे लागत फिरून घ्यावीत. म्हणजे त्याचा चांगला वापर होतो.
4)) सुरवातीपासूनच पीक तणविरहित ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक बाब आहे. 21 ते 22 दिवसांचे असताना पहिली आणि 30 ते 35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी नंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी.
30 ते 45 दिवस तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने आवश्यक असते.
5) पिकास फुले येत असताना आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये ओलाव्याची कमतरता भासू लागते. अशा परिस्थितीत पिकास पाणी देणे आवश्यक आहे. किंवा दोन टक्के युरियाची फवारणी करावी.
महत्त्वाच्या बातम्या
Share your comments