महाराष्ट्रामध्ये उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकरी उसाची लागवड करतात तेव्हा त्याची पूर्णतः उगवण होण्यासाठी सहा ते सात आठवडे लागतात. आपल्याला माहित आहेच की, उसाची सुरुवातीची जी काही वाढ असते ती जोरदार न होता मंद गतीने होते.
याच उसाच्या वैशिष्ट्याचा आपण दोन सऱ्यामधील मोकळ्या जागेत आंतरपीक म्हणून उपयोग करून चांगले उत्पादन मिळवू शकते. या लेखात आपण सुरू उसात घेता येणाऱ्या दोन आंतरपिकांचा विचार करू आर्थिक फायदा देऊ शकतात.
सुरु उसात घेता येणारी महत्त्वाची आंतरपिके
1- सुरु ऊसात भुईमुगाचे आंतरपीक- भुईमूग हे पीक जमिनीची सुपीकता तर वाढवतेच परंतु जास्तीचे उत्पन्न व नफा मिळविण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
उसाचे कोंब जेव्हा जमिनीच्या बाहेर येतात तेव्हा भुईमूग या पिकाची लागवड टोकण पद्धतीने वरंब्याच्या दोन्ही बाजूला करणे गरजेचे आहे. यामुळे भुईमूग पिकाला तुम्हाला योग्य प्रकारचे अन्नद्रव्य व पाणी देण्याची आवश्यकता राहणार नाही.
जे तुम्ही ऊस पिकाला पुरवाल तेच भुईमूग पिकाला देखील मिळेल. भुईमूग पिकामुळे आर्थिक उत्पन्न तर मिळेलच परंतु जमिनीत नत्र स्थिरीकरण झाल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल.
नक्की वाचा:Groundnut Crop: भुईमूग पिकावरील किडीचे करा असे नियंत्रण; मिळेल भरघोस उत्पन्न
2- सूरु उसात कांदा लागवड- जेव्हा ऊस लागवड केल्यानंतर सात ते सात आठवड्यांनी उसाचे कोंब उगवतील तेव्हा कांद्याची रोपे वरंब्याच्या दोन्ही बाजूला लावावी.
यामध्ये देखील ऊसाला जे तुम्ही पाणी आणि खते द्याल त्याचा पाण्यामध्ये आणि खतांचा पुरवठा मध्ये कांद्याचे देखील व्यवस्थित व्यवस्थापन होईल.
तुम्हाला कांद्यासाठी वेगळे काही देण्याची गरज नाही. कांदा पीक घेण्याचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कांद्याची मुळे जमिनीत जास्त खोलवर जात नसल्यामुळे फक्त जमिनीच्या वरच्या थरातील अन्नद्रव्ये शोषण होत त्यामुळे उसावर कुठलाही प्रकारचा वाईट परिणाम होत नाही.
उसाची वाढ सुरुवातीला हळू होते परंतु कांद्याची जलद होते,त्यामुळे तीन ते चार महिन्यात कांदा पिक हातात येते. जर आपण चांगले व्यवस्थापन केले तर एकरी दीडशे ते दोनशे क्विंटल कांदा मिळू शकतो.
Share your comments