कारली हे वेलवर्गीय पीक आहे. साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. कारल्याची लागवड खरीप हंगाम करिता जून. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केली जाते तर उन्हाळी हंगामासाठी जानेवारी ते मार्चपर्यंत लागवड करता येते.
महाराष्ट्रातील बाजारपेठ व निर्यातीचा विचार करता 9 ते10 इंच लांबीची कारली अधिक प्रमाणात विकली जातात. त्यासाठी कोणकोणत्या गांधीचे कारले लागवड केली जाते त्याविषयी जाणून घेऊया...
- हिरकणी: फळे गडद हिरव्या रंगाची व 15 ते 20 सें. मीलांब असतात व काटेरी असतात. सरासरी उत्पादन 130 क्विंटल प्रति हेक्टर एवढे मिळते.
फुले ग्रीन गोल्ड: गडद हिरव्या रंगाची 25 ते 30 सें.मी लांब व काटेरी असतात.हेक्टरी 230 क्विंटल उत्पादन मिळते.
- फुले प्रियंका :या संकरीत जातींची फळे गर्द हिरवा व 20 सें. मीलांब व भरपूर काटेरी असतात. सरासरी उत्पादन 200 क्विंटल प्रतिहेक्टर मिळते.
- कोकण तारा : फळे हिरवी, काटेरी व15 सें. मी. लांबीची असतात फळे दोन्ही टोकाला निमुळती व मध्यभागी फुगीर असतात. सरासरी उत्पादन 15 ते 20 टन प्रति हेक्टर मिळते.
- माहीको व्हाईट लॉन्ग: लागवडीसाठी 75 ते 78 दिवसात पिक काढणीस तयार होते. फळाचा रंग पांढरा, साल मध्यम जाड व भरपूर शिरा असून फळांची लांबी 9 ते 12 इंच असते.
- माहीको ग्रीनलॉन्ग: फळांचा रंग गडद हिरवा वटोकाकडे फिकट असून व इतर वैशिष्ट्य महिको व्हाईट लॉन्ग प्रमाणेच आहेत.
- mbth 101:फळांचे वजन सरासरी 65 ते 70 ग्राम असून फळांची लांबी 18 ते 20 सें. मीअसतेएकरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.
- mbth102: फळाचे वजन सरासरी 100 ते 120 ग्रॅम भरते एकरी 12 ते 14 टन उत्पादन मिळते.
Share your comments