जर आपणास ऊस लागवडीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड होते. एक नगदी पीक असल्यामुळे शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. परंतु जर ऊस पिकाच्या बाबतीत विचार केला तर यामध्ये खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापनात सोबत किड नियंत्रण करण्यासाठी आवश्यक व्यवस्थापन देखील तेवढेच गरजेचे असते. ऊस पिकावर देखील वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
जर आपण वेळीच अशा किडींचा बंदोबस्त केला नाही तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर उत्पादनात फटका बसतो. ऊस पिकावर देखील वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. परंतु त्यामध्ये पाकोळी या किडीचे मोठ्या प्रमाणावर प्रभाव होतो व त्यामुळे ऊस पिकाचे फार नुकसान होते.
उत्पादनात देखील लक्षणीय घट संभवते. त्यामुळे अगदी वेळेत पाकोळी किडीचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे. यासाठी आपण या लेखात पाकोळी किडीचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती घेऊ.
अशा पद्धतीने करा कीडनियंत्रण
पाकोळी कीड किंवा पायरीला या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक आणि जैविक अशा दोन्ही पद्धतींचा वापर करून नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे.
जर तुम्हाला जैविक पद्धतीने पाकोळी कीटकांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर त्यासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा व्हर्टिसिलियम लिकॅनी किंवा मेटारायझियम ॲनोसोप्लि ही जैविक बुरशी 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. फवारणी करताना वापसा परिस्थिती बघून तसेच पावसाची उघडीप बघूनच करावी असे तज्ञांचे मत आहे.
समजा रासायनिक पद्धतीने नियंत्रण करायचे असेल तर यासाठी क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 600 मिली किंवा मोनोक्रोटोफास 36% 200 मिली प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी.
( टीप- शेतकरी बंधूनी पिकावर कोणत्या औषधाची फवारणी करण्या अगोदर कृषी क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे. वरील माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही.)
Share your comments