भेंडीला वर्षभर आणि भरपूर मागणी असते. भेंडीची लागवड मोठ्या कीड व रोगांचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकते.
ठिपक्याची अळी : ही भेंडीवरील सर्वात नुकसानकारक कीड आहे व भेंडीशिवाय कापूस, अंबाडी इत्यादी पिकालासुद्धा ती नुकसानकारक आहे. याची अळी तपकिरी रंगाची असून तिच्या शरीरावर काळे तांबडे ठिपके असतात. ही अळी सुरुवातीला झाडाचा शेंडा पोखरते, त्यामुळे शेंडा वाळून जातो. नंतर अळी कळ्या व फळामध्ये शिरते. त्यामुळे कळ्या व फुले परिपक्व न होताच गळून पडतात. जी फळे झाडावर राहतात ती वाकडी होतात व त्यावर अलीने केलेले छिद्र आणि तिची विष्ठा दिसते व फळे खाण्यास योग्य राहत नाहीत.
घाटेअळी : ही कीड बहुभक्षी असून भेंडीशिवाय कापूस, हरभरा, तूर, टोमॅटो, ज्वारी इत्यादी अनेक पिकावर उपजिविका करते. या किडीची अळी फळे पोखरते व त्यावर उपजिविका करते. या किडीचा मादी पतंग झाडाच्या कोवळ्या शेंड्यावर, काळ्यावर व फळावर अंडी देते. अंड्यातून निघणारी अळी ही फळाचे नुकसान करते. नंतर अळी जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते.
तुडतुडे : तुडतुडे ही भेंडीवरील सर्वात महत्त्वाची रस शोषण करणारी कीड आहे. तुडतुडे पाचरीच्या आकाराचे व हिरवट पिवळे असून पंखावर काळे ठिपके असतात. ते नेहमी तिरके चालतात. या किडीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूस वाढून त्यातील रस शोषण करतात. त्यामुळे सुरुवातीला पाने आकसतात व कडा तपकिरी होतात.
पांढरी माशी : रोगाचा माशी ही भेंडीवरील रस शोषक कीड असून विषाणूजाण्य रोगाचा प्रसार करते. प्रौढ माशी आकाराने लहान असून पंख पांढुरके असतात व शरीरावर पिवळसर झाक असते. डोक्यावर मध्यभागी दोन तांबडे ठिपके असतात. पिल्ले पानाच्या खालच्या बजूने आढळतात. त्यांचा रंग फिकट पिवळा किंवा पिवळा असतो. पांढऱ्या माशीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने रस शोषण करतात. याशिवाय पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने रस शोषण करतात. याशिवाय पिल्ले आपल्या शरिरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात.
त्यामुळे पाने चिकट होतात. त्यावर बुरशीची वाढ होते व पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर अनिष्ठ परिणाम होतो.
मावा : मावा पिवळसर किंवा काळा गोलाकार असून त्याच्या पाठीवर मागच्या बाजूने सूक्ष्म अशा दोन नलिका असतात. मावा व त्यांची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने व कोवळ्या शेंड्यावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात. याशिवाय शरिरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. कालांतराने त्यावर काळी बुरशी चढते व झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
Share your comments