भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणुन ओळखला जातो,ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे आपल्या देशाची अर्थव्यवस्था हि सर्वस्वी शेतीवर अवलंबून आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या हि केवळ शेती करते. शेतकरी अनेक पिकांची लागवड करतात आणि चांगली कमाई करतात. काकडी लागवड देखील आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात देखील काकडी लागवड हि केली जाते, काकडी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्रात लक्षणीय आहे.
काकडीची मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. काकडी हे कच्चे तसेच सलाद म्हणून खाल्ले जाते, तसेच याचा वापर भाज्यात देखील केला जातो. महाराष्ट्रातील कोंकण प्रांतात काकडीची लागवड हि मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रातील जवळपास सर्व भागात याची लागवड हि केली जाते. महाराष्ट्रात जवळपास 3800 हेक्टर क्षेत्रावर काकडीची लागवड हि केली जाते. ह्याची मागणी हि वर्षभर असते आणि महाराष्ट्रातील शेतकरी याची लागवड करून चांगली कमाई करत आहेत. आज आपण काकडी पिकाच्या लागवडिविषयी जाणूण घेणार आहोत. चला तर मग जाणूण घेऊया काकडी पिकाच्या लागवडीविषयी.
काकडी पिकासाठी कसे असावे हवामान आणि जमीन
शेतकरी मित्रांनो काकडी हे एक वेलीवर्गीय पिक आहे. ह्याची लागवड हि मुख्यता उष्ण व कोरड्या हवामानात केली जाते. काकडी पिकासाठी जमीन हि पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी असे सांगितले जाते. जमीन हि मध्यम ते भारी प्रकाराची चालू शकते. मित्रांनो काकडी हि खरीप हंगामात घेतले जाते तसेच याची लागवड हि उन्हाळी हंगामात देखील केली जाते. मित्रांनो पावसाळ्यात म्हणजे खरीप हंगामात काकडी हि जून-जुलैमध्ये लावली जाते आणि उन्हाळ्यात काकडी हि जानेवारी महिण्यात लावले जाते.
काकडीच्या सुधारित जाती
»शीत वाण - काकडीची ही एक सुधारित जात आहे. हि जात सखल मैदानी भागात आणि जास्त पावसाच्या प्रदेशात जसे की कोकण इत्यादी प्रदेशात चांगली वाढते. या जातीची काकडीच्या पिकात 45 दिवसांनी फळधारणा सुरू होते. त्याची फळे हिरव्या मध्यम रंगाची असतात. काकडीचे वजन 200 ते 250 ग्रॅम असते. ह्या जातीपासून प्रति एकरी उत्पादन 10 ते 12 टन असते.
पूना काकडी – हि देखील काकडीची एक सुधारित वाण आहे. ह्या जातीची बाजारात हिरवी आणि पिवळसर लाल अशी दोन प्रकारची फळे उपलब्ध आहेत. ही एक लवकर लावली जाणारी जात आहे. ही जात उन्हाळी हंगामात लावावी असा सल्ला दिला जातो. ह्यापासून हेक्टरी 13 ते 15 टन उत्पादन प्राप्त होते. याची लागवड फायदेशीर ठरते.
Share your comments