रब्बी आणि खरीप हंगामात शेतकरी वर्ग वेगवेगळ्या प्रकारची पिके घेत असतो. त्यात रब्बी आणि खरीप हंगामात शक्यतो ठरलेली पिकेच घेतली जातात उदाहरणार्थ रब्बी हंगामात हरभरा, गहु, ज्वारीआणि खरीप हंगामात सोयाबीन कापूस मूग इत्यादी प्रकारची पिके घेतली जात असतात.त्याबरोबर शेतकरी वर्ग शेतीमध्ये नवनवीन प्रयोग सुद्धा करत आहेत आणि नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेती करत आहेत. या मध्ये भाजीपाला, फळलागवड यांची सुद्धा आता शेती करू लागले आहेत.परंतु दोन्ही हंगामात घेतल्या जाणाऱ्या आणि वर्षभर भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या काकडी विषयी सविस्तर माहिती या मध्ये मिळणार आहे.
हवामान आणि योग्य हंगाम:-
काकडी हे सर्व देशभरात पिकवले जाणारे पीक आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कोकण भागात काकडी चे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच या परिसरात काकडी लागवडी खालील क्षेत्र सुद्धा जास्त आहे.महाराष्ट्रात राज्यात एकूण 3711 हेक्टरावर काकडीचे उत्पादन घेतले जात आहे. काकडीपासून कोशिंबीर बनवली जाते. त्यामुळे ही भाजी आहारात रोज वापरली जाते. त्यामुळे बाजारात सुद्धा काकडी ला नेहमी मोठ्या प्रमाणात मागणी राहते. प्रामुख्याने काकडी हे उष्ण आणि कोरड्या हवामानात पिकवलेले जाणारे पीक आहे. मध्यम दर्जा असलेल्या जमिनित काकडी चे पीक अधिक जोमात वाढते. या करिता पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची गरज असते. जर का रानात पाणी साचून राहिले तर काकडीवर कीड-रोगराईचा चा प्रादुर्भाव होण्याचा मोठा धोका असतो. काकडी हे खरीप आणि उन्हाळ्याच्या हंगामात घेतले जाणारे पिक असून जून-जुलैमध्ये आणि जानेवारीमध्ये उन्हाळ्याच्या हंगामात खरीप हंगामासाठी काकडीची लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते.
या 2 जातीच्या काकडीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन:-
1)थंड भागात घेतले जाणारे उत्पादन – थंड काकडीचे उत्पादन हे जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात घेतले जाते. प्रामुख्याने कोकण भागात या काकडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. लागवडीनंतर 45 दिवसांनी फळ तोडणी लासुरवात होते. त्याची जातीच्या काकडीची फळे हिरव्या रंगाची असतात. एका परिपक्व काकडीचे वजन हे 1500 ते 230 ग्रॅम एवढे असते. तसेच या वाणाच्या काकडीतून प्रति हेक्टरी उत्पन्न हे 30 ते 35 टन मिळते.
2)पूना काकडी – या वाणाच्या काकडीचा रंग हा हिरव्या आणि फिक्कट पिवळा असतो. उन्हाळ्याच्या दिवसात या वाणाच्या काकडीची वाढ जोमात होते तर या काकडीचे उत्पन्न हे प्रति हेक्टरी 13 ते 15 टन मिळते.
काकडीचे बी पेरण्यापूर्वी रानात 50 किलो एन, ५० किलो पी. तर पेरणीच्या 1 महिन्याच्या अंतरावर 50 किलो नायट्रोजन घालावे. तसेच पावसाळ्यात 9 ते 10 दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
तोडणी आणि उत्पादन:-
काकडी ची परिपूर्ण वाढ झाल्यावर तसेच योग्य पोसल्यावरच काकडी ची तोडणी करावी. योग्य पोसलेल्या काकडीलाच बाजारात दर चांगला मिळतो. काकडीची तोडणी ही दर दोन ते तीन दिवसांतुन करावी लागते तसेच बदलत्या हवामानामुळे काकडीचे उत्पन्न हे प्रति हेक्टरी 200 ते 300 क्विंटल दरम्यान बदलते.
Share your comments