गहू हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असून एकंदरीत संपूर्ण भारतामध्ये गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. आपल्याला माहित आहेच की, आपल्या भारतीय दैनंदिन आहारातील गहू हा एक प्रमुख अन्नपदार्थ आहे. त्यामुळे गहू लागवडीच्या माध्यमातून शेतकरी भरघोस उत्पादन घेऊन चांगला नफा देखील मिळवू शकतात. आता काही दिवसांनी गहू लागवडीचा कालावधी जवळ येत असून काही शेतकरी लवकर गव्हाची पेरणी करतात.
त्यामुळे आपण या बाबतीत तज्ञांचा विचार केला तर 20 ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांनी गव्हाची आगात म्हणजेच लवकर पेरणी करावी असा देखील तज्ञांचा सल्ला आहे.
नक्की वाचा:सामान्य गव्हापेक्षा काळ्या गव्हाची किंमत 4 पट जास्त; शेतकरी होणार मालामाल
परंतु अशी पेरणी करताना शेतकरी बंधुंनी गव्हाच्या लवकर पेरणी योग्य जातींची निवड करणे खूप गरजेचे आहे. तसे पाहायला गेले तर गव्हाची पेरणी करण्यासाठी 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर हा काळ उत्तम असतो.
या पार्श्वभूमीवर या लेखात आपण लवकर पेरणी केलेल्या गव्हापासून जास्तीचे उत्पादन हवे असेल तर काही गोष्टींची तंतोतंत काळजी घेणे गरजेचे आहे. या सगळ्या बाबींविषयी या लेखात आपण माहिती घेऊ.
गहू पिकाचे परफेक्ट व्यवस्थापन
1- सध्या ओलावा जमिनीत चांगला असल्यामुळे वेळेवर आणि पुरेसा ओलावा असताना पेरणी करावी.
2- जर पेरणीसाठी सीड ड्रील मशीनचा वापर केला तर पेरणीची योग्य अंतर देखील ठेवले जाते व खत व बियाण्याच्या वापरात बचत होते.
3- जमिनीची निवड करताना ती चिकनमाती युक्त आणि वालुकामय जमिनीची निवड करावी व संबंधित जमिनीचा सामू हा सहा ते साडेसात दरम्यान असावा.
4- गव्हाच्या लागवडीसाठी 20 ते 25 अंश सेंटिग्रेड हे तापमान पेरणीसाठी आवश्यक असते.
नक्की वाचा:आहारात या 6 फळांचे सेवन करा; रक्ताच्या नसा साफ होतील, हार्ट अटॅकचा धोखाही टळेल
5- जेव्हा गव्हाची पेरणी कराल तेव्हा दोन ओळींमधील अंतर साधारणता 18 सेंटिमीटर ते वीस सेंटीमीटर आणि खोली पाच सेंटीमीटर ठेवणे गरजेचे आहे. परंतु उशिरा पेरणी करत असाल तर दोन ओळीतील अंतर 15 सेंटिमीटर ते 18 सेंटिमीटर दरम्यान असावे आणि खोली चार सेंटीमीटर असावी.
6- एका वाणाची निवड करावी. दोन वेगवेगळ्या वानांची एकमेकात मिसळून पेरणी करू नये.
7- जर तुम्ही घरगुती बियाणे पेरणीसाठी वापरायची योजना आखत असाल तर पेरणी करण्यापूर्वी तुमच्या बियाण्याची उगवण क्षमता म्हणजे टक्केवारी तपासून घेणे गरजेचे आहे व ही सुविधा शेतकऱ्यांना सरकारी संशोधन केंद्रामध्ये अगदी मोफत मिळते.
8- गव्हाच्या बियाण्याची उगवण लवकर व्हावी यासाठी बियाणे काहीकाळ पाण्यामध्ये भिजवून सावलीत वाळवावे. या प्रक्रियेला सीड प्राइमिंग असे म्हणतात व याचा खूप मोठा फायदा होतो.
नक्की वाचा:Watermelon Veriety: कलिंगडचे 'हे' वाण देतील बंपर उत्पादन, वाचा 'या' वाणांची वैशिष्ट्ये
Share your comments