लसणाचे मुळ उगमस्थान मध्य आशिया आणि मेडिटरियन प्रदेश समजले जाते. भारत आणि चीन हे लसूण पिकवणारे जगातील प्रमुख देश आहेत. लसूण पिकाचा आपल्या देशात फार प्राचीन काळापासून प्रवेश झाला आहे. या पिकाच्या लागवडीत मध्यप्रदेश आघाडीवर असून त्यानंतर ओडिसा, गुजरात आणि महाराष्ट्राचा नंतर लागतो.
भारतामध्ये असलेल्या लसूण लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे ६० टक्के क्षेत्र या तीन राज्यात आहे. भारतात या पिकाखाली सुमारे ३,१६,९८० क्षेत्र असून त्यापासून १६,१०,६२० टन लसणाचे उत्पन्न येते. महाराष्ट्रात लागवडीचे क्षेत्र आणि उत्पन्नाबाबतीत पुणे जिल्हयाचा अग्रक्रम लागतो. पुणे जिल्हयाशिवाय बीड, सांगली, अहमदनगर, नाशिक, परभणी, उस्मानाबाद, औरंगाबाद, सोलापूर, लातूर, बुलढाणा या जिल्हयांत लसूण पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली २५ हजार ८०० हेक्टर क्षेत्र असून त्यापासून १,३९,६०० टन इतके उत्पन्न मिळते. इतर भाजीपाला पिकाच्या तुलनेत लसूण जास्त काळ टिकवून ठेवता येतो. त्यादृष्टीने लसणाची लागवड अत्यंत फायदेशीर आहे. लसूण निर्यात करून परकीय चलन मिळण्यास उपयुक्त आहे. आजच्या लेखात आपण लसूण लागवडीविषयीची माहिती घेणार आहोत...
हवामान :-
लसूण हे हिवाळी (रब्बी) हंगामात येणारे पीक आहे लसूण हे पीक तापमानाबाबत संवेदनाक्षम आहे. अतिउष्ण तसेच अति थंड हवामान या पिकास मानवत नाही. रात्री व दिवसाच्या तापमानात बराच चढ-उतार असेल तर लसणाची वाढ चांगली होत नाही. समतोष्ण-कोरडे हवामान, भरपूर सुर्यप्रकाश व दिवसाची लांबी अधिक असणे या पिकाच्या वाढीसाठी अनुकूल आहेत. दिवसाचे कमाल तापमान २५” २८ सें.ग्रे. पर्यत व रात्रीचे १० ते १५० सें.ग्रे. तापमानात गड्यांची वाढ चांगली होते. हया गोष्टींचा विचार केला असता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी लागवड केली असता डिसेंबर- जानेवारी हा काळ लसणाचा गड्डा भरण्यास अनुकूल काळ असतो. त्यामुळे महाराष्ट्रात जेथे समशीतोष्ण वातावरण, प्रदीर्घ हिवाळा असतो तेथे लसणाची लागवड फायदेशीर होते.
जमीन :-
लसूण हे कंदवर्गीय पीक असल्याने तसेच मुळया वरच्या भागात असल्याने हलक्या ते मध्यम प्रकारची जमीन चांगली असते. हलक्या व पोयट्याच्या जमीनीत नियमीत पाणी व सेंद्रिय खतांचे प्रमाण चांगले असेल तर गइड्यांची वाढ चांगली होते. अती हलक्या जमिनीत कंद चांगले पोसत नाहीत तसेच भारी जमीनीत पण्याचा उत्तम निचारा न होणाऱ्या जमिनीत १ गड्ड्यांची वाढ मर्यादित असते. गड्डा काढणीच्या वेळी तुटून जमिनीत राहतो व उत्पन्नात घट होते तसेच गड्डा कुजण्याचे प्रमाण हि अधिक आहे.
लागवडीचा हंगाम
लसणाची लागवड रब्बी हंगाम म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर , या काळात करतात. लसणाची पात कडाक्याची थंडी सुरू , होण्यापूर्वी वाढणे आवश्यक आहे. परंतु गड्ड्यांच्या वाढीसाठी मात्र थंड हवामान आवश्यक असते. लागवडीस उशीर झाला तर उत्पन्नात घट येते व गड्डे लहान राहतात. लसणाच्या चांगल्या प्रतीसाठी आणि उत्पादनासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत लागवड करणे योग्य ठरते.
सुधारित जाती
लसणाचे स्थानिक अनेक प्रकार आढळतात. त्यात जांभळा, फिक्कट लाल, गुलाबी व पांढऱ्या रंगाचे बरेच वाण आढळून येतात व त्यात पाकळ्यांचे प्रमाण १६ ते ५० पर्यंत असते. लसणाच्या जामनगर, नाशिक, महाबळेश्वर, मदुराई, हिस्सार लोकल अशा स्थानिक जाती आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे भारतातील आणि महाराष्ट्रातील लसूण लागवड करणाऱ्या निरनिराळ्या भागातून लसणाच्या स्थानिक वाणांचा संग्रह करून त्यातून निवड पध्दतीने अधिक उत्पन्न देणाऱ्या सुधारित जाती विकसीत केलेल्या आहेत. " यामधून गोदावरी, श्वेता, फुले बसवंत व फुले निलिमा या जाती प्रसारीत केलेल्या आहेत व त्यांची महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
गोदावरी
ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विकसित करण्यात आलेली आहे. गड्डा मध्यम आकाराचा असून रंग जांभळा-पांढरा, स्वाद-तिखट, प्रत्येक गड्ड्यात सरासरी २४ पाकळया असतात. गड्डा मध्यम जाडीचा असून जाडी ४.३५ सेंमी. व उंची ४.३ सें.मी. आहे. या जातीचा कालावधी १४० ते १४५ दिवसांचा आहे. या जातीचे सरासरी उत्पन्न १०० ते १५० क्विंटल मिळते. या जातीत रोग व किडींचे प्रमाण कमी असून ही जात साठवणीस योग्य आहे.
नश्वेता
ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विकसित केली आहे. या जातीचा गङ्गा मोठा असून जाडी ५.२ सेंमी व उंची ५ सेंमी आहे. गनुयांचा रंग पांढरा शुभ्र, स्वाद तिखट, आणि एका लसणाच्या गाठीत सुमारे २६ पाकळ्या असतात. या जातीचा कालावधी १३० ते १३५ दिवसांचा आहे. या जातीपासून हेक्टरी सरासरी १०० ते १३० क्विंटल उत्पन्न येते.
फुले निलिमा
ही जात देखील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विकसित केलेली आहे. या जातीचा गाठ आकाराने मोठी, आकर्षक, जांभळ्या रंगाचा असून ही जात जांभळा करपा, फुलकिडे, कोळी या रोग व किडीस मध्यम प्रतिकारक्षम आहे.
फुले बसवंत
हा लसणाचा सुधारित वाण म.फु.कृ.वि, राहुरी अंतर्गत कांदा संशोधन योजना, पिंपळगाव बसवंत, येथून निवड पध्दतीने विकसीत करण्यात आला आहे. या वाणाच्या गडयाचा रंग जांभळा असून पाकळया सुध्दा जांभळ्या रंगाच्या आहेत. सर्वसाधारण एका गड्ढयात २५ ते ३० पाकळया असून सरासरी गडयाचे वजन ३०-३५ ग्रॅम आहे. सरासरी उत्पन्न १४० ते १५० क्विंटल आहे.
अंग्री फाउंड व्हाईट
ही जात एन.एच.आर.डी.एफ नाशिक येथून प्रसारित करण्यात आली आहे. ही जात पांढरे गड्ढे असणारी , स्वाद मध्यम तिखट, गड्डा आकाराने मोठा, घट्ट, जाडी ४ ते ४.५सेंमी व उंची ४.५ सेंमी असते. पाकळयांची संख्या १३ ते १८ च्या दरम्यान असते. ही जात लागवडीपासून १२०- १३५ दिवसात काढणीस तयार होते. हया जातीपासून हेक्टरी सरासरी उत्पादन १३० ते १४० क्विंटल मिळते. हया जातीत रोग व किडींचे प्रमाण कमी असून ही जात साठवणीस योग्य आहे.
यमुना सफेद
ही जात राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठाननाशिक (एन.एच.आर.डी.एफ) या संस्थेने विकसीत केलेली आहे. या जातीचा गड्डा आकाराने मोठा, जाडी ५.६ सेंमी, उंची ५.५ ते ६ सेंमी, गडडा घट्ट, पांढरा, पाकळ्यांची संख्या १५-१६ असून त्या जाड असतात ही जात भारतात सर्वत्र लागवडीसाठी शिफारश करण्यात आली आहे. या जातीचे सरासरी हेक्टरी उत्पन्न १५०-१७५ क्विंटल मिळते. ही जात साठवणीस मध्यम व निर्यातीस योग्य आहे.
जी-२८२
ही जात एन.एच.आर.डी.एफ नाशिक येथून प्रसारित करण्यात आली आहे. या जातीचे गाठी पांढऱ्या रंगाचे असून मोठया आकाराचे, गलयामध्ये १५ ते १६ पाकळया असतात. या जातीपासून १७५ ते २०० विंटल प्रति हेक्टर उत्पन्न मिळते. तसेच निर्यातीसाठी उपयुक्त आहे.
यमुना सफेद-१
ही जात एन.एच.आर.डी.एफ येथून प्रसारित करण्यात आली आहे. या जातीचे गाठी पांढऱ्या रंगाचे असून सरासरी उत्पन्न १५० ते १७५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
यमुना सफेद-२- (जी-५०)
या जातीचे गड्डे आकर्षक पांढरे, प्रति गला ३५-४० पाकळया असतात. या जातीचे सरासरी उत्पन्न १५० ते
२०० क्विंटल मिळते.
बियाणे प्रमाण
लसूण लागवडीसाठी हेक्टरी ५०० ते ६०० किलो बेणे पुरेसे हाते. लागवडीसाठी सुधारित जातीचे शुध्द व खात्रीलायक बेणे वापरावे. मागील हंगामात निघालेले थंड व कोरड्या जागेत साठवलेले बेणे लागवडीसाठी वापरावे. लसणाची लागवड (कुड्या) पाकळया लावून करतात. मोठे, सारख्या आकाराचे, निरोगी गाठी बेण्यासाठी निवडावेत. गनुयातून पाकळ्या अलगद वेगळ्या कराव्यात. पाकळीवरच्या पापुद्रयाला कुठलीही इजा हेणार नाही याची काळजी घ्यावी. सारख्या आकाराच्या टपोन्या (८ ते १० मि.मी लांब) निवडक कुडया/पाकळया लागवडीसाठी वापराव्यात.
लागवड व लागवडीचे अंतर :-
लसणाची लागवड शक्यतो सपाट वाफ्यातच करावी. त्यासाठी जमिनीचा उतार पाहून ३ x २ मी. किंवा २४१ मी. चौ.मी. चे वाफे करावेत. दोन ओळीतील अंतर १५ सेंमी व दोन कुडयातील अंतर ७.५ ते १० सें.मी ठेवावे. लसणाची ची होण्यास मदत होते.
तणनाशकाचा वापर :-
से लसणाची लागवड कमी अंतरावर केलेली असल्याने खुरपणी करताना रोपांना इजा होण्याची भिती असते. तसेच काही वेळा या मजुरांचा तुटवडा असतो. लागवड मोठया प्रमाणावर केलेली कून असल्यास खुरपणी वेळेवर करणे शक्य होत नाही. अशावेळी तणनाशकाचा वापर करणे सोयीस्कर ठरते. लसणाची लागवड झाल्यानंतर २-३ दिवसांनी तणांचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून गोल किंवा ऑक्झीगोल्ड (१-१.५ मिली प्रती लीटर पाण्यात) या तणनाशकाची फवारणी करावी. त्यामूळे ३०ते ४५ दिवस शेत तणमुक्त राहण्यास मदत होते.
पीक संरक्षण :-
रोग व किडीच्या एकात्मीक उपाय योजने अंतर्गत सुधारित वाणांच्या, निरोगी बियाण्यांचा वापर, पेरणीपूर्वी बियाण्याची प्रक्रिया, शेतामध्ये स्वच्छता राखणे, उन्हाळी नांगरट करून, प्राथमिक प्रार्दुभाव टाळणे, पिकांची फेरपालट, हिरवळीच्या खतांचा वापर करणे, तण नियंत्रणाचे उपाय, पेरणीचे वेळी ही दाणेदार किटकनाशकांचा वापर, खतांचा नियंत्रीत वापर आणि गी रोग व किडींचा प्रार्दुभाव दिसून येताच पिक संरक्षक औषधांचा वापर हयांचा सामावेश होतो.
काढणी, उत्पादन व हाताळणी :-
लसणाचे पीक लागवडीपासून सुमारे चार महिन्यात काढणीस तयार होते. थंड हवामानात पीक तयार होण्यास अधिक काळ लागतो. कोरडे हवामान आणि तापमानात वाढ झाल्यास पीक लवकर काढणीला येते. गड्डा पूर्ण भरल्यावर पातीची वाढ थांबते. त्या पिवळ्या पडतात आणि मानेत लुळी पडून रोपे आडवे पडू लागतात. काही दिवसांत पात सुकून जाते. हवामान, जात, जमिनीचा मगदुर इ गोष्टींवर काढणीचा हंगाम असतो. पातीत बारीक गाठ तयार होते. याला लसणी फुटणे असे म्हणतात. १५-२० टक्के लसणी फुटल्यावर पाणी देणे बंद करावे. आणि १० ते १२ दिवसांनी लहानश्या कुदळीने किंवा हाताने गड्डे उपटून काढावेत व पातीसह ४-५ दिवस सुकवून नंतर त्याच्या जुड्या बांधाव्यात. अशा दोन जुड्या एकमेकांना बांधून घ्याव्यात आणि अशा जुड्या छप्परात हवेशीर ठिकाणी बांबूवर किंवा दोरीवर टांगून ठेवाव्यात. अशाप्रकारे तयार केलेला लसूण साठवणीत चांगला टिकून राहतो.
उत्पादन :-
लसणाचे हेक्टरी सरासरी उत्पादन १० ते १२ टनापर्यंत मिळू शकते. गोदावरी आणि श्वेता या सुधारित जातीचे हेक्टरी उत्पादन १० ते १२ टन, फुले निलिमाथे १६ टनापर्यंत उत्पादन मिळते.
प्रतवारी व पॅकिंग :-
माल बाजारात पाठविण्यापूर्वी लसणाच्या जुड्या सोडून, गड्ढे वेगळे करावेत. मानेकडेचा २ सें.मी भाग ठेवून वाळलेली पात कापून काढावी. तसेच मुळ्या पण गड्डयालगत कापून टाकाव्यात, फुटलेले रोगट व अर्धवट गड्डे निवडून वेगळे करावेत. सारख्या आकाराचे व आकर्षक रंगाचे मोठे (३० सेंमी व्यास), मध्यम (२५ मि.मी व्यास) व लहान (१० मी.मी) त्यास अशी प्रतवारी करून माल बाजारात पाठवावा.
-लेखक
1) ज्ञानेश्वर सुरेश रावनकर
(एम.एस.सी, पी. एच.डी. भाजीपाला शास्त्र)
उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
2) प्रा.मयूर बाळासाहेब गावंडे
सहायक प्राध्यापक (उद्यानविद्या विभाग)
श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती
Share your comments