1. कृषीपीडिया

शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीय का? गव्हाच्या MACS 6478 ह्या जातीबिंषयी नाही तर मग तुम्ही हे जाणुन घ्या

भारतात अनेक संस्था ह्या शेतीसाठी विविध योजना आणि पिकांच्या नवीन वरायटी विषयी शोधकार्य करत असतात आणि अशातच भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची (डीएसटी) स्वायत्त संस्था आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट (एआरआय) च्या शास्त्रज्ञांनी 'एमएसीएस 6478' नावाची गव्हाची जात विकसित केली आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
macs 6478 wheat

macs 6478 wheat

भारतात अनेक संस्था ह्या शेतीसाठी विविध योजना आणि पिकांच्या नवीन वरायटी विषयी शोधकार्य करत असतात आणि अशातच भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची (डीएसटी) स्वायत्त संस्था आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट (एआरआय) च्या शास्त्रज्ञांनी 'एमएसीएस 6478' नावाची गव्हाची जात विकसित केली आहे.

भारतात गव्हाची मागणी खुप मोठ्या प्रमाणात आहे. भारताच्या सर्वच भागात गव्हाची मागणी कायम असते आणि गव्हाची लागवड देखील थोड्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र केली जाते. भारतातील प्रमुख गहू उत्पादक राज्ये मध्ये पंजाब, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड इ. राज्यांची गणना होते. महाराष्ट्रात पण गव्हाची लागवड केली जाते. गव्हाची ही अशी जात आहे, ज्यामुळे पिकाचे उत्पादन दुप्पटीने वाढू शकते. प्रत्येकाला माहित आहे की अधिक उत्पादन म्हणजे अधिक नफा, म्हणून कृषी शास्त्रज्ञ देखील गव्हाच्या MACS 6478 व्हरायटीला सर्वोत्तम वाण मानत आहेत.

 

ह्या जातीने महाराष्ट्रात कमाल करून दाखवलीय. हो! ह्या जातीने महाराष्ट्रातील करंखोप ह्या गावात शेतकऱ्यांचे उत्पादन दुपटीने वाढवून दिलय.

 

 

 

जाणुन घेऊया MACS 6478 जातीबद्दल

  • काढलेले नवीन गहू किंवा ब्रेड गहू, ज्याला उच्च उत्पन्न देणारा एस्टिव्हम देखील म्हणतात, 110 दिवसात तयार होतो आणि पान आणि स्टेम रस्ट रोगास प्रतिबंध करतात.
  • रोगास प्रतिकार असलेले हे गव्हाचे रोप मजबूत असते आणि त्यापासून मिळणारे गहु मध्यम आकाराचे असतात. ह्या जातीच्या गव्हाचे पोषणमूल्य इतर जातींच्या तुलनेत जास्त असते. यांच्या गव्हात 14 टक्के प्रथिने, 44.1 पीपीएम जस्त आणि 42.8 पीपीएम लोह असते.
  • या जातीवर एक शोधनिबंध 'करंट इंटरनॅशनल जर्नल ऑफ करंट मायक्रोबायोलॉजी अँड अप्लाइड सायन्सेस' मध्येही प्रकाशित झाला आहे.
  • एका अहवालाच्या आकडेवाडीनुसार, 2025 पर्यंत भारतातील लोकसंख्या सुमारे 1.4 अब्ज इतपर्यंत होऊ शकते, म्हणुन गव्हाची मागणी देखील सुमारे 117 दशलक्ष टनांपर्यंत पोहचू शकते, त्यासाठी उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, बियाण्यांच्या यांसारख्या उत्कृष्ट नवीन जाती यामध्ये उपयुक्त ठरू शकतात.
  • बियाणेसाठी महाराष्ट्र राज्य बियाणे एजन्सी, 'महाबीज' शेतकऱ्यांच्या वापरासाठी 'MACS 6478' चे प्रमाणित बियाणे तयार करत आहे.
English Summary: the wheat species MACS 6478 is useful for farmer Published on: 12 September 2021, 01:42 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters