शेतकरी (farmer) रानात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेत असतो. बऱ्याच वेळा अनेक कारणांनी पिकांची नासधूस होते, पीक पाण्याखाली जातात अशी अनेक वेगवेगळी कारणे आहेत. याचबरोबर रोगराई, पाऊस ही सुद्धा कारणे आहेत.शेती व्यवसायात अनेक वेगवेगळे प्रयोग करून उत्पन्न वाढवले जात आहे. त्यामुळे वेळे ची सुद्धा बचत मोठ्या प्रमाणात होत आहे. आज या मध्ये आपण तुम्हाला स्टॅकिंग या पद्धतीविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.स्टॅकिंग ही पद्धत पालेभाज्या (vegetables) आणि फळभाज्या यांच्यासाठी वापरली जाते. स्टॅकिंग' या पद्धतीमुळे भाजीपाल्याचे उत्पादन वाढते त्याचसोबत नुकसान सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात होते. स्टॅकिंग ही पद्दत जरी तुम्हाला नवीन वाटली तरी शेतकरी वर्गासाठी सर्वात सोपी आणि फायदेशीर अशी पद्धत आहे.
स्टॅकिंग पद्धत नेमकी आहेत तरी काय?
स्टॅकिंग हे ऐकायला जरी नवीन असल तरी ही पद्धत खूपच सोपी आणि सर्वांना माहीत आहे. स्टॅकिंग पद्धतीत बांबूंच्या काठ्यांचा वापर करून वायर किंवा दोरीने जाळे तयार केले जाते.आणि या जाळीवर कारले काकडी दोडका भोपळा अश्या प्रकारच्या वेळी पसरवल्या जातात. अनेक लोक ही पद्धत वापरून भाजीपाला पिकवत आहेत. या पद्धतीचा उपयोग केल्यामुळे पिके ही सुरक्षित राहतात शिवाय किडीपासून पिकांचे संरक्षण करता येते त्यामुळं उत्पादनात सुद्धा वाढ होते.
जाणून घ्या,स्टॅकिंग पद्धत अवलंबण्याची पद्धत:-
स्टॅकिंग’ या पध्दतीने जर तुम्हाला वेगवेगळ्या भाज्यांची लागवड करायची असेल तर सर्वात आधी बांबूचे 10 फुट उंच लाकूड हे 10 फुटाच्या अंतरावर बांधाला पुरावे. त्यानंतर 10 बाय 10 फुटावर हे बांबू गाडावे लागणार आहेत.त्यानंतर या गाडलेल्या बांबूच्या लाकडावर 2-2 फुट उंचीवर तारकिंवा जाळी बांधावी लागणार आहे. हे सर्व उभारून झाल्यावर वेलींना किंवा झाडांना सुतळीच्या किंवा रस्सी च्या साह्याने त्या तारांवर बांधावे . जेनेकरुन वेली किंवा झाडे त्या बाजूने वाढतील. याप्रमाणे झाडांची उंचीही 8 फूट होत असते आणि त्यानंतर झाडे मजबूत होत उत्पन्न अधिक देतात. शिवाय कीड पासून पिकाचे संरक्षण सुद्धा होते.
स्टॅकिंग पद्धतीचा फायदा:-
स्टॅकिंग पद्धतीचा वापर केल्यामुळे झाडांना किंवा वेलींना आधार मिळाल्याने हे झाडे खाली वाकत नाहीत. यामुळे पद्धतीच्या वापर करून आपण टोमॅटो, वांगे, मिरची, सडण्यापासून आणि किडीपासून वाचवू शकतो. वेली फळ भाज्यांचा भार हा फळांमुळे अधिक असतो त्यामुळे वेली एवढा भार सहन करू शकत नाहीत त्यामुळं स्टॅकिंग ही पद्दत उपयोगी ठरते. यामुळं भाजीपाला खराब सुद्धा होत नाही.स्टॅकिंग या मुळे किडीपासून सुद्धा संरक्षण होते.
Share your comments