यातच वैजापूर, जि.औरंगाबाद येथील उद्योजक व संचय अॅग्रो, वैजापूर व ग्रुप ऑफ कंपनी,औरंगाबाद चे संचालक श्री.सागर मंत्री या आंदोलनाचा प्रभाव व त्याचा शेतकऱ्यांना होत असलेला फायदा पाहून थेट बुलडाण्याला रविकांत तुपकरांच्या निवासस्थानी आले. त्यांनी अतिशय आपुलकीने राजस्थानी पद्धतीची पगडी घालून रविकांतभाऊंचा सन्मान केला. तसेच चळवळीला रु.५१ हजारांची मदत देऊ केली.
या आंदोलनामुळे लाखो शेतकऱ्यांचा फायदा होत आहे, याबद्दल त्यांनी कौतुक केले. शिवाय भविष्यात चळवळीला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आपण ती करू असा शब्दही त्यांनी रविकांत तुपकरांना दिला. हा खरंतर एक सुखद धक्का होता. कारण त्यांच्या या कृतीतून शुद्ध हेतूने उभारलेल्या चळवळीची दखल घेणाऱ्या व्यक्ती समाजात आहेत, याची पुन्हा एकदा खात्री पटली. अशा संवेदनशील नागरिकांमुळेच कष्टकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी प्रस्थापित यंत्रणेच्या मुजोरी विरोधात लढा उभारण्याचे काम ताकदीने करता येते,
चळवळीला बळ मिळते. पुढे होऊन लढा देणाऱ्यांच्या मागे उभे राहणाऱ्या लोकांची ही ताकद खूप महत्त्वाची आहे.
आपण आपापल्या कामात कितीही गुंतलेले असलो तरी समाजभान बाळगणे किती आवश्यक आहे, समाजातील विविध घटकांसाठी लढणाऱ्यांना बळ देणे कसे गरजेचे आहे, याचा संदेश श्री. मंत्री यांनी आपल्या कृतीतून समाजाला दिला आहे.
चळवळीतले कार्यकर्ते प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून लढत असतात, याची जाणीव समाजात ठेवली जाते, याचा प्रत्यय आज पुन्हा आला व समाधान वाटले. श्री.सागर मंत्री यांचे चळवळीच्या वतीने आभार मानतो. त्यांनी दाखवलेला विश्वास आम्ही कधीही ढळू देणार नाही, याची खात्री देतो.
Share your comments