अलीकडे औषधी वनस्पतीची व नगदी पिकांची शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत, आणि यातून चांगले उत्पन्न प्राप्त करत आहेत. अशाच औषधी वनस्पतीपैकी एक आहे कोरफड. कोरफडची लागवड अलीकडे मोठ्या प्रमाणात केली जात आहे. शेतकऱ्यांचा कोरफड लागवडिकडे कल वाढला आहे. कोरफड हे एक बहुवार्षिक पीक आहे.
कोरफड हे विदेशातून भारतात आले असल्याचे सांगितलं जाते. पण असे असले तरी हे आता संपूर्ण भारतात थोड्या बहू प्रमाणात आढळते व काही ठिकाणी याची मोठया प्रमाणात शेतीसुद्धा केली जाते. भारतात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, हरियाणा इत्यादी राज्यात मोठ्या प्रमाणात कोरफड आढळून येते.
कोरफड एक औषधी वनस्पती आहे. याच्या पानाचा औषधी वापर केला जातो. कोरफडला आयुर्वेदात मोठे महत्व प्राप्त आहे. याचा उपयोग कॉस्मेटिक बनवणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात करतात. कोरफड हे त्वचेला चकाकी आणते, केसांसाठी सुद्धा कोरफड हि फायदेशीर असल्याचे सांगितलं जाते. त्यामुळे याची मागणी हि संपूर्ण जगात असते. याची मागणी बघता कोरफड लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते आणि शेतकरी यातून चांगले बक्कळ उत्पन्न अर्जित करू शकतात. त्यामुळेच आज आपण कोरफड लागवडीविषयी जाणुन घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया याविषयी.
कोरफडसाठी आवश्यक हवामान
कोरफड हि एक बहुवार्षिक औषधी पीक आहे, याची लागवड हि मुख्यता आर्द्रता असलेल्या, कोरड्या आणि उष्ण हवामानात केली जाते. कोरफड हे कमी पाण्यात जगू शकते त्यामुळे याची लागवड हि बागायती तसेच कोरडवाहू प्रदेशात केली जाऊ शकते, आणि चांगले उत्पादन देखील घेता येऊ शकते. शेतकरी मित्रांनो कोरफडची लागवड हि नेहमी उंच जमिनीवरच केली जावी असा सल्ला कृषी वैज्ञानिक देतात. कोरफड लागवड करण्याआधी पूर्वमशागत चांगली करावी.
पूर्वमशागत
शेतकरी मित्रांनो जर आपणही कोरफड लागवड करण्याचा विचार करत असाल तर पावसाळ्यापूर्वी शेताची पूर्वमशागत उरकवून घ्यावी.
शेत हे एक दोनदा चांगले नांगरून घ्यावे, नांगरणी झाल्यानंतर आपण चांगल्या क्वालिटीचे शेणखत शेतात टाकावे, यामुळे कोरफड हि चांगली वाढते शिवाय यापासून चांगले उत्पादन देखील घेता येऊ शकते. तसे बघायला गेले तर कोरफडची लागवड हि वर्षभर केली जाऊ शकते परंतु वैज्ञानिक हिवाळ्यात याची लागवड न करण्याचा सल्ला देतात. कोरफड लागवडीसाठी सर्व्यात योग्य वेळ हि जुलै-ऑगस्ट दरम्यान असते.
कोरफड लागवड आणि बियाणे
कोरफडची लागवड हि कंद लावून केली जाते. यासाठी 6-8" वाढलेले कंद निवडावेत. 3-4 महिन्यांच्या कंद लागवडीसाठी योग्य असल्याचे सांगितले जाते. एक एकर जमिनीसाठी सुमारे 5000 ते 10000 कळ्या/कंद लागतात.
Share your comments