कांद्याच्या काढणीचा जर विचार केला तर जून ते ऑक्टोबर या काळात कांद्याची काढणी होत नाही. खरिपाचा कांद्याचा विचार केला तर तो ऑक्टोबरनंतर बाजारात यायला सुरुवात होते. साठवणुकीसाठी रब्बी कांदा हा सगळ्यात उपयुक्त असतो. रब्बी कांदा टिकाऊ असल्याने त्याची साठवणूक करता येते. स्थानिक बाजारपेठेत दराची स्थिरता आणि निर्यातीसाठी कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी कांद्याची साठवण आवश्यक असते.
साठवणुकीत कांदा टिकावा म्हणून त्यासाठी आवश्यक त्या प्रमाणे व्यवस्थित नियोजन करावे लागते. एक काढणीपूर्वी नियोजन आणि दुसरे काढणीनंतर त्यात आगोदर पाहू काढणीपूर्वी नियोजन-
काढणीपूर्वीचे नियोजन करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे खरीपात तयार होणाऱ्या जातीचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही. त्या तुलनेने रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातींचा कांदा हा पाच महिन्यांपर्यंत व्यवस्थितरीत्या टिकतो, म्हणून त्याची साठवण करणे शक्य होते. रब्बी कांद्याची साठवण क्षमता ही जातीपरत्वे वेगळी असते. भीमा किरण, भीमा शक्ती या नवीन जातीदेखील साठवणीत चांगला टिकतात. ॲग्री फाउंड लाईट रेड किंवा अर्का निकेतन या जाती सहा महिन्यांपेक्षा जास्त टिकू शकतात.
खते आणि पाण्याचे नियोजन
खतांची मात्रा, खतांचा प्रकार आणि पाणी नियोजन याचा एकंदरीत परिणाम हा पिकांच्या साठवणुकीवर होत असतो. जर पिकांना नत्राचा पुरवठा करायचा असेल तर केवळ तिथे सेंद्रिय खतामध्ये देणे सोयीस्कर ठरते. नत्राचा पुरवठा हा पिकांच्या लागवडी नंतर साठ दिवसांच्या आत करावा. जर कांद्याला उशिरा नत्र दिले तर कांदा हा माने मध्येच जाड होऊन जास्त काळ टिकत नाही. कांद्याच्या साठवणूक करायचे असेल तर त्याला पालाशचा जास्त पुरवठा केला तर पालाश मध्ये साठवण क्षमता वाढते. त्यामुळे रब्बी हंगामातील कांद्याला पालाश खते जास्त प्रमाणात द्यावी. अलीकडे जर आपण पाहिले तर जास्त करून दाणेदार खतांचा वापर केला जातो. या दाणेदार खतांमधून मुख्यत्वे नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा पुरवठा होतो. परंतु गंधकाचा पुरवठा हवा तेवढा होत नाही. गंधक हे साठवणुकीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे कांद्याला लागवडीपूर्वी गंधकयुक्त खत देणे फार फायद्याचे असते.
साठवणुकीवर होणारा पाण्याचा परिणाम
कांदा पिकाला पाणी कशा पद्धतीने देतो, पाणी देण्याचे प्रमाण किती याचा परिणाम देखील साठवणुकीवर होत असतो. दोन्ही पिकांना पाणी कमी परंतु नियमित लागते. कंद पोसत असतांना एकाच वेळी जास्त प्रमाणात पाणी दिले तर माना जाड होतात. तसेच जोड कांद्याचे प्रमाणात वाढ होते. त्यामुळे मुख्यत्वेकरून शेतकरी हे काढण्याअगोदर दोन ते तीन आठवडे पाणी बंद करतात. कारण त्याचा परिणाम हा कांद्याच्या साठवणुकीवर होतो. कांद्याची काढणी ही कांद्याच्या पातीची 50 ते 70 टक्के मान पडल्यानंतर करावी.
काढणीनंतर साठवणुकीची नियोजन
काढणीनंतर कांदा हा पा तीसह सुकू द्यावा. त्यानंतरतीन ते चार सेंटीमीटर लांब मान ठेवून बात कापावे. तसेच जोड, डेंगळे आणि चिंगळे कांदे वेगळे करावेत. राहिलेला उत्तम दर्जाचा कांदा हा १५ दिवस सावलीत ढीग करून सुख वा वा. या पंधरा दिवसाच्या काळामध्ये कांद्याच्या माना वाळून विरघळतात व वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. बराच वेळ शेतकरी हा कांदा काढल्यानंतर तो कापून लगेच कांद्याचा ढीग लावतात.आणि पाती ने त्याला झाकतात. परंतु कांदा काढल्यानंतर तो पानासहित वाढवला तर पानातील अब से सिक ॲसिड पानातून कांद्यामध्ये उतरते. त्यामुळे कांद्याला सूक्तअवस्था प्राप्त होऊन कांदा चांगला टिकतो.
साठवण गृहातील( कांदा चाळीतील) वातावरण
कांद्याच्या चांगल्या साठवणीसाठी साठवण गृहात 65 ते 70 टक्के आद्रता, तापमान हे 25 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावी लागते. नैसर्गिक वायू वजनाचा वापर करून साठवण गृहाची रचना केली तर तापमान व आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणीतील नुकसान टाळता येते.
कांदा चाळ कशी असावी?
नैसर्गिक वायू वी जनावर आधारित कांदाचाळी एक पाखी अथवा दोन पाखी या दोन प्रकारच्या असतात. यामध्ये एक पाखी असलेल्या चाळीची उभारणी दक्षिण उत्तर करावी. दोन पाखी असलेल्या चाळीची उभारणी पूर्व-पश्चिम करावी.चाळीची लांबी ही पन्नास फुटांपेक्षा जास्त असू नये. तळाशी हवा खेळती राहील अशी रचना करावी. चाळीच्या बाजूच्या भिंती या लाकडाच्या किंवा बांबूच्या असाव्यात त्यास फटी असाव्यात. चाळीसाठी जागा निवडताना उंचावरची आणि पाणी साठणार नाही अशी निवडावी. जर चाळीवर सिमेंटचे पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते.चाळीचे छप्पर हे उतरत्या असावे.
Share your comments