1. कृषीपीडिया

मृदा संधारण काळाची गरज

मृदा हे निसर्गाने सजीवांसाठी निर्माण केलेले एक वरदान आहे. रसायनाचा वापर थांबवा, प्लास्टिक वापरणे बंद करा, वृक्ष संवर्धन वाढवा, वृक्षतोड थांबवा, असे केले तरच माती टिकणार आणि आपण सुद्धा.

Soil conservation

Soil conservation

मृदा हे निसर्गाने सजीवांसाठी निर्माण केलेले एक वरदान आहे असे म्हणता येईल. मृदा ही विविध खडकानपासुन तयार होत असते. जसा खडक असेल तसा या मृदेचा प्रकार बनतो. मृदा तयार होण्यासाठी हजारो वर्षांचा काळावधी लागतो. अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्म जीव मृदेमध्ये असतात. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात.

वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय वस्तू, वायू, विविध पदार्थ व अगणित सूक्ष्म जीवांचे मिश्रण असते. जे एकत्रितपणे पृथ्वीवरच्या जीवनास सहाय्यीभूत होतात. नैसर्गिकरित्या असणाऱ्या मातीची चार प्रमुख कार्ये आहेत. ती वनस्पती उगविण्याचे व वाढीचे एक माध्यम आहे. ती पाण्याचे धारण, पुरवठा व शुद्धी करते. पृथ्वीच्या वातावरणात ती बदल घडवून आणते. ती जीवांचे वस्तीस्थान आहे. हे सर्व प्रकार सरतेशेवटी मातीत बदल घडवून आणतात. मातीचे प्रकार रेगुर मृदा, तांबडी मृदा, काळी मृदा इ प्रकार आहेत. मातीस पृथ्वीची त्वचा म्हणतात. तसेच ही एक घन, वायू व पाणी धरून ठेवण्याची एक प्रणाली आहे.

मृदानिर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रीयेमध्ये मूळ खडकाचे विदारण, हवामान व जैविक घटक या सर्व बाबींचा समावेश होतो. ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदानिर्मितीचा कालावधी मोठा असतो. उच्च दर्ज्याच्या मृदेचा कालावधी २.५ सेमीचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदानिर्मितीची प्रक्रिया जलद होत असते.

निसर्ग हा मातीतून निर्माण होत असतो आणि मातीमध्येच विलीन होत असतो. मागील काही वर्षांमध्ये मानवाने अनिर्बंध रासायनिक खते, रासायनिक औषधे, प्लास्टिक वापर, या गोष्टींमुळे माती प्रदूषित होत आहे. प्रचंड वृक्षतोड झाल्यामुळे मोठ्या प्रमानावर माती वाहून जात आहे. रसायनामुळे मातीतील अनेक सूक्ष्मजीव नष्ट होत आहेत. तर प्लास्टिक मातीत मिसळून जैव विविधतेला बाधा आणत आहे. प्रचंड वृक्षतोड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात आहे.

1920 साली या मातिमध्ये 20 मुलद्रव्य जी सजीवांच्या वाढीसाठी उपयुक्त अशी होती. परंतु त्यानंतर ती कमी कमी होत जाऊन आज मातिमध्ये 4 ते 5 मुलद्रव्य राहिलेली आहेत. याचा विपरीत परिणाम सजीवांच्या वाढीवरती होत आहे. यामुळे मातीचे रक्षण करणे गरजेचे बनले आहे.

नागर पर्यावरण चळवळीच्या माध्यमातून आम्ही वृक्ष संवर्धन, प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने, सेंद्रिय शेती, रसायनमुक्त शेती, या प्रकारच्या विविध प्रकल्पावरती कार्य करत आहोत. नागर फौंडेशनच्या वतीने सर्वाना आवाहन करण्यात येत आहे की, रसायनाचा वापर थांबवा, प्लास्टिक वापरणे बंद करा, वृक्ष संवर्धन वाढवा, वृक्षतोड थांबवा, असे केले तरच माती टिकणार आणि आपण सुद्धा.

लेखक : रवी गोरे, नागर फौंडेशन, रवळगाव, अहमदनगर.

English Summary: The need for soil conservation time Published on: 31 January 2022, 11:23 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters