1. कृषीपीडिया

भारतातील सर्वाधिक लाभदायक पिके

आपण सर्वाना ज्ञात आहे की, कृषी हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. व उत्पन्नाच्या दृष्टीनेही कृषी क्षेत्र खुप महत्वाची भूमिका बजावतो. बहुसंख्य देशांची तर अर्थाव्यवस्था ही कृषीवर अवलंबून असते कृषिप्रधान असते. आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील कृषीवर अवलंबून आहे व आपणही कृषिप्रधान देशाच्या यादीत अग्रस्थानी येतो.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
भारतातील सर्वाधिक लाभदायक पिके

भारतातील सर्वाधिक लाभदायक पिके

आपण सर्वाना ज्ञात आहे की, कृषी हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. व उत्पन्नाच्या दृष्टीनेही कृषी क्षेत्र खुप महत्वाची भूमिका बजावतो. बहुसंख्य देशांची तर अर्थाव्यवस्था ही कृषीवर अवलंबून असते कृषिप्रधान असते. आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील कृषीवर अवलंबून आहे व आपणही कृषिप्रधान देशाच्या यादीत अग्रस्थानी येतो.

आज आपण भारतातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची माहिती बघणार आहोत. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे जो की, कृषी क्षेत्रात सामील आहे.  भारताच्या अर्थाव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा खुप मोठा वाटा आहे. समायानुरूप भारतातील शेतीचा खुप मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे आणि अजूनही नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. ज्याने भारतातील कृषी क्षेत्र अधिकाधिक मजबूत होत आहे आणि अन्नधान्यची वाढती मांगणी ह्या क्षेत्राला अजूनच उंची वरती घेऊन जात आहे.  तर मग चला आज आपण माहिती घेऊयात भारतातील सर्वाधिक लाभदायक पिकांची.

भातशेती

यादीत भाताला पहिला क्रमांक दिला. भात हे आत्याधिक खपत होणारे कडधान्य आहे आणि त्यामुळे भाताला आत्याधिक मागणी आहे. हेच कारण आहे की, दुनियाभर भात शेती व्यापक स्वरूपात केली जाते.  भातशेतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.  ही नक्कीच आपल्यासाठी

अभिमानास्पद बाब आहे.आणि भारताच्या एकूण शेतजमिनीचा 1/3 हिस्सा हा भातशेतीने व्यापला आहे.

हे एक खरीप पीक आहे. व भारतात जवळपास 70 कोटींच्या आसपास जनसंख्या भाताचं सेवन करतात.

या पिकासाठी जास्त आदर्ता ची आवश्यकता असते तसेच 22-32°से. ची गरज असते.

भात शेती ही ज्या ठिकाणी पाऊस 150-200 सेमी.असतो त्या ठिकाणी केली जाते.

पश्चिम बंगाल,पंजाब, उत्तर प्रदेश,आंध्र प्रदेश, बिहार ही राज्य भात उत्पादनातं अग्रेसर आहेत.

 

गहु

रबी हंगामातल सर्वात महत्वाचं पीक. भातांनंतर गहुची सर्वात जास्त खपत भारतात होते गहुचे पीक घेण्यासाठी कमी तापमानाची आवश्यकता असते. पेरणीच्यावेळी गव्हासाठी कडक उन्हासोबत 10 ते 15°से. तपमानाची आवश्यकता असते. तसेच पीक काढणीच्या वेळी 21 ते 26°से. तापमानाची आवश्यकता असते.

गव्हाच्या उत्पादनसाठी 75-100 सेमी पावसाची आवश्यकता असते.

गव्हासाठी चांगल्या परतीची पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची आवश्यकता असते.

गव्हाच्या उत्पादनात देखील भारतचा दुसरा क्रमांक लागतो.

उत्तर प्रदेश,पंजाब, मध्य प्रदेश, आणि राजस्थान ही काही राज्य भारतातील प्रमुख गहु उत्पादक राज्य आहेत.

 मका

 मका हे असं पीक आहे ज्याचा उपयोग पशुच्या आहरासाठी तसेच माणसाच्या ही आहारासाठी होतो. मका प्रामुख्याने वर्क खरीप पीक आहे. भात आणि गव्हानंतर मकाच असं पीक आहे ज्याचं सेवन सर्वात जास्त केल जात.

मक्याच्या उत्पादनसाठी मुबलक पावसाची आवश्यकता भासते.मक्याच्या चांगल्या उत्पन्नासाठी 21-37°से. पाण्याची आवश्यकता  असते.

मका उत्पादनात भारत सातव्या स्थानी आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक,मध्यप्रदेश, तामिळनाडू,तेलंगणा हे मका उत्पादनात भारतात अग्रस्थानी आहे.

 

डाळी

यादीत पुढचे पीक आहेत डाळी. डाळी ह्या सर्वात जास्त प्रोटीन देणारे आहारात मोडतात.भारतात उगवली जाणारी काही प्रमुख डाळी उडीद, मुंग, मसूर,वाटाणा, हरभरा इत्यादी.

भारत दाळ उत्पादनात व उपभोग घेण्यात अव्वल स्थानी आहे.

दाळीच उत्पन्न घेण्यासाठी 20 ते 27° से. तापमान चांगले असते.

जवळपास 25सेमी पाऊस पडलेल्या क्षेत्रात डाळीचे उत्पन्नासाठी आवश्यक असते.

English Summary: The most profitable crops in India Published on: 03 July 2021, 09:51 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters