मका हे सर्व तृण धान्यांमध्ये अधिक उत्पादन देणारे पीक आहे. विविध हवामान आणि भौगोलिक क्षेत्रात हे पीक येते. जनावरांसाठी हिरवा चारा व पशुखाद्य मध्ये खुराक म्हणून तसेच औद्योगिक क्षेत्रात मक्याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. मक्याच्या विविध उपयोग यामुळे त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे व बाजारात भाव सुद्धा चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मका लागवड अधिक फायदेशीर होत आहे.या लेखात आपण मक्याच्या काही सुधारित प्रजाती आणि कालावधीनुसार वेगवेगळ्या प्रजाती विषयी माहिती घेऊ.
मक्याचे काही सुधारित वाण
मका लागवडीचे सुधारित जातींचा वापर करणे हे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. मक्याच्या संमिश्र व संकरित जाती या स्थानिक जातींपेक्षा 60 ते 80 टक्के अधिक उत्पन्न देतात. विविध कालावधीमध्ये पक्व होणाऱ्या मक्याचे संमिश्र व संकरित जाती उपलब्ध असून पाऊसमान आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणेयोग्य जातींची निवड करणे फार महत्त्वाचे आहे.
- उशिरा पक्व होणारे वाण(110 ते 120):
अ– संकरीत वाण – पी. एच. एम -1, पी.एस.एम -3,सीड टेक -2324, बायो 9381
एच एम -11, क्यू.पी.एम -7
ब– संमिश्र वाण – प्रभात, शतक -9905
- मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण (100 ते 110 दिवस)
अ– संकरीत वाण : राजश्री, फुले महर्षी, डी एच एम 119, डी एच एम 117, एच.एम 10,एच.एम -8, एच एम 4, पी.एच.एम 4, एम सी एच 37,बायो- 9637
ब ) संमिश्र वाण – करवीर, मांजरी, नवज्योत
- लवकर पक्व होणारे वाण–( नव्वद ते शंभर दिवस )
अ ) संकरीत वाण : जे एच -3459, पुसा हायब्रीड 1, जेके 2492
ब) संमिश्र वाण– पंचगंगा,प्रकाश, किरण
4- अति लवकर पक्व होणारे वाण ( 80 ते 90 दिवस)
अ ) संकरीत वाण – विवेक 9,विवेक 21,विवेक 27, विवेक क्यूपीएम 7
ब ) संमिश्र वाण – विवेक – संकुल
Share your comments