1. कृषीपीडिया

पीक उत्पादनवाढीमध्ये मुळीचे महत्व

वनस्पतींना किंवा पिकांना एकुण दोन प्रकारच्या मुळ्या असतात. एक पांढरी मुळी आणि दुसरी काळी किंवा लालसर रंगाची मुळी या दोन मुलांचे वेगवेगळे फायदे व गुणधर्म आहे ते आपण समजून घेऊयात.

KJ Maharashtra
KJ Maharashtra

वनस्पतींना किंवा पिकांना एकुण दोन प्रकारच्या मुळ्या असतात. एक पांढरी मुळी आणि दुसरी काळी किंवा लालसर रंगाची मुळी या दोन मुलांचे वेगवेगळे फायदे व गुणधर्म आहे ते आपण समजून घेऊयात.

1) पांढरी मुळी:-

पांढरी मुळी ही वनस्पतीचा मुख्य भाग आहे.या मुळीस काही ठिकाणी केशमुळ देखिल म्हणतात. ह्या मुळीचा शेंड्याकडील बराच भाग हा पांढरा असतो. म्हणून ह्या मुळीला पांढरी मुळी म्हणतात. ह्या मुळीचे मुख्य कार्य म्हणजे जमिनितील अन्न व पाणी शोषणे होय. म्हणून या मुळीस वनस्पतीचे खाणारे तोंडदेखिल म्हणतात.

ज्या पिकामध्ये पांढरया मुळांची संख्या जास्त म्हणजे खाणारी तोंडे जेवढी जास्त तेवढ़े त्या पिकांची उत्पादन जास्त व पिके सुदृढ असतात.अशा पीकामध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त असते. वनस्पतींच्या पांढरी मुळीच्या तोंडाजवळ जेवढे अन्न किंवा खत येईल तेवढेच खत किंवा अन्न सदर मुळी शोषण करीत असते. दूरचे अन्न किंवा खत सदर मुळ शोषून घेऊ शकत नाही म्हणून जेवढया पिकास पांढरया मुळ्या जास्त तेवढे पिक जास्त अन्न शोषण करीत असते व तेवढे पिक सशक्त व पिकांचे उत्पन्न जास्त असते.

2) काळी मुळी:-

या काळ्या मुळीस काही ठिकाणी निबर किंवा कठिण मुळी म्हणतात. काळी मुळी ही पांढरया मुळीच्या आकाराच्या मानाने बरयाच मोठया असतात. वेगवगळ्या वनस्पतिमध्ये या मुळांचा रंग वेगवेगळा असतो. या मुळांचे मुख्ये काम पुढीलप्रमाणे असते.

 

A) पांढरया मुळीने शोषलेले अन्न हे वनस्पतीच्या किंवा पिकांच्या पानाकडे पाठवणे.

B) वनस्पतीला किंवा पिकांना मातीशी घट्ट धरून ठेवणे, पिकास किंवा वनस्पतीस आधार देण्याचे मुख्य कार्य या काळ्या मुळ्या करित असतात.

3) मुकुटमुळी:-

पिकामध्ये किंवा वनस्पतीमध्ये सुरुवातीस सुटणारया मुळांना जेटमुळ किंवा सोटमुळ म्हणतात. पिकामध्ये लागणीनंतर काही दिवसांनी फुटवे येतात व त्या फुटव्यांना मुळ्या सूटतात. अशा फुटव्यांच्या सूटलेल्या मुळ्यांना मुकुटमुळी म्हणतात.

 

कार्य:-

पिकांची मुकुटमुळ ही जमिनितील अन्न किंवा खत व पाणी शोषूण त्या त्या फुटव्यांना उपलब्ध करून देतात. यामुळे प्रत्येक फुटवा हा एकसारखा वाढण्यास मदत होते. यामुळे आपल्याला सर्व फुटवे लाभतात व उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होते.

जैवीक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८
प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: The importance of roots in increasing crop yields Published on: 27 July 2021, 12:16 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters