MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

रासायनिक खतांची निवड करतांना खालील बाबींचा आवश्य विचार करावा

दीर्घकालीन पिकांसाठी संयुक्त खतांचा वापर करावा

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
रासायनिक खतांची निवड करतांना खालील बाबींचा आवश्य विचार करावा

रासायनिक खतांची निवड करतांना खालील बाबींचा आवश्य विचार करावा

दीर्घकालीन पिकांसाठी संयुक्त खतांचा वापर करावा (नायट्रो फॉस्फेट १५:१५:१५) (अमोनियम फॉस्फेट २८:२८:०) स्फुरदाची उपलब्धता सुकर होण्यासाठी पूर्णपणे विद्राव्यशील खतांची निवड करावी. उदा. सिंगल सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेटडाळवर्गीय व तेलबियांसाठी गंधकयुक्त खतांचा समावेश करवा. उदा. अमोनियम सल्फेट, सिंगल

सुपर फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट, सल्फेटस्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे Super Phosphate, Ammonium Phosphate, Phosphate Solubilizers to increase the efficiency of Phosphorus. जिवाणू (पि.एस.बी.) खतांचा वापर करावा.

पाहा अशाप्रकारे करते ट्रायकोडर्मा जैविक रोगांचे नियंत्रण

नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवरणयुक्त युरियाचा वापर करावा. (निमकोटेड युरिया, सल्फर कोटेड युरिया).हिरवळीची खते म्हणून गिरीपुष्पाचा किंवा सुबाभळीच्या कोवळ्या फांद्या वापराव्यात.

साखर कारखान्यातील ऊसाची मळी, जिवाणू खत (बायो अर्थ कंपोस्ट) चा वापर करावा.रासायनिक खते कशी द्यावीत: 1. साधरणत: स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त खते एकाच हफ्त्यात पेरणीच्या वेळी आणि बियाण्यापासून ५ सें.मी. खोल द्यावीत.2.नत्रयुक्त खताची पूर्ण मात्रा एकाच हफ्त्यात न देता पिकाच अवस्था लक्षात घेऊन २ अथवा ३ हफ्त्यात द्यावेत.

3.चुनखडी असलेल्या जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर दिल्यास बराच नत्र उडून जातो. म्हणून ही खते जमिनीत मिसळून द्यावीत.4.नत्र वाहून जाऊ नये म्हणून पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे. खते शक्यतो पेरणीच्या वेळी द्यावीत व मातीने झाकावीत.5.पिकाच्या कालावधीप्रमाणे खताच्या मात्रा विभागून देणे फायदेशीर ठरते.

English Summary: The following points should be considered while choosing chemical fertilizers Published on: 19 October 2022, 02:13 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters