नगदी पिकांबरोबरच तृणधान्य पिकांचा कृषी उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. तृणधान्य पिके हे अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न्चे स्रोत आहेत .या तृणधान्य पिकांमध्ये ज्वारी हे महत्वाचे पीक आहे. ज्वारीमध्ये प्रामुख्याने असणाऱ्या लो कॅलरीज मुळे मधुमेह असणारे रुग्ण ज्वारीची भाकरी खाण्यास प्राधान्य देत आहे. त्यामुळे ज्वारीस सध्या चांगला भाव मिळत आहे. महाराष्ट्रात रब्बी ज्वारीखाली गेल्या वर्षी १६.६ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती, यामध्ये २३ टक्के क्षेत्र हलक्या, ४८ टक्के मध्यम तर २९ टक्के क्षेत्र हे भारी जमिनीखाली होते. यामधून राज्याला १७.४ लाख टन ज्वारीचे उत्पादन मिळाले.
राज्यातील एकूण ज्वारीच्या क्षेत्रापैकी २५ % क्षेत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विकसित वाणाखाली आहे. यामध्ये १० टक्के क्षेत्र फुले रेवती, ९% क्षेत्र फुले वसुधा आणि ६ % क्षेत्र इतर वाणाखाली आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या ज्वारीच्या वाणामुळे व उत्पादन तंत्रामुळे ज्वारीची उत्पादकता या दशकात दुप्पट झाली आहे. ही उत्पादकता विद्यापीठातील ज्वारीचे वाण फुले अनुराधा,फुले सुचित्रा, फुले वसुधा, फुले रेवती व रब्बी ज्वारीच्या पंचसूत्री तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे झाली आहे. या पंचसूत्रीमध्ये मूलस्थानी पाणी व्यवस्थापन, जमिनीच्या खोलीनुसार वाणांची पेरणी, पेरणी नंतर ओलावा व्यवस्थापन(आंतरमशागत), एकात्मिक खत व्यवस्थापन आणि एकात्मिक पीक संरक्षण केल्याने ज्वारीच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे.
सदरील पंचसूत्री तंत्रज्ञान खालील प्रमाणे
v रब्बी ज्वारीचे पंचसूत्री तंत्रज्ञान(१००% उत्पन्नात वाढ) १. मूलस्थानी पाणी व्यवस्थापन : (३० % उत्पन्नात वाढ ) २. जमिनीच्या खोलीनुसार वाणांची निवड : (२५ % उत्पन्नात वाढ ) ३. पेरणी नंतर ओलावा व्यवस्थापन(आंतर मशागत) : (२० % उत्पन्नात वाढ ) ४. एकात्मिक खत व्यवस्थापन : (१५ % उत्पन्नात वाढ ) ५. एकात्मिक पीक संरक्षण व्यवस्थापन : (१० % उत्पन्नात वाढ ) |
१.मूलस्थानी पाणी व्यवस्थापन: (३० % उत्पन्नात वाढ )
- जुलै च्या दुसऱ्या पंधरवाड्यात जमिनीच्या मगदुरानुसार १० X १० मीटरचे सपाट वाफे तयार करणे किंवा सऱ्या पाडणे व पावसाचे पाणी मुरविणे.
- पेरणीचा कालवधी – १५ सप्टेबर ते १५ ऑक्टोबर
- पेरणीचे अंतर : ४५ x १५ से.मी.
- बियाणे : १० किलो /हेक्टरी
२.जमिनीच्या खोलीनुसार वाणांची पेरणी : (२५ % उत्पन्नात वाढ )
१. |
हलकी जमीन ( खोली ३० से.मी) |
फुले अनुराधा, फुले माऊली |
२. |
मध्यम जमीन (खोली ६० से.मी) |
फुले सुचित्रा, फुले माऊली,परभणी मोती,मालदांडी ३५-१, |
३. |
भारी जमीन ( ६० से.मी पेक्षा जास्त) |
सुधारित वाण: फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.व्ही२२, पी.कें.व्ही.क्रांती, परभणी मोती, संकरित वाण:सी.एस.एच.१५ आणि सी.एस.एच. १९ |
४. |
बागायतीसाठी |
फुले रेवती, फुले वसुधा,सी.एस.व्ही.१८, सी.एस.एच.१५, सी.एस.एच. १९ |
५. |
हुरड्यासाठी |
फुले उत्तरा,फुले मधुर |
६. |
लाह्यांसाठी |
फुले पंचमी |
७. |
पापडासाठी |
फुले रोहिणी |
३.पेरणी नंतर ओलावा व्यवस्थापन( आंतर मशागत): (२० % उत्पन्नात वाढ )
- विरळणी – पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी रोपांची संख्या १.४८ लाख/हेक्टरी ठेवणे
- आवश्यकते नुसार एक ते दोन वेळा खुरपणी करणे.
कोळपणी –
- पहिली पेरणीनंतर तीन आठवड्यानी फटीच्या कोळप्याने करावी.
- दुसरी कोळपणी पेरणीनंतर पाच आठवड्यानी पासच्या कोळप्याने करावी,
- तिसरी कोळपणी आठ आठवड्यानी दातेरी कोळप्याने करावी
- पाणी उपलब्धते नुसार व्यवस्थापन
- पाणी उपलब्ध असल्यास पिकास ३० ते ३५ दिवसांनी पहिले पाणी (गर्भ अवस्थेत)
- दुसरे पाणी ५० ते ५५ दिवसांनी पीक पोटरीत असताना
- तिसरे पाणी ७० ते ७५ दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना
- चौथे पाणी ९० ते ९५ दिवसांनी (चिकात असताना) दयावे.
- जर दोन पाणी उपलब्ध असल्यास ३० ते ३५ दिवसांनी व ५५ दिवसांनी पेरणीनंतर दयावे.
४.एकात्मिक खत व्यवस्थापन: (१५ % उत्पन्नात वाढ )
- कोरडवाहू: खते पेरणीच्या वेळेसच प्रती हेक्टरी दयावे
- हलकी जमीन : २५ किलो नत्र ( १ गोणी युरिया)
- मध्यम जमीन: ४० किलो नत्र(पावणे दोन गोण्या युरिया)+२०किलो स्फुरद(अडीच गोण्या सिंगल सुपर फॉसपेट)
- भारी जमीन : ६० किलो नत्र (दोन गोण्या युरिया)+ ३० किलो स्फुरद (चार गोण्या सिंगल सुपर फॉसपेट)
- बागायत: नत्राची अर्धी मात्रा,संपूर्ण स्फुरद व पालाशची मात्रा पेरणीच्या वेळेस आणि उर्वरित नत्राची मात्रा
पेरणीनंतर एक महिन्याने द्यावी.
- मध्यम जमीन : ८० किलो नत्र (तीन गोण्या युरिया)
+ ४० किलो स्फुरद (पाच गोण्या सिंगल सुपर फॉसपेट)
+ ४० किलो पालाश (दीड गोणी म्युरेट ऑफ पोटॅश)
- भारी जमीन : १०० किलो नत्र ( पाच गोण्या युरिया)
+ ५० किलो स्फुरद (सहा गोण्या सिंगल सुपर फॉसपेट)
+ ५० किलो पालाश (पावणे दोन गोण्या म्युरेट ऑफ पोटॅश)
५. एकात्मिक पीक संरक्षण : (१० % उत्पन्नात वाढ )
- खोडमाशीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस ३५ % प्रवाही ७५० मि.ली. ५०० लिटर पाण्यातून प्रती हेक्टरी फवारणी,पेरणीनंतर १५ दिवसांनी करावी.
- खडखड्या रोग नियंत्रणासाठी ५ टन तूर काट्याचे शक्य झाल्यास आछादन करावे.
- काणी रोगाच्या नियंत्रणासाठी ४ ग्रम गंधक प्रती किलो बियाणे बीजप्रक्रिया करावी.
अशारीतीने एकात्मिक कीड व रोगाचे नियंत्रण केल्यास ज्वारीच्या उत्पादनात १० % वाढ झाल्याचे दिसून आले.
या पंचसुत्री तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ज्वारीचे भरघोस उत्पन्नात वाढ होईल
लेखक -
डॉ. आदिनाथ ताकटे, मृद शास्त्रज्ञ मो.९४०४०३२३८९
महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी
Share your comments