1. कृषीपीडिया

'इको-पेस्ट ट्रॅप' सेंद्रीय शेतीतील चिकट सापळा, खर्च होईल कमी

शेती करत असताना शेतीचा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी अनेक प्रयत्न करत असतात. सेंद्रिय शेतीमध्ये पैशांची बचत होत असते. कारण त्यात आपण आपल्या जवळ उपलब्ध होणाऱ्या गोष्टींपासून शेती करत असतो. या शेती मधील एक सोपा आणि कमी खर्चातील पर्याय म्हणजे, इको पेस्ट ट्रॅप हे कीटकनाशक ऐवजी उपयोगी ठरते. तर यामध्ये आपण इको पेस्ट ट्रॅप, चिकट सापळाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
'इको-पेस्ट ट्रॅप'

'इको-पेस्ट ट्रॅप'

शेती करत असताना शेतीचा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी अनेक प्रयत्न करत असतात. सेंद्रिय शेतीमध्ये पैशांची बचत होत असते. कारण त्यात आपण आपल्या जवळ उपलब्ध होणाऱ्या गोष्टींपासून शेती करत असतो. या शेती मधील एक सोपा आणि कमी खर्चातील पर्याय म्हणजे, इको पेस्ट ट्रॅप हे कीटकनाशक ऐवजी उपयोगी ठरते. तर यामध्ये आपण इको पेस्ट ट्रॅप, चिकट सापळाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.

शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व एकात्मिक किड नियोजन करून मानवी शरीराला हानिकारक रासायनिक कीडनाशकांचा कमी वापर करून दर्जेदार शेती उत्पादनासाठी इको-पेस्ट ट्रॅप' हा कमी खर्चात अत्यंत प्रभावी कीड व रोग नियंत्रणासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान आहे.

इको-पेस्ट ट्रॅप' हा प्रकाश सापळा, चिकट सापळा आणि कामगंध सापळा याचे संयुक्तरित्या काम करते. पिवळ्या आणि निळा रंगाचा चिकट सापळा दिवसा शेतात उडणारे हानिकारक कीटक उदा. पांढरी माशी, तुडतुडे, फळ माशी, फुलकिडे, पंखाचा मावा, नागअळी ची माशी व इतर उडणारे बारीक कीटक त्याला आकर्षित होऊन चिटकतात. तसेच मीज माशी,खोड किडीची माशी, कंदमाशी याचाही यामध्ये समावेश होतो.

 

या सापळ्यात ठराविक प्रकाश तिव्रतेचा व स्वयंचलीत लाईट लावलेला असून तो अंधार पडल्यावर प्रकाशमान होऊन रात्री संचार करणारे विविध प्रकारचे गळ्याचे पतंग जसे की गुलाबी बोंडआळी पतंग, अमेरिकन बोंडआळी पतंग, टिपक्याची बोंडआळी पतंग , फळ पोखरणाऱ्या अळीचा पतंग, शेंडे पोखरणाऱ्या अळीचा पतंग, पाने गुंडाळणाऱ्या अळीचा पतंग उडणारे कीटक हे प्रकाशामुळे आकर्षित होऊन सापल्याला चिटकतात.

हेही वाचा : खरीप हंगाम पूर्वतयारी : प्रकाश सापळेद्वारे हुमनी किडीचे नियंत्रण

 इको-पेस्ट ट्रॅप' सापल्यातील दिवा स्वयंचलित असल्याने संध्याकाळी स्वयंप्रकाशित होतो व सकाळी सूर्योदयानंतर बंद होतो. हा सापळा फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही कीड नियंत्रणाचे प्रभावी काम करतो. त्यामुळे कीड नियंत्रणासाठी एक प्रभावी कमी खर्चाची उपायोजना आहे.

 

वापर करण्याची पद्धत -

एकरी पाच ते दहा लावून द्यावे लागतात. आपण पुन्हा वापरात आणू शकतो. हे 2 AA पेन्सिल वर चालतात. हे सेल 20 ते 25 दिवस चालतात. सर्व पिकांमध्येये लावण्यास उपयुक्त आहे.

गोपाल उगले

9503537577

English Summary: The 'eco-paste trap' will reduce the cost of organic farming Published on: 03 July 2021, 08:22 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters