राज्यात तूरीनंतर खरीप हंगामातील महत्त्वाची पिके म्हणून मूग व उडदाकडे पाहिले जाते. या पिकांची लागवड मुख्य किंवा आंतरपीक म्हणूनही केली जाते. परंतु मागील काही वर्षांत हमीभावापेक्षा कमी दर, उशिरा पडणारा पाऊस, पावसाचा खंड आदी कारणांमुळे दिवसेंदिवस या पिकांची पेरणी घटत आहे.साधारणपणे या पिकांचा कालावधी दोन ते अडीच महिन्यांचा असतो. कमी कालावधीमध्ये येणारी व अधिक आर्थिक नफा मिळवून देणारी पिके म्हणून मूग आणि उडदाकडे पाहिले जाते. पेरणीयोग्य पाऊस पडल्यावर व जमीन वापसा स्थितीत आल्याबरोबर शक्यतो जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत या पिकांची पेरणी पूर्ण केली जाते.
परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाचे उशिराने आगमन, पावसात पडणारा खंड तसेच विशेषतः ऑगस्ट महिन्यात होणारी अतिवृष्टी याचा परिणाम मूग उडीद पिकाच्या लागवडीवर होऊ लागला आहे.पाऊस उशिरा झाल्यामुळे उत्पादकतेबाबत अस्पष्टता येते. जून महिन्यात लागवड झाल्यानंतर साधारणतः ऑगस्ट महिन्यात पीक काढणीला येते. परंतु याच काळात अतिवृष्टी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुगाची काढणी करता येत नाही. पावसामुळे परिपक्व झालेल्या शेंगा फुटतात. फुटलेल्या शेंगातील दाणे शेंगांमध्येच उगवतात. परिणामी संपूर्ण पीक वाया जाते किंवा उत्पन्न कमी मिळते.
परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाचे उशिराने आगमन, पावसात पडणारा खंड तसेच विशेषतः ऑगस्ट महिन्यात होणारी अतिवृष्टी याचा परिणाम मूग उडीद पिकाच्या लागवडीवर होऊ लागला आहे.पाऊस उशिरा झाल्यामुळे उत्पादकतेबाबत अस्पष्टता येते. जून महिन्यात लागवड झाल्यानंतर साधारणतः ऑगस्ट महिन्यात पीक काढणीला येते. परंतु याच काळात अतिवृष्टी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुगाची काढणी करता येत नाही. पावसामुळे परिपक्व झालेल्या शेंगा फुटतात. फुटलेल्या शेंगातील दाणे शेंगांमध्येच उगवतात. परिणामी संपूर्ण पीक वाया जाते किंवा उत्पन्न कमी मिळते. अनेक भागात पडणारा दुष्काळ, पावसाचा ताण यामुळे देखील मूग, उडीद लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा कमी झाला आहे.
सरकारकडून केवळ हमीभाव देण्याचा आव : नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती कमी उत्पादन येते. अशा परिस्थितीतही या मालाला चांगला भाव मिळत नाही. मागील हंगामात केंद्र सरकारने मुगासाठी ७२७५ रुपये हमीभाव जाहीर केला होता. मात्र बाजारात दर ६५०० रुपयांच्या दरम्यान मिळाले. सरकारने केवळ खरेदीचा आव आणला. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला नाही. तर उडदालाही ६३०० रुपये हमीभाव होता. मात्र बाजारात दराने ६ हजारांचा आकडाही पार केला नाही.या कारणांमुळे घटतेय लागवड- एकीकडे पावसाने नुकसान, दुसरीकडे कमी दर- जून, जुलै ही उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी लागवडीची वेळ- वेळेत पावसाअभावी पेरणीची वेळ संपते- तुरीच्या आंतरपिकातून, कोरडवाहू कपाशीतून उत्पादन मिळते
Share your comments