उन्हाळा असो वा पावसाळा, कांद्याशिवाय क्वचितच एखादी भाजी बनवली जातं असेल. कांद्याशिवाय भाजीच बनत नाही असंच म्हणावं लागेल. आज आपण अशाच बहुउपयोगी कांद्याच्या जातीविषयी (Onion Species) जाणुन घेणार आहोत. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात शेतकरी कांद्याची लागवड (Onion Cultivation) करतात.
उळे पेरणीच्या वेळी योग्य वाणांची निवड केली तर शेतकरी कांदा लागवडीतून चांगला नफा कमवू शकतो. कांद्याच्या जरी बाजारात अनेक जाती उपलब्ध असतील, तरी आम्ही तुम्हाला आज बंपर उत्पादन देणाऱ्या टॉपच्या सर्वात प्रगत जातींबद्दल (Top Onion Species) माहिती सांगणार आहोत.
पुसा लाल
या जातीच्या कांद्याचा रंग लाल असतो. एका हेक्टरमध्ये किमान 200 ते 300 क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता ह्या जातीच्या कांद्यात असते. साठवणुकीसाठी काही विशेष जागेची आवश्यकता नसते, कांदा कुठेही साठवला जाऊ शकतो. एका कांद्याचे वजन साधारण 70 ते 80 ग्रॅम असते. ह्या जातीच्या कांद्याचे पीक हे 120-125 दिवसात तयार होते.
भीमा सुपर
छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये खरीप हंगामात लागवडीसाठी या लाल कांद्याची वाण ओळखली जाते. ह्या जातींचा कांदा रांगडा म्हणूनही लावता येतो. हे खरिपामध्ये 22-22 टन/हेक्टर आहे. आणि जर रांगडे म्हणुन लावले तर 40-45 टन/हेक्टर पर्यंत उत्पन्न देते. खरिपामध्ये ह्या जातींचे पिक 100 ते 105 दिवसांत काढणीस तयार होते आणि रांगडे म्हणुन लावल्यास 110 ते 120 दिवसात काढण्यास तयार होते.
भीमा लाल
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात रब्बी हंगामात ही वाण घेतली जाते. ही वाण दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आणि तामिळनाडू येथे खरीप हंगामात पिकवली जाते. या जातीच्या वाणीच्या उळ्याची पेरणी खरीप हंगामाच्या उत्तरार्धातही करता येते. हे पीक खरीपमध्ये 105-110 दिवसांत आणि रांगडे आणि रब्बी हंगामात 110-120 दिवसात पिकते. खरिपाचे सरासरी उत्पादन हेक्टरी 19-21 टन आहे. आणि रांगड्या हंगामात 48-52 टन/हेक्टर आणि रब्बी हंगामात 30-32 टन/हेक्टर एवढे उत्पादन देण्यास ही वाण सक्षम आहे. हे रबी हंगामध्ये जर लावले तर 3 महिने साठवले जाऊ शकते.
भीम श्वेता
पांढऱ्या कांद्याची ही जात रब्बी हंगामाबरोबरच खरीप हंगामातही घेता येते. ह्या जातीची लागवड खरीप हंगामात छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये केली जाते. 110-120 दिवसात ह्या जातींचे पीक काढणीसाठी तयार होते. ह्या वाणीचे कांदे जवळपास 3 महिन्यांसाठी साठवले जाऊ शकते. खरिपात त्याचे सरासरी उत्पादन हेक्टरी 18-20 टन असते आणि रबीमध्ये 26-30 टन/हेक्टर उत्पादन देते.
Share your comments