हळदीचा उपयोग स्वयंपाक घरात तसेच औषधी म्हणून देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतकऱ्यांसाठी सुद्धा हळदीची ची लागवड उपयुक्त सिद्ध होत आहे. केरळमधील कोझिकोड येथे असलेल्या भारतीय मसाला अनुसंधान संस्थान यांच्या संशोधनातून विकसित केली गेलेली हळदीची एक विशेष वरायटी शेतकऱ्यांना चांगला नफा देत आहे.
या जातीला संस्थानने 1996मध्ये विकसित केले होते. या खास विकसित केलेल्या जाती चे नाव आहे प्रतिभा,ही जात कमी वेळात काढणीस तयार होते. या लेखात आपण या जाती विषयी माहिती घेऊ.
हळदीच्या प्रतिभा या जातीचे वैशिष्ट्ये
अति मसाला अनुसंधान संस्थांचे सीनियर सायंटिस्ट डॉ.ली.जो. थॉमस यांनी कृषि जागरण सोबत बोलताना सांगितले की, हळदीची ही जातीमध्ये दुसऱ्या जातीच्या तुलनेत कंद सडण्याची समस्या कमी असते. तसेच ही जात 225 दिवसांमध्ये काढणीस तयार होते. दुसऱ्या जातीच्या तुलनेत या जाती मध्ये कर्क्युमिन 6.52 टक्क्यांपर्यंत असते
तसेच ओलिओरेसिन 16.2 टक्के, सुगंधित तेल ची मात्रा 6.2 टक्क्यांपर्यंत आढळते. या जातीच्या रोपांची उंची 42.9सेंटीमीटरपर्यंत असते. तसेच या जातीचा कंद फायबर युक्त आणि जाड असतो.
ही जात देऊ शकते 52 टनांपर्यंत उत्पादन
डॉ. थॉमस यांनी सांगितले की हळदीचे प्रगत जात आहे. ही जात फार कमी वेळात काढण्यास तयार होते. तसेच ची लागवड खरीप हंगामात जून ते जुलै दरम्यान करता येते.
जर पाण्याची सोय चांगली असेल तर मे जून महिन्यामध्येहळदीच्या या व्हरायटी ची आगात लागवड करता येते. प्रतिभा या जातीच्या हळदीची लागवड आंध्र प्रदेश,तेलंगणा आणिकेरळ सोबतच देशातील विविध राज्यांमध्ये करता येऊ शकते. हळदीच्या या जातीपासून प्रति हेक्टरी 39 ते 52 टन उत्पादन मिळू शकते.
Share your comments