भारतात केळी ह्या फळपिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते विशेषतः महाराष्ट्रात ह्याचे उत्पादन जास्त घेतले जाते. महाराष्ट्रातील खान्देश प्रांत खासकरून जळगाव जिह्वा केळी उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे इतकेच नाही तर येथील केळी पिकाला जीआय टॅग पण देण्यात आला आहे. केळीची मागणी ही जवळपास वर्षभर बाजारात बनेलेली असते जर आपणही केळी लागवडीच्या तयारीत असाल तर सर्वात आधी जाणुन घ्या केळीच्या ह्या सर्वोत्कृष्ट जातीविषयी.
भारतात सुमारे केळीच्या 500 जातींचे उत्पादन घेतले जाते परंतु आपल्या भारत देशात भाषिक विविधता असल्यामुळे एकाच जातीची वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. केळीचे झाड हे फांद्या नसलेल्या नरम खोडपासून तयार होते, ज्याची उंची 1.8 मीटर ते 6 मीटर पर्यंत असू शकते. केळीच्या स्टेमला फॉल्स स्टेम किंवा व्हर्च्युअल स्टेम असेही म्हणतात कारण ते पानांच्या खालच्या भागाच्या संग्रहातून तयार होते. खरे पाहता केळीचे स्टेम जमिनीच्या खाली आहे ज्याला rhizome म्हणतात.
त्याच्या मध्यवर्ती भागातून फुल निघतात. भारतात, केळी वेगवेगळ्या परिस्थितीत आणि उत्पादन पद्धतीनुसार पिकवली जातात, त्यामुळे केळीच्या जातींची लागवड ही शेतकरी वेगवेगळ्या हेतूसाठी करतात जसे की काही शेतकरी केळी ह्या बिना पिकवण्याची कच्चीच बाजारात विकतात तर काही शेतकरी पिकवून खाण्यासाठी बाजारात विकतात. असं सांगितले जाते की भारतात सुमारे 20 प्रजाती व्यापारी दृष्टीने महत्वाच्या आहेत आणि शेतकरी ह्या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड करतो.
व्यापारी दृष्टी महत्वाच्या केळीच्या जाती
ड्वार्फ कॅव्हेंडिश (एएए)
ड्वार्फ कॅव्हेंडिश भारतात अनेक प्रांतात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते जसे की बसराई, जहाजी, काबुली, पाचा वझाई, मारिसस, मॉरिस कुझी वझाई सिंधुर्णी आणि सिंगापूरी. ही भारतातील एक महत्त्वाची व्यापारी हेतूसाठी पिकवली जाणारी केळीची वाण आहे. ह्या जातींचे केळीचे झाड अगदी लहान असते, ह्याच्या नावात पण ह्याच कारणास्तव ड्वार्फ शब्द टाकला गेलाय. ह्या जातीची केळी ही सुमारे 1.5-1.8 मीटर उंच असतात.
फळे लांबलचक, वाकलेली असतात. झाडाची साल हलकी पिवळी किंवा हिरवी रंगाची असते, केळी ह्या खायला अतिशय गोड आणि खूपच मऊ असतात. केळीच्या घडाचे वजन सुमारे 20-25 किलो असते, ज्यामध्ये साधारणपणे 120-130 केळी लागलेल्या असतात. ह्या जातीच्या केळीचे पिकचक्र साधारणपणे 10-12 महिन्यांचे असते. ह्या जातीच्या केळीचे उत्पादन जवळपास एकूण केळी उत्पादनाच्या 58% इतके आहे. म्हणुनच ह्या केळीला व्यापारीक दृष्टया खुप महत्व आहे.
रोबस्टा: (एएए)
ह्या जातीची पण प्रांतनुसार वेगवेगळी नावे आहेत जसे की जायंट कॅव्हेंडिश, पोचो, वलेरी बॉम्बे ग्रीन, पेड्डापाचा आरती, हरीचल आणि बोरजाहाजी इ. ही जात आपल्या देशात पश्चिम बेटांमधून आली आहे. त्याचे फळ बॉम्बे हारा प्रजातीसारखे आहे, परंतु पिकल्यावर झाडाची साल त्याच्या तुलनेने हिरवीच राहते. ह्या जातींचे केळीच्या झाडांची उंची बसराईपेक्षा उंच आणि ग्रँडनीपेक्षा लहान आहे. ह्या जातींचे झाड 1.8-2.5 मीटर एवढे उंच असते.
केळीच्या घडाचे वजन 25-30 किलो असते. ह्या जातीच्या फळाचा आकार चांगला असतो आणि किंचित वाकलेला असतो. ह्या केळीचे पीक चक्र सुमारे एक वर्षाचे असते. ही जात ओल्या भागात सिगाटोका रोगास बळी पडते तर पनामा विल्टला प्रतिरोधक आहे. Rhizome रॉट रोग हा ह्या जातीला लवकर लागतो.
लाल केळी (AAA)
ह्या जातीची वनस्पती साधारणतः 3.5-4.5 मीटर उंच असते. फळांचा रंग पिकल्यावर लाल होतो. म्हणुनच ह्या केळीला लाल केळी असे म्हणतात. फळ लांब आणि जाड असते. सालही जाड असते. केळी मधून हलक्या केशर रंगाची असते,ही केळी सुगंधित वास करतात खायला देखील गोड असतात.
Share your comments