1. कृषीपीडिया

Jasmine cultivation! एकदा मोगरा लावा आणि घ्या दहा वर्षे उत्पन्न

सध्या महाराष्ट्रातील बरेच शेतकरी फुल शेतीकडे वळत आहेत. फुलांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जातींची लागवड केली जाते. परंतु मोगरा शेती हा फुलशेतीतील शेतकऱ्यांना उत्तम प्रकारचा पर्याय आहे. मोगरा शेती चे वैशिष्ट्य म्हणजे हे पीक एकदा लावले तर कमीत कमी दहा वर्षाचे उत्पादन घेता येते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
jasmine flower

jasmine flower

सध्या महाराष्ट्रातील बरेच शेतकरी फुल शेतीकडे वळत आहेत. फुलांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जातींची लागवड केली जाते. परंतु मोगरा शेती हा फुलशेतीतील शेतकऱ्यांना उत्तम प्रकारचा पर्याय आहे. मोगरा शेती चे वैशिष्ट्य म्हणजे हे पीक एकदा लावले तर कमीत कमी दहा वर्षाचे उत्पादन घेता येते.

कमी पाण्यात शाश्‍वत उत्पन्नाचा मोगरा हमखास मार्ग आहे. मोगऱ्याच्या फुलाला बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळे भावही चांगल्या पद्धतीचा मिळतो. मोगरा साठी ठिबक सिंचनाचा वापर केला तर उत्तम असते. कारण त्याची एकदा लागवड केली तर कमीत कमी दहा वर्षांपर्यंत उत्पन्न घेता येते. या लेखात आपण मोगरा लागवडीची माहिती घेऊ.

मोगरा या फुलपिकाची लागवड

  • मोगरासाठी लागणारी जमीन- तसे पाहिले तर मोगरा सर्व प्रकारच्या जमिनीत चांगला येतो. तरी पण मध्यम खोलीची आणि भुरकट जमीन असली तर उत्तम.जमिनीत चुनखडी नसावी तसेच जमीन चांगल्या पाण्याचा निचरा होणारी असावी. जर मुरमाड आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असली तर मोगरा पिक उत्तम मिळते.
  • मोगरा लागवड कालावधी- जर मोगऱ्याच्या लागवडीचा विचार केला तर साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर किंवा जून जुलै महिन्यामध्ये मोगरा फुल शेती ची लागवड करणे उत्तम असते.जर मोगऱ्याच्या एका एकर साठी रोपांच्या संख्येचा विचार केला तर कमीत कमी चार हजार पाचशे रोपेएका एकर साठी लागतात. लागवड करताना दोन वाफे मधील अंतर पाच फूट आणि दोन रोपांतील अंतर दोन फूट असणे आवश्यक असते.
  • मोगरा शेती साठी खतांची आवश्यकता- जेव्हा मोगरा लागवडीच्या आधी आपण जमीन तयार करतो, तिची मशागत करतो. तेव्हा एका एकर साठी आठ टन शेणखत, 180 ते 200 किलो एस एस पी खत, 200 किलो नीम पेंड, 125 किलो करंजी पेंडल इत्यादी प्रकारच्या खतांचा उपयोग करावा. तसेच तीनशे किलो सुटला खताचा वापर करावा.
  • मोगऱ्याचे तोडणी तंत्र- मोगरा उत्पादन चालू झाल्यानंतर मोगरा फुलांची तोडणी सकाळी सात ते नऊच्या दरम्यान करणे फायद्याचे असते. तोडणी केल्यानंतर त्याची उत्तम प्रकारे पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवावी लागतात. जर मोगर्‍याचा मार्केटमध्ये भावाचा विचार केला तर एका किलोला दोनशे रुपयांपेक्षा जास्त भाव मिळतो. एका एकर मागे 25 किलो दररोज मोगऱ्याच्या कळ्या मिळतात.. लागवड केल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये छाटणी करावी लागते. जर आपण विचार केला तर आठ महिन्यांमध्ये सरासरी सहा टन उत्पादन अपेक्षित असते.
  • मोगरा लागवडआधीची तयारी- साधारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीत जमीन पंचवीस ते तीस सेंटिमीटर खोल नांगरून घ्यावी. त्यानंतर तीन कुळवाच्या पाळ्या घालून जमीन चांगली सपाट करून घ्यावी. नंतर पाच बाय पाच फूट अंतरावर एक बाय एक बाय एक फूट आकाराचे खड्डे खोदावेत. नंतर हे खड्डे भरताना तळाशी वाळलेले गवत, काडीकचरा सहा इंचापर्यंत भरावा. नंतर एक पार्टी पूर्ण कुजलेले शेणखत किंवा एक मूठभर गांडूळ खत टाकून खड्डा भरून घ्यावा.
  • मोगरा साठी आवश्यक हवामान-मोगरा पिकाला जास्त थंडी चालत नाही. अगदी स्वच्छ वातावरणात मोगरा चांगला येतो.तसेच मोगऱ्याची चांगली वाढ होण्यास 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान योग्य ठरते.
  • मोगऱ्याच्या उपयुक्त जाती-
  • मोतीचा बेला- या जातीच्या मोगऱ्याची कळी गोलाकार असते आणि फुलात दुहेरी पाकळ्या असतात.
  • बेला- या जातीच्या मोगऱ्याच्या फुलाला दुहेरी पाकळ्या असतात परंतु त्या जास्त लांब नसतात.
  • हजर बेला- या जातीच्या मोगऱ्यालाचांगल्या प्रकारच्यापाकळ्या असतात.
  • शेतकरी मोगरा-या प्रकारच्या मोगऱ्याला चांगल्या प्रतीच्या पाकळ्या येत असून हार व गजरे याकरता वापरला जातो.
  • बटमोगरा- बटमोगरा जातीच्या कळ्या आखूड असून कळ्या चांगल्या टणक फुगतात.
English Summary: technque of jasmine flower crop cultivation and management Published on: 02 November 2021, 12:40 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters