कोथिंबीरची पाने आणि बियाणे वापरली जातात, यामुळे जेवणाला चव येते. पाने कच्ची पण खाल्ली जातात, कोथिंबीर फार महाग विकली जाते. कधीकधी ते तीनशे ते चारशे रुपये प्रति किलोने विकले जाते. साधारणपणे कोथिंबीर लागवडीनंतर त्याची पाने दिसायला साधारण एक ते दीड महिना लागतो. पण आज आम्ही तुम्हाला एक पद्धत सांगणार आहोत ज्याने तुम्ही फक्त दोन आठवड्यांत कोथिंबीर पिकवू शकता. यामुळे कोथिंबीरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.
जाणुन घ्या काय आहे पद्धत
कोथिंबीरच्या बियाण्याचे, धनियाचे दोन तुकडे करा
कमी वेळात कोथिंबीर पिकवण्यासाठी,आधी तुम्हाला कोथिंबीरचे दोन तुकडे करावे लागतील. आपण घरी उपलब्ध कोथिंबीरचे बीयाणे देखील वापरू शकता, फक्त बियाणे जास्त जुने नसावे. कोथिंबीर चिरडण्यासाठी, आपण हलक्या हातांनी लाटणे चालवून त्याचे दोन तुकडे करू शकता. असे केल्याने कोथिंबीर लवकर उगते.
दोन तुकडे केलेले कोथिंबीरचे बियाण्याचे तुकडे पाण्यात भिजवा
यानंतर, कोथिंबीरचे तुकडे फुगण्यासाठी पाण्यात सोडा. ते किमान 12 तास भिजू द्या म्हणजे ते फुगतील. हे केल्याचा फायदा असा आहे की जेव्हा कोथिंबीर पेरली जाते आणि जमिनीच्या आत जर्मीनेशन प्रक्रियेसाठी बियाणे फुगण्यासाठी लागणारा वेळ, तो वेळ वाचतो. कोथिंबीरीची रोपे या पद्धतीने लवकर अंकुरीत होतात.
त्यानंतर भिजवलेले बियाणे सुती कपड्यात बांधून ठेवा
कोथिंबीर चांगली फुगल्यानंतर, त्यातील सर्व पाणी काढून टाका आणि सुती कापडाने चांगले गुंडाळून ठेवा. यासाठी आजकाल दुकानांत उपलब्ध असलेल्या कॉटनच्या पिशव्याही वापरता येतील. यानंतर एअर टाइट कंटेनर घ्या. यासाठी मिठाईसाठी वापरली जाणारी प्लास्टिकचे डबे वापरता येतील. यानंतर, हा बॉक्स व्यवस्थित बंद करा आणि अशा ठिकाणी ठेवा जिथे थेट सूर्यप्रकाश येत नसेल. हे केल्याने, कोथिंबीरचे बियाणे वाळते आणि मुळे त्याच्या आत वाढू लागतात. साधारणपणे तीन ते चार दिवसांनी ते अंकुरायला सुरू होते.
आता बियाणे लागवड करा
कोथिंबीर तीन ते चार दिवसात रुजते कारण ती कापसाच्या कापडाने प्लास्टिकच्या एअर टाइट कंटेनरमध्ये गुंडाळलेली असते. यानंतर, ते बाहेर काढा आणि ते जिथे लावायचे आहे त्या ठिकाणी हळूच सोडून द्या आणि ते पसरवा. थोडी काळजी घ्या आणि हलके हाताने हे करा कारण कोथिंबिरीची मुळे तुटण्याचा धोका असतो. ते जमिनीत टाकल्यानंतर, वरून भुसभूशीत मातीने झाकून टाका. नंतर त्यावर हलके पाणी शिंपडा. जर असे केले तर कोथिंबीरची रोपे 10 ते 12 दिवसात तयार होतात. एका आठवड्यानंतर कोथिंबीर खाण्यायोग्य बनते.
Share your comments