साधारण कारल्याच्या तुलनेत आकाराने लहान असलेल्या कार्याला त्याच्या उंदरासारखे आकारामुळे चुहा कारले या नावाने ओळखले जाते.अशा कारल्याची लागवड मंडप पद्धतीने केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. बाजारात जवळपास 5 ते 45 सेंटिमीटर लांब व 45 ग्रॅम पासून 850 ग्रॅमपर्यंत वजनाची कारली उपलब्ध आहेत. तसे पाहायला गेले तर कारले पिकाचे जवळपास 16 हून अधिक प्रकार उपलब्ध आहेत.फळांचा रंग, आकार आणि हरणाच्या खडबडीतपणा यानुसार प्रत्येक विभागातील ग्राहकांच्या आवडी वेगळी असू शकतात.
कारले कडू असले तरी त्यातील कर्बोदके,प्रथिने,खनिजे,अ आणि क जीवनसत्व यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेआवर्जून कारल्याची भाजी खाल्ली जाते.अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा या राज्यांमध्ये काही प्रमाणात कारल्याची लागवड केली जाते. या लेखात आपण कारले लागवड सुधारित तंत्रज्ञान जाणून घेणार आहोत.
कारले लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान
- जमीन:
1-कारले लागवडीसाठी चांगला निचरा होणाऱ्या,भुसभुशीत,मध्यम ते भारी जमिनीत लागवड करावी.
- जमिनीचा सामू हा 5.5 ते 6.5पर्यंत असावा.
- चोपण जमिनीमध्ये कारल्याची लागवड करू नये.
- जमीन चांगल्याप्रकारे उभी-आडवी नांगरून घ्यावी.
- हेक्टरी 20 टन चांगले कुजलेले शेणखत टाकून कुळवणी करून घ्यावी.
हवामान:
- उष्ण व दमट हंगामातील पीक असून थंडीच्या पिकाच्या वाढीवर परिणाम होतो.
- चांगल्या उगवणक्षमता यासाठी किमान दहा अंश सेल्सिअस तापमान असणे गरजेचे आहे.
- फुले आणि वाढीसाठी 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान फायदेशीर ठरते. कमी तापमान आणि जास्त पाऊस असलेल्या भागात सुद्धा लागवड केली जाऊ शकते.
- 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात मादी फुले,फळधारणा आणि झाडाच्या वाढीवर परिणाम होतो तसेच विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
3-हंगाम:
1-उन्हाळी हंगामात म्हणजेच जानेवारी ते मार्च महिन्यात लागवड करावी.
2-जास्त थंडी असल्यास फेब्रुवारी महिन्यात लागवड करावी.
खरीप हंगाम: जून आणि जुलै महिना लागवडीसाठी योग्य आहे.
- लागवडीसाठी अंतर: दोन ओळीतील अंतर साडेतीन ते पाच फूट आणि दोन वेलीतील अंतर दोन ते तीन फूट ठेवावे.
4- लागवड:
1-महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी-फुले प्रियंका,फुले ग्रीन गोल्ड, फुले उज्वला व हिरकणी या जाती लागवडीसाठी योग्य आहे.
2- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ची कोकण तारा ही जात चांगली आहे.
3- केरळ कृषी विद्यापीठाची प्रीती, प्रिया
4- याशिवाय कोईमतूर लॉंग,अर्का हरित,पुसा दो मोसमी, पुसा विषेश, सिलेक्शन चार, 5, सहा याजाती आहेत.
- बियाणे प्रमाण हेक्टरी दीड ते दोन किलो
5- पाणी व्यवस्थापन:
1-कारली हे वेलवर्गीय पीक असून कमी किंवा जास्त पाण्याचा ताण सहन होत नाही.
2-फळधारणा अवस्थेत दोन ते पाच दिवस आला गरजेनुसार पाणी दिल्याने उत्पादनामध्ये वाढ होते.
- खत व्यवस्थापन:
- चांगले कुजलेले शेणखत 20 टन प्रति हेक्टर
- लागवड करतेवेळी 100:50:50 किलो नत्र स्फुरद पालाश प्रती हेक्टर
- नत्राचा डोस दोन ते तीन वेळेस विभागून द्यावा.
- विद्राव्य खतांचा वापर उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरते
- आंतर मशागत
- 15 ते 20 दिवसांच्या अंतराने खुरपणी करून वेली भोवतालची तणे काढून घ्यावी.
- जमीन भुसभुशीत ठेवा.
- कारली हे वेलवर्गीय पीक असून वेलींना आधार दिला असता त्यांची वाढ चांगली होते.नवीन फुटीच्या वाढीला चांगला वाव मिळतो.फळधारणा चांगली होते.त्यामुळे दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळण्याकरिता वेलीला मंडपकिंवा तारेच्या ताटीच्या आधाराने वाढवणे फायदेशीर ठरते.
- काढणी:
- साधारणपणे ते पंधरा ते वीस दिवसात फुल लागल्या नंतर फळ काढणीसाठी येतात.लागवडीपासून 60 ते 75 दिवसांत किंवा फुले लागल्यानंतर फळे वेगाने विकसित होतात.बाजारपेठेनुसार आवश्यक निकषाप्रमाणे फळे मिळवण्यासाठी बारकाईने लक्ष देऊन वारंवार काढणी करावी लागते.
- फळ चमकदार हिरवे,जाड आणि लज्जतदार असावी. बिया भाऊ आणि पांढऱ्या असाव्यात.
- दोन-तीन दिवसांच्या अंतराने कात्री किंवा धारदार चाकूच्या साह्याने कारली फळांची काढणी करावी.हेक्टरी 15 ते 20 टन उत्पादन मिळते.संकरित जातीची लागवड आणि उत्कृष्ट व्यवस्थापनात उत्पादनामध्येवाढ शक्य होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
Share your comments