जर आपण भारताचा विचार केला तर शेतकरी अनेक प्रकारचे वेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करून शेती करीत आहे. त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पन्नातही वाढ होत आहे. महाराष्ट्रात प्रमुख यांनी ऊस, कापूस, कांदा सारख्या नगदी पिकांची लागवड करून त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु आता भारतातील शेतकरी बऱ्यापैकी मोत्याच्या शेतीकडे वळला आहे. या लेखात आपण मोत्यांची शेतीनक्की काय असते याबद्दल माहिती घेणार आहोत.
मोत्यांची शेती आपल्याला अधिक उत्पन्न देऊ शकते. आता बऱ्याच प्रमाणात शेतकरी मोत्याच्या शेतीकडे वळत आहेत. ही शेती कमी मेहनतीत आणि कमी खर्चात अधिक नफा देऊ शकते. मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण ओरिसाच्या सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ फ्रेशवॉटर ऍक्वाकल्चर, भुवनेश्वर ओरिसा येथे दिले जात होते. परंतु आता देशाच्या इतर राज्यातही या शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. शेतकऱ्यांसाठी काम करणारी संस्था किसान हेल्पलाइन मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण देत आहे. या शेतीसाठी चा योग्य काळ हा ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान असतो. साधारण दहा फूट रुंद आणि दहा फूट खोल मोठ्या आकाराच्या तलावात मोत्यांची शेती केली जाते.
मोती संवर्धनासाठी 0.4 ट्रॅक्टरच्या छोट्या तलावात 25000 शिंपल्यातून मोत्यांचे उत्पादन केले जाते. ही शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना शिंपले खरेदी करावे लागतात. यानंतर प्रत्येक शिंपल्यात छोटीशी शल्यक्रिया झाल्यानंतर त्यात चार ते सहा मी व्यास वाले डिझाईन बीड सारखे गणेश, बुद्ध, पुष्पा च्या आकाराच्या आकृत्या टाकल्या जातात व त्यानंतर शिंपले बंद केले जातात. या शिंपल्यांच्या नायलॉन बॅग मध्ये दहा दिवसांपर्यंत एंटीबायोटिक आणि प्राकृतिक चाऱ्यावर ठेवले जाते. दररोज त्याचे निरीक्षण केले जाते आणि मृत शिंपल्याना काढले जाते. त्या शिंपलेना तलाव टाकले जाते. त्यांना नायलॉनच्या बॅगेत ठेवून बांबू किंवा बॉटल च्या साह्याने लटकवले जाते. तलावाच्या एका मीटर आत सोडले जाते. प्रति हेक्टर 20 हजार ते 30 हजार सिपच्या दराने यांचे पालन केले जाते. शिंपल्याच्या आतील निघणारा पदार्थ बीडच्या चहूबाजूने लागत असतो.
जो शेवटी मोतीच रूप घेत असतो. साधारण आठ ते दहा महिन्यानंतर शिंपल्यांच्या बाहेर येत असते. एक शिंपल्याची किंमत वीस ते तीस रुपये आहे. बाजारात एक मी.मी ते वीस मी.मी मोतीचा दाम हा साधारण तीनशे रुपये ते पंधराशे रुपये असतो. सध्या डिझाईन मोतीना खूप मागणी असून त्यांना बाजारात खूप दर मिळत आहे. विशेष म्हणजे देशातील बाजारापेक्षा परदेशात मोत्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात केला जाते. इतकेच काय शिंपल्यांनाही बाजारात मोठी मागणी असते.शिंपल्यांपासून सजावटीच्या वस्तू तयार केल्या जात असतात. शिंपल्यांपासून कन्नोज मध्ये परफ्यूम तेल काढले जाते.
कुठे घेऊ शकतात मोत्याच्या शेतीचे प्रशिक्षण?
सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ फ्रेशवॉटर ऍक्वाकल्चर, भुवनेश्वर (ओडीसा) येथे मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. ही संस्था ग्रामीण भागातील तरुणांना आणि शेतकऱ्यांना मोती उत्पादनाचे प्रशिक्षण देते.
Share your comments