शेवग्याचे रोप लावल्यानंतर व्यवस्थापन उत्तम असेल तर जास्तीत जास्त दोन ते तीन महिन्यातशेवगा झाडाची उंची तीन ते चार फुटांपर्यंत वाढते.शेवग्याचे रोप तीन ते चार फुट वाढल्यानंतर त्याचा तीन फुटांवर शेंडा छाटावा.कारण शेंडा छाटला नाही तर ते सरळ उंच वाढते.
रोपाचा शेंडा छाटल्यानंतर खोडावर तसेच शेंड्या जवळून त्याला फांद्या फुटतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक खोडावर चार ते पाच फाद्या ठेवाव्यात.शेवग्याची लागवड केल्यानंतर पाच ते सहा महिन्यांपासूनच फुले येण्यास सुरवात होते.झाडे लहान असल्याने तसेच त्याची शाखीय वाढ जास्त होत असल्यानेसुरुवातीची फुले गळतात. क्वचित एखाद्या फुलाचे रूपांतर शेंगेत होते.अर्थात नंतर च्या फुलांचे रूपांतर शेंगांमध्ये होते.फुलधारणा होत असताना फांदीवर प्रत्येक पानाच्या देठाजवळ फुलांचा गुच्छ येतोआणि त्यापासून फळधारणा होते.फुलांपासून शेंगा तयार होण्याचे प्रमाण तीन ते पाच टक्के असते. रोपांची लागवड केल्यानंतर योग्य व्यवस्थापन असेल तर पाच ते सहा महिन्यांनी फुले येऊन आठ ते नऊ महिन्यात पहिले उत्पादन मिळते.
शेवगा पिकाचे व्यवस्थापन अशा पद्धतीने करावे
- जून जुलै मध्ये लागवड केलेल्या झाडाचा पहिला बहर मार्च-एप्रिल या महिन्यात संपतो.त्यानंतर झाडाची छाटणी केली पाहिजे.छाटणी करताना प्रत्येक फांदीवर तीन ते चार डोळे ठेवून, म्हणजेच खोडापासून सर्वसाधारणपणे दोन ते तीन फूट लांबीवरफांदी कापावी.म्हणजे छाटणीनंतर खोडावर चार ते पाच फांद्या दोन ते तीन फूट लांबीच्या ठेवाव्यात.
- दरवर्षी छाटणी सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या शेवटी तापमान कमी झाल्या नंतरच करावी. तसेच छाटणी लवकर किंवा उशिरा करून बाजारपेठेच्या मागणीनुसार शेंगांचे उत्पादन घेता येते.वर्षातून एकदा छाटणी करावी.
- छाटणी झाल्यानंतर आलेल्या फांद्या जास्त वाढत असल्यास त्यांचा वरचा शेंडा खुडावा,जेणेकरून झाडांची उंची वाढणार नाही, तसेच शेंगा झाडाच्या खालच्या बाजूला येथील.छाटणी करताना झाडांची साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
- छाटणीनंतर अडीच ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि दोन मिली क्लोरोपायरीफॉसप्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- शेवग्याला वर्षातून दोनदा बहार येतो,त्यामुळे प्रत्येक बहर घेताना खतांचा वापर करणे गरजेचे आहे.छाटणी केल्यावर मात्र वर्षातून एकदा शेणखत वापरावे.शेणखताचा बरोबरच रासायनिक खतांचा वापर करावा.एकरी माती परीक्षणानुसार 50 किलो युरिया, 150 किलो सुपर फॉस्फेट आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे खत द्यावे.त्यानंतर 30 ते 40 दिवसांनी परत एकदा एकरी 50 किलो युरिया द्यावा.जमिनीचा प्रकार आणि झाडाची वाढबघून युरिया खताचे प्रमाण कमी जास्त करावे.
- पहिला बहर निघाल्यानंतर नवीन पालवी फुटून फुले येऊ लागतात.अशा वेळी परत एकरी 50 किलो युरिया,150 किलो सुपर फॉस्फेट आणि 50 किलो पोटॅश द्यावे.सदरचे खत जमिनीमध्ये मिसळले जाईल याची काळजी घ्यावी.पहिल्या खताच्या हप्त्याच्या नंतर पुन्हा 30 ते 40 दिवसांनी एकरी 50 किलो युरिया द्यावा.
- रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे या मुळेशेंगाचे प्रमाण,रंग,चकाकी आणि प्रत सुधारते. शेवग्याचा शेंडा जास्त वाढत असल्यास नत्र खताचा वापर कमी करावा.शेंगांची फुगवण कमी होत असल्यास, तसेच फुलगळ कमी होऊन शेंगांची संख्या वाढविण्यासाठी स्फुरद खतांचा जास्त वापर करावा.
- शेवगा पिकावर रोग किडींचे प्रमाण कमी असते. परंतु खतांचा असंतुलित वापर किंवा आरोग्य व्यवस्थापनामुळे रोग किडींचे प्रमाण वाढू शकते. शेवग्यावर मुख्यता वाळवी,पाने खाणारी अळीकिंवा शेंगा कुरतडणारी अळी, तसेच करपा आणि डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होतो.कीड,रोगाचा प्रादुर्भाव ओळखूननियंत्रणाचे उपाय करावेत.
- करपा रोगाच्या नियंत्रणासाठी एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.मुळकुजविशेषता भारी जमिनीत येते. फ्युजॅरियम या बुरशीमुळे मूळकूजहोऊन रोपे लहानपणीचे मरतात. तसेच मोठी झाडेही वाळतात. त्यासाठी लागवडीच्या वेळी खड्डा भरताना शेणखता बरोबर दहा ग्रॅमट्रायकोडर्मा पावडर मिसळावी.
Share your comments