भारतात शेतकऱ्यांचे उत्पन्न हे गेल्या अनेक वर्षापासून कमालीचे कमी होतांना दिसत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर तसेच यासाठी निसर्गाचा लहरीपणा (The whimsy of nature) देखील कारणीभूत आहे. तसं बघायला गेलं तर भारत हा कृषिप्रधान देश आहे. मात्र, कृषिप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती ही खूपच दयनीय आहे. असे असले तरी अनेक शेतकरी बांधव या विपरीत परिस्थितीचा सामना करत शेतीमधून लाखोंचे उत्पन्न कमवत आहेत. अनेक शेतकरी बांधव पारंपारिक पीक पद्धतीत बदल करून डिमांड मध्ये असलेल्या पिकाची लागवड करून मोठी कमाई करत आहेत. आज आपण अशाच एका डिमांडमध्ये असलेल्या पिकाची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण साग लागवड (Teak planting) विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी बांधव साग लागवडीच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई अर्जित करत आहेत, शेतकरी बांधवांनो आपण देखील साग लागवड करून लाखो रुपये कमवू शकता. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया साग लागवडीतील काही बारकावे.
केव्हा केली जाते साग लागवड
मित्रांनो संपूर्ण भारतवर्षात (All over India) साग लागवडीसाठी अनुकूल वातावरण (Favorable environment) असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे याची लागवड आपल्या देशात सर्वत्र बघायला मिळते. महाराष्ट्र राज्यात (In the state of Maharashtra) देखील सागाची लागवड केली जाऊ शकते. साग लागवड हे प्रामुख्याने सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात केल्यास याच्या झाडाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होते. असे असले तरी शेतकरी बांधव याची लागवड वर्षभरातून कधीही करू शकतात. कृषी वैज्ञानिकांच्या मते (According to agricultural scientists) ज्या जमिनीत साग लागवड करायची असेल त्या जमिनीचा पीएच (Ph) अर्थात सामु 6.5 ते 7.5 या दरम्यान असावा. जर आपण अशा जमिनीत टाकायची लागवड करावी तर त्यापासून चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते, म्हणजे अशा जमिनीत सागाची वाढ चांगली होते.
साग लागवडीनंतर कशी घेणार काळजी
साग लागवडीत सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते ती म्हणजे व्यवस्थापनाची साग लागवड केल्यानंतर झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते. सुरुवातीचे चार वर्ष साग लागवडीवर विशेष लक्ष ठेवावे लागते. साग लागवडीच्या पहिल्या वर्षी साग लावलेल्या क्षेत्राची चांगल्या पद्धतीने निंदणी करून घेणे (Weeding) आवश्यक असते. पहिल्या वर्षी तीन वेळेस निंदणी करण्याची शिफारस केली जाते. दुसऱ्या वर्षी दोनदा निंदणी केली तरी पुरेशी ठरते. तसेच सागाच्या झाडाला वेळो वेळी पाणी आणि खत (Fertilizer) देणे अनिवार्य असते. शेतकरी मित्रांनो सागाच्या झाडाला जास्त पाणी देखील अपायकारक ठरू शकते जास्त पाणी दिल्यामुळे सागाच्या झाडाला बुरशी लागू शकते आणि त्यामुळे झाड मरू देखील शकते. म्हणून संतुलित पाणी देणे गरजेचे असते.
केव्हा मिळते सागापासून उत्पादन
शेतकरी मित्रांनो साग लागवड केल्यापासून बारा वर्षांनी सागा च्या झाडापासून लाकूड प्राप्त होते. त्यामुळे कृषी वैज्ञानिक सागाच्या झाडाची लागवड बांधावर करण्याचा सल्ला देतात. बांधावर सागाचे झाड लावल्यास शेताचे देखील संरक्षण करता येते कारण की सागाची पानेही कडवट असतात त्यामुळे जंगली पशु त्याला खात नाहीत. शेतकरी बांधवांनो जर आपण एक एकर क्षेत्रात 500 सागाची झाडे लावली तर आपणास बारा वर्षानंतर यातून जवळपास एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
Share your comments