गहू हे रबी हंगामातील सगळ्यात महत्वाची पिक आहे. महाराष्ट्रात तसेच भारतात बऱ्याच ठिकाणी गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु गव्हावर सगळ्यात जास्त नुकसान दायक रोग कोणता असेल तर तो आहे तांबेरा. सुरुवातीच्या काळामध्ये नारंगी तांबेरा व नंतरच्या काळात म्हणजेच तापमान वाढल्यानंतर मराठी फेब्रुवारी महिना संपत असताना काळा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो.गव्हावर तांबेरा चा प्रादुर्भाव झाल्यास जर दुर्लक्ष केले तर100 टक्क्यांपर्यंत नुकसान होते आणि उत्पादनात घट होते..
वातावरणात भरपूर आर्द्रता आणि ढगाळ हवामान जर असले तर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.गव्हाचे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना जर प्रादुर्भाव झाला तर दाण्यावर सुरकुत्या पडून त्याचे नुकसान होते.
तांबेरा रोगाचा प्रसार
तांबेरा रोगाचा प्रसार हा पक्सीनिया ट्रिटिकीया बुरशी मुळे होतो.
तांबेरा रोगास अनुकूल वातावरण
15 ते 25 अंश सेल्सिअस तापमान व पानावर किमान तीन तास दव असेलतर या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
तांबेरा रोगाची लक्षणे
या रोगाच्या प्राथमिक अवस्थेत नारंगी तांबेरा प्रामुख्याने पानाच्या वरच्या भागावर दिसून येतो. या रोगाची लागण झाल्यावर पानावर गोलाकार अंडाकृती आकाराचे लहान लहान ठिपके दिसून येतात. अनुकूल हवामान असेल तर टिपक्या च्या जागी असंख्य बीजाणू तयार होऊन ठिपक्यांचा रंग नारंगी ते गर्द नारंगीदिसू लागतो. अशा रोगग्रस्त पानांवरून बोट फिरवल्यास नारिंगी रंगाची पावडर बोटाला लागते.जर गहू पिकामध्ये फुलोरापूर्वीच्या अवस्थेत जर या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर 80 टक्क्यांपर्यंत नुकसान होते अगदी सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव झाला तर 100 टक्क्यांपर्यंत नुकसान होतेच होते.
काळा किंवा खोडावरील तांबेरा
त्याचा प्रसार प्रामुख्याने हवेद्वारे वाहून आणलेल्या बीजाणू मुळे होतो.
अनुकूल वातावरण
पानावर किमान सात ते आठ तास ओलावा किंवा दव साचलेले असल्यास व तापमान 15 ते 24 अंश सेल्सिअसअसल्यास रोगाची लागण होते.मात्र तापमान 30 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्यावर रोगाचा प्रादुर्भाव खूपच झपाट्याने वाढतो.काळा तांबेरा च्या वाढीसाठी नारंगी तांबेरा पेक्षा 5.5अंश सेल्सिअस जादा तापमानाची गरज असते.
याची लक्षणे
या रोगाच्या प्रादुर्भाव पानाच्या खालच्या व वरच्या बाजूवर होतो.परंतु जर अनुकूल हवामान असेल तर याचा प्रादुर्भाव खोडावर,देठावर,गव्हाच्या ओंबीवरआढळून येतो.पानावर रोगाचा प्रादुर्भाव होताच अंडाकृती लंबवर्तुळाकारआकाराचे हरितद्रव्य नष्ट झालेले लहान ठिपके दिसून येतात.कालांतराने त्या ठिकाणी विटकरी रंगाच्या बुरशीचे बीजाणू ची पावडर दिसून येते.रोगाचा प्रादुर्भाव वाढला तर याचा प्रादुर्भाव गव्हाची ओंबी व कुसळावर दिसू लागतो.जरसुरुवातीच्या काळात याचा प्रादुर्भाव झाला तर 100 टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येते.
असे करावे तांबेरा रोगाचे व्यवस्थापन
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तांबेरा रोगास प्रतिकारक्षम गहू वानाची पेरणी करावी.फुले समाधान, नेत्रावती,गोदावरी, पंचवटी इत्यादी.
- शिफारस इतक्यात पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.गव्हाला जास्त पाणी दिल्यास पिकात सतत ओलावा टिकून राहतो व आद्रतेमुळे रोगाचे प्रमाण वाढते. विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खताच्या मात्रा द्याव्यात. युरिया खताचा पुरवठा जास्त करू नये.जर एवढ्या जास्त पुरवठा झाला तर या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
- तांबेरा रोगास बळी पडणाऱ्या वानावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. असा प्रादुर्भाव दिसताचमॅन्कोझेब ग्राम प्रति लिटर पाणी
- आवश्यकता भासल्यास पुढील फवारणी पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांच्या अंतराने करावी.
Share your comments