जर आपण ऊस शेतीचा विचार केला तर शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न चांगले मिळते परंतु त्या अर्थी उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांचा खर्च देखील तेवढाच असतो हे देखील तेवढेच सत्य आहे. कारण हे एक खर्चिक पीक असल्यामुळे आणि इतर नियोजनाच्या गोष्टी खूपच बारकाईने यामध्ये करायला लागतात.
जर आपण ऊस शेतीचा विचार केला तर ऊस लागवडीपासून तर ऊस तोडणी हा एक मोठा कालावधी असल्यामुळे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तसेच कीड व्यवस्थापन यावर देखील लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असते.
जर आपण खास करून उसावर येणाऱ्या रोगांचा विचार केला तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोगांचा प्रादुर्भाव ऊस पिकावर होत असतो. त्यामुळे अशा या रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांचा खर्च तर वाढतो परंतु बऱ्याचदा नियंत्रण न झाल्यामुळे उत्पादनाला देखील फटका बसण्याची शक्यता असते. अशाच एका महत्वपूर्ण रोगाविषयी आपण या लेखांमध्ये माहिती घेणार आहोत.
उसावरील तांबेरा रोग
जर आपण तांबेरा रोगाचा विचार केला तर यामुळे उसाचे खूप नुकसान होते उत्पादनात घट येण्याची शक्यता देखील असते. जर सध्याचा विचार केला तर तज्ञांच्या मते ऊस पिकावर जर या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर आगोदर लहान व लांबट पिवळे ठिपके उसाच्या पानांच्या खालच्या बाजूस दिसतात.
कालांतराने या ठिपक्यांचा रंग लालसर तपकिरी किंवा तपकिरी होतो.या रोगाला तांबेरा असे म्हणतात. या रोगाचे वैशिष्ट्य म्हणजे या रोगामुळे ज्या ठिकाणी ठिपके पडतात त्या ठिकाणी किंवा तो भाग बुरशीच्या आणि बीजाणू यांच्या वाढीमुळे फुगीर बनत जातो आणि उसाच्या पानांच्या ठीपक्या लगतचा भागावर प्रादुर्भाव वाढला की तो फुटतो आणि मग त्यातून नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बीजाणू बाहेर पडतात.
अशा पद्धतीने मिळवा नियंत्रण
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा खत व्यवस्थापन कराल तेव्हा नत्रयुक्त खतांचा आणि इतर खताची मात्रा ऊस पिकाला उशिरा देऊ नये. तसेच उसाच्या शेतामधून पाण्याचा निचरा उत्तम पद्धतीने व्हावा अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. या गोष्टींमुळे तांबेरा रोगावर प्रतिबंध केला जाऊ शकतो.
त्यासोबतच आपण रासायनिक पद्धतींचा विचार केला तर यासाठी प्रॉपीनेब अडीच ग्रॅम किंवा मॅन्कोझेब तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करण्याचा देखील सल्ला दिला जातो.
तसेच फवारणीचा व्यवस्थित फायदा मिळावा यासाठी स्टिकर मिसळण्याचा देखील सल्ला दिला जातो. फवारणी शेतकरी दहा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळेस करू शकतात व यामुळे तांबेरा रोगावर नक्कीच नियंत्रण येऊ शकते.
Share your comments