फळबागातून जर का भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर फळबागांची योग्य निगा आणि काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण फळबागांना काळजी आणि निगा आणि योग्य व्यवस्थापन हे खूप महत्वाचे आहे.फळबागांवर सर्वात मोठा परिणाम हा वातावरण बदलामुळे होतो त्यामुळं अश्या वेळी आपल्या फळबागांची काळजी घेणे महत्वाचे आहे.सध्या वातावरणात बदल मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि खतांचा डोस शिवाय आंबे बहरातील मोसंबीची तोडणी देखील खूप आवश्यक आहे.
मोसंबी फळांना जास्तीचा भाव मिळावा म्हणून मोसंबी परिपक्व होऊन सुद्धा फळ झाडालाच ठेवतात. यामुळे शेतकरी वर्गाला मोठा तोटा होईल असा अंदाज मोसंबी संशोधक संजय पाटील यांनी दिला आहे. म्हणून योग्य वेळेत मोसंबीची तोडणी करणे गरचेच आहे असे संजय पाटील यांनी शेतकरी वर्गाला सांगितले आहे.सध्याचा काळ हा आंबे मोहरातील मोसंबीची लागवड करण्यासाठी चा काळ आहे. तसेच याचबरोबर मोसंबी तोडणीसाठी सुद्धा उत्तम वातावरण आहे. परंतु बाजारात मोसंबी ला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांनी मोसंबीची तोडणी थांबवली आहे. शेतकरी तश्याच प्रकारे मोसंबी झाडाला ठेवत आहेत.परंतु मोसंबीे झाडावर जास्त वेळ ठेवली तर त्याचा परिणाम हा थेट झाडावर आणि पुढील बहरावर होणार असल्याचे डॅा. पाटील यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.
तोडणी करून खतांचा डोस देणे गरजेचे:-
योग्य काळात फळाची तोडणी करणे खूप गरजेचे असते. कारण तोडणीवरच फळांचा पुढील बहार अवलंबून असतो. जर का जास्तीच्या भावासाठी मोसंबी ची तोडणी केली नाही तर त्याचा परिणाम फलबागेवर च होणार आहे. यासाठी मोसंबी ची योग्य वेळेत तोडणी करून खतांचा डोस देऊन पुढील तोडणी ची तयारी करावी असा सल्ला ही शेतकऱ्यांना दिला आहे.
फळमाशी मुळे नुकसान:-
फळमाशी मुळे आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जर का योग्य वेळेत मोसंबी ची तोडणी केली नाही तर मोठ्या प्रमाणात फळमाशी वाढेल. आणि जास्त प्रमाणात नुकसान होईल तसेच जास्त दिवस मोसंबी झाडाला ठेवल्यामुळे सुद्धा गळती होऊन त्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळं योग्य वेळेत तोडणी करणे खूप गरजेचे आहे.
Share your comments