भारतात मेडिसिनल प्लांटची शेती ही दिवसेंदिवस वाढतच आहे. ह्या आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड शेतकऱ्यांना मालामाल बनवत आहे. भारतीय बाजारात तसेच वैश्विक स्तरावर देखील मेडिसिनल प्लांटची मागणी ही डे-बाय-डे वाढतच आहे त्यामुळे ह्याची लागवड शेतकऱ्यांसाठी एक हमीचे उत्पन्न बनू शकते. अशाच आयुर्वेदिक वनस्पतीपैकी एक आहे कोरफड ज्याला इंग्लिश मध्ये एलोवेरा असे संबोधले जाते
तर हिंदीत ह्याला घृतकुमारी म्हणुन ओळखले जाते. कोरफडचा वापर हा मुख्यता कोस्मेटिक्स इंडस्ट्री मध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो तसेच ह्यांच्या आयुर्वेदिक गुणांमुळे ह्याचा वापर हा हर्बल औषधंच्या निर्मितीत देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. कोरफडची वाढती मागणी बघता ह्याची लागवड शेतकऱ्यासाठी एक वरदान ठरू शकते. म्हणुनच कृषी जागरण आपल्या वाचक शेतकरी मित्रांसाठी आज घेऊन आले आहे कोरफड अर्थात एलोवेरा लागवडीची महत्वपूर्ण माहिती. चला तर मग जाणुन घेऊया कोरफड शेतीविषयी.
कोरफड लागवडिविषयी महत्वपूर्ण बाबी
»शेतकरी मित्रांनो कोरफडीच्या लागवडीसाठी उष्ण हवामान योग्य असल्याचे वैज्ञानिक सांगतात.
»साधारणपणे कमी पाऊस पडणाऱ्या, कोरड्या भागात आणि उष्ण व दमट हवामान असलेल्या प्रदेशात कोरफडं लागवड फायद्याची ठरते आणि ह्यातून यशस्वी उत्पादन घेतले जाऊ शकते.
»म्हणजेच भुरी माती असलेल्या जमिनीत कोरफड लागवड फायदेशीर ठरते व अशा जमिनीत केलेली लागवड हे चांगले उत्पादन देते.
»शेतकरी मित्रांनो कोरफड म्हणजेच एलोवेरा पिकाला जास्त थंडी मानवत नाही त्यामुळे हिबाळ्यात तसेच थंड प्रदेशात ह्याची लागवड करू नये.
»कोरफड लागवड ही वाळूयुक्त चिकणमाती म्हणजेच लोममाती तसेच इतर सर्व प्रकारच्या जमिनीत करता येऊ शकते.
»पण कोरफड लागवडीसाठी वाळूमिश्रित माती असलेली जमीन उत्तम असल्याचे सांगितले जाते. याशिवाय कोरफड ही चांगल्या काळ्या जमिनीतही लावता येऊ शकते.
»कोरफडीच्या लागवड ही नेहमी उंच ठिकाणी करावी तसेच शेतात पाणी साचणार नाही ह्याची काळजी घ्यावी. वावरात पाणी साचू नये म्हणुन चाऱ्या पाडाव्या पावसाचे पाणी काढण्यासाठी नाल्यांची व्यवस्था करावी. वावरात पाणी राहणार नाही ह्याची दक्षता घेतली तर ह्याची लागवड शेतकऱ्यांना हमीचे उत्पादन देऊ शकते.
»कोरफड लागवडीसाठी जमिनीचा pH अर्थात सामू हा 8.5 दरम्यान असावा असे वैज्ञानिक नमूद करतात.
एलोवेरा लागवड कधी आणि कशी करावी
प्रत्येक पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादणासाठी महत्वाची बाब ठरते हंगाम अथवा लागवडीचा वेळ ठरवण्याची. म्हणुन कोरफड लागवड ही जुलै-ऑगस्टमध्ये करावी. ह्या काळात कोरफड लागवड केली तर उत्पादन चांगले येते. जसं की आम्ही आधीच नमूद केले आहे की कोरफड हे थंड हवामान सहन करू शकत नाही त्यामुळे हिवाळ्यात ह्याची लागवड टाळावी. बाकी संपूर्ण वर्षभर कोरफड लागवड करता येऊ शकते.
कोरफड लागवड करण्यासाठी सर्व्यात आधी जमिनीची पूर्वमशागत करावी लागते. सर्व्यात आधी जिथे कोरफड लावायची आहे ती जमीन चांगली नांगरून भुसभूशीत करून घ्यावी. जमीन नागरणी झाल्यानंन्तर चांगल्या क्वालिटीचे जुने शेणखत टाकावे. शेणखत टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढते आणि उत्पादन दर्जेदार मिळते. शेणखताचा जेवढा जास्त वापर तेवढी जास्त उत्पादनात वाढ होईल.
कोरफडं लागवड ही कंद लागवड करून केली जाते ह्याची कंद/रोपे नर्सरीतुन घेतली जाऊ शकतात तसेच स्वतः तयार केली जाऊ शकतात. एक एकर कोरफडं लागवडीसाठी जवळपास 5000 ते 10000 कंद आवश्यक असतात.
»शेतकरी मित्रांनो कोरफड म्हणजेच एलोवेरा पिकाला जास्त थंडी मानवत नाही त्यामुळे हिबाळ्यात तसेच थंड प्रदेशात ह्याची लागवड करू नये.
»कोरफड लागवड ही वाळूयुक्त चिकणमाती म्हणजेच लोममाती तसेच इतर सर्व प्रकारच्या जमिनीत करता येऊ शकते.
»पण कोरफड लागवडीसाठी वाळूमिश्रित माती असलेली जमीन उत्तम असल्याचे सांगितले जाते. याशिवाय कोरफड ही चांगल्या काळ्या जमिनीतही लावता येऊ शकते.
»कोरफडीच्या लागवड ही नेहमी उंच ठिकाणी करावी तसेच शेतात पाणी साचणार नाही ह्याची काळजी घ्यावी. वावरात पाणी साचू नये म्हणुन चाऱ्या पाडाव्या पावसाचे पाणी काढण्यासाठी नाल्यांची व्यवस्था करावी. वावरात पाणी राहणार नाही ह्याची दक्षता घेतली तर ह्याची लागवड शेतकऱ्यांना हमीचे उत्पादन देऊ शकते.
»कोरफड लागवडीसाठी जमिनीचा pH अर्थात सामू हा 8.5 दरम्यान असावा असे वैज्ञानिक नमूद करतात.
Share your comments