चिखली - सोयाबीन-कापूस उत्पादकांचे आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल तसेच पिकविम्यासाठी दिलेल्या लढा यशस्वी होऊन शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर व स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांचा तालुक्यातील सवणा येथे भव्य असा नागरी सत्कार शेतकर्याच्या वतीने दि२५डीसेबर रोजी करण्यात आला आहे.यावेळी सवणा गावातून तुपकरांची जंगी मिरवणूक काढण्यात आली दरम्याण या सोहळ्या पुर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखा नामफलकाचे अनावरण देखील तुपकरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थीत शेतकऱ्यांना रविकांतजी तुपकर, विनायक सरनाईक,माजी जि प सदस्य हिवाळे यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलतांना रविकांतजी तुपकर म्हणाले की,शेतकरी बांधवांसाठी लढत राहणे हे मी माझे काम समजतो, त्यासाठी सत्काराची माझी अपेक्षा नाही. मात्र त्यांनी कृतज्ञतेच्या व आपुलकीच्या भावनेतून दिलेल्या सन्मानामुळे निश्चितच भविष्यातील संघर्षासाठी बळ मला मिळेल.हे पदरी पडलेले यश माझे नसुन हा आपल्या सर्वांचा, शेतकरी एकजुटीचा व पत्रकार बांधवांनी केलेल्या सहकार्याचा विजय असल्याचे सांगीतले त्यांनी सत्काराच्या निमित्ताने मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.तर पै आणि पै पिक विमा रक्कम कंपनीकडुन वसुल करुण शेतकर्याच्या पदरी पडणार नाही तो पर्यत हि स्वाभिमानी ची लढाई थांबणार नसल्याचे त्यांनी सांगीतले दरम्याण विनायक सरनाईक यांनी आपल्या भाषणात सवना येथील शेतकर्याच्या विजेच्या,गाव शिवारातील शेतरस्ते यासह विविध मागण्यांच्या अनुषंघाने मांडणी केली
तर या समस्या सोडवण्यासाठी स्वाभिमानी प्रयत्न करेल असे सांगत रविभाऊ जे बोलतात ते करतात असे हि त्यांनी ठासुन सांगीतले तर ग्रामस्थांनी थाटात केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले त्याचप्रमाणे विविध मान्यवरांची समायोजीत भाषणे झाली यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी या कार्यक्रमास उपस्थीत होते.यावेळी कार्यक्रमास मंचावर भारत वाघमारे,वळती गावचे सरपंच सुनिल चिंचोले,भारत खंडागळे,अनिल चौहाण,विलास तायडे,रविराज टाले,पवन चौहाण,दिपक धनवे,शुभम पाटिल डुकरे,गोकुळसिंग पवार,चेतन कणखर,गणेशबापु देशमुख,विठ्ठल परीहार,अमोल तिडके,यांच्यासह आदिची उपस्थीती होती.तर या कार्यक्रमासाठी सतिष सुरडकर, नितिन शेळके, प्रल्हाद देव्हडे,भारत गाढवे,
रामेश्वर चिकणे,राहुल पवार,गौतम कस्तुरे,उमेश करवंदे,विष्णु वसंतराव हाडे,आशु जमदार,प्रताप हाडे,विठ्ठल करवंदे,संजय हाडे यांच्यासह गावातील युवकांनी परीश्रम घेतले आहे
Share your comments