उन्हाळी हंगामातील पेरणीची योग्य वेळ अतिशय महत्वाची असते. उन्हाळी पिकांची पेरणी लवकर केल्यास त्याचा पीक उगवणीवर व पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होता,तर पिकांची पेरणी उशिरा झाल्यास अतिउष्णतेचा विपरीत परिणाम फुलोऱ्यावर तसेच दाणे भरण्यावर होऊ शकतो. तसेच मे महिन्याच्या शेवटी होणाऱ्या अवकाळी पावसात काढणीच्या वेळी पीक सापडू शकते म्हणून उन्हाळी हंगामातील पिकांची योग्य वेळी पेरणी करणे आवश्यक आहे.
उन्हाळी मूग:
उन्हाळी मुगाची पेरणी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिला पंधरवडा या काळात पेरणी करावी.त्यापेक्षा लवकर पेरणी केल्यास थंडीचा उगवणीवर परिणाम होतो.उशिरा पेरणी केल्यास पीक मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते. पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी.पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० से.मी. व दोन रोपातील अंतर १० से.मी. ठेवावे.हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे. उन्हाळी मुगाच्या पेरणीसाठी पुसा वैशाखी,वैभव,पी.कें.व्ही ग्रीन गोल्ड, एस-८, फुले एम-२,बीपीएमआर १४५, उत्कर्ष, फुले सुवर्ण या वाणांची निवड करावी सर्वसाधारणपणे हे वाण ६५ ते ७० दिवसात तयार होतात.
पेरणी पूर्वी प्रथम कार्बेन्डॅझिम ३ ग्रॅम/किलो अथवा Trichoderma ५ ग्रॅम/किलोची बीजप्रक्रिया करावी.त्यानंतर जीवाणू खतांची रायझोबियम व स्फुरद विरघळवणांरे जीवाणू यांची २५ ग्रॅम /किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत सुकवावे आणि नंतर पेरणी करावी. पेरणीपूर्वी पूर्ण कुजलेले शेणखत ६ ते ८ टन प्रति हेक्टरी कुळवणीच्या वेळी द्यावे.पेरणी करते वेळी २० किलो नत्र व ४० किलो स्फुरद अथवा १०० किलो डीएपी प्रति हेक्टरी द्यावे.पीक फुलोऱ्यात असताना २ % युरिया (२० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून) ची फवारणी करावी.शेंगा भरताना २ % डीएपी (२० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून)ची फवारणी करावी.
उन्हाळी बाजरी :
उन्हाळी बाजरीची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान करावी.पेरणी १५ फेब्रुवारी या दरम्यान करावी.पेरणी १५ फेब्रुवारी नंतर झाल्यास परागीभवनावर पुढील काळातील अतिउष्ण हवामानाचा अनिष्ट परिणाम होऊन दाणे कमी प्रमाणात भरून उत्पादन घटते.पेरणी दोन चाडाच्या पाभारीच्या साहय्याने ३० x १५ से. मी.अंतरावर पेरणी करावी पेरणी २ ते ३ से. मी पेक्षा जास्त खोलीवर पेरणी करू नये.पेरणीसाठी हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे पुरेसे होते. उन्हाळी बाजरीच्या पेरणीसाठी संकरीतवाण-आदिशक्ती ,फुले महाशक्ती ,JHB558,सुधारित वाण:धनशक्ती,ICMV-221, खाजगी कंपनीचे ८६ एम ६४, ८६ एम ८६ NBH4767,प्रताप कावेरी सुपर बॉस हे वाण पेरणीकरिता वापरावेत.
अरगट रोगाच्या नियंत्रणासाठी २०% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करावी.,त्यासाठी १० लिटर पाण्यांत २ किलो मीठ विरघळावे.गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्यास मेटॅलॅक्झील (३५ एस डी) ६ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी अझोस्पिरीलम/अॅझोटोबॅकटर २५ ग्रॅम + स्फुरद विरघळवणांरे जीवाणू यांची २५ ग्रॅम /किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत सुकवावे आणि नंतर पेरणी करावी पेरणी करताना ४५ किलो नत्र ४५ किलो स्फुरद व ४५ किलो पालाश द्यावे. उर्वरीत ४५ किलो नत्र २५ ते ३० दिवसांनी खुरपणी केल्यानंतर द्यावे.
Share your comments